Total Pageviews

Saturday, June 26, 2021

Donkey and Lion

The Story of the Donkey and Tiger

The donkey told the tiger:
′′The grass is blue".
The tiger replied:
′′No, the grass is green".

The discussion became heated up, and the two decided to submit the issue to arbitration, and to do so they approached the lion, King of the Jungle.

Before reaching the clearing in the forest where the lion was sitting on his throne, the donkey started screaming:
′′Your Highness, is it true that grass is blue?".
The lion replied:
"True, the grass is blue".

The donkey rushed forward and continued:
′′The tiger disagrees with me and contradicts me and annoys me please punish him".
The king then declared:
′′The tiger will be punished with 5 years of silence".

The donkey jumped for joy and went on his way, content and repeating:
′′The grass is blue"...

The tiger accepted his punishment, but he asked the lion:
′′Your Majesty, why have you punished me, after all, the grass is green?"
The lion replied:
′′In fact, the grass is green".
The tiger asked:
′′So why do you punish me?"
The lion replied:
′′That has nothing to do with the question of whether the grass is blue or green. The punishment is because a brave, intelligent creature like you can't waste time arguing with a donkey, and on top of that to come and bother me with that question".

The worst waste of time is arguing with the fool and fanatic who doesn't care about truth or reality, but only thevictory of their beliefs and illusions. Never waste time on discussions that make no sense... For all the evidence presented to them, some people do not have the ability to understand, and others are blinded by ego, hatred, and resentment, and the only thing that they want is to be right even if they aren’t. When ignorance screams, intelligence shuts up. Your peace and tranquility are worth more.


Sunday, November 29, 2020

what I feel about farmers protest in Delhi

Friends I am observing the system from last 40 years. Have you seen any time before Modi government that farmers were all happy. The got their minimum guaranteed price of the food grains or the right price of the agricultural produces. Haven't you seen farmers committing suicide before Modi brought this farmers bill. Beed Maharashtra for beat in Punjab or Haryana farmers have committed suicide in past. 

It's human nature its human tendency to oppose any thing that comes new. 

If you have read the farmers pill word by word line by line then you should understand and highlight those particular points which are not in favour of farmers not in favour of farmers. 

There are some news that some JNU students are some people who are participating in Shaheen Bagh protest are joining this pharmacy release in Delhi. 

I wonder when Punjab government the state government has decided not to to go with the farmers feel in their state why the protest are happening in Delhi. Why the Punjabi AEE activists are coming on the streets of Delhi . Everyone has right to protest participate in such release but it should not be disturbing others lives. Anyone who wants to target the central government I am not saying about the current Modi government but anyone wants to to protest they come to Delhi e and 2 products it's not fair why Delhi cause all the time should be victim of this kind of protest on the streets. we have seen in past that because of the traffic jam because of the roads were blocked the ambulance cannot reach to hospital in time. and we might have critical patients who may have lost their lives. 

It's my request to the protesters if you want to protest go back to your state protest from there. its Punjab state government already stop the bill not be implemented in Punjab still the farmers are coming to Delhi and doing protests its not a good practice that some other elements are joining such release and creating nuisances we should respect the the administration by police who have to keep the law and order in place we respect farmers if something is there that has to be discussed debated not to be e violently protested. It's our history we are peaceful nation but some people try to to divide and rule and take it for many years. How long we are supposed to victim of such divide and rule divide and conquer kind of practices . and I'm sure everyone understands who is behind this. I just want you don't want to take name of those politicians who are sponsoring this kind of release continuously in Delhi e and trying to catch eye of the nation the position should find the good really good issues with the current government. The position role is to support government in Nations favour per it's not just the name sake opposition that means they should oppose everything that the government has been deciding on so if there are some good policies good governance and decisions good governance happening it should be welcomed and it should be supported by the opposition leaders opposition parties. We should not make issue for party size any everything that the government is going to work on because you are creating blocker in every step of the government work. The way police department has or government department has a law obstructing a government work so the opposition should not do this kind of activities otherwise they should be framed under the charges that they are continuously blocking the government work and the activist should be put behind the bar for creating nuisance in the country.

Thursday, October 1, 2020

Monday, January 1, 2018

इंग्रजी नवीन वर्ष झाले सुरू- काय फरक पडला काल आणि आज ?

काल लोकल मधे फुल गर्दी, लोक अक्षय तृतीयेला नटत , सजत नाहीत तेवढे लै भारी होऊन लोकल च्या गर्दीत उभे राहून बायका पोरांना घेऊन 🙃

कशासाठी तर कोणाकडे तरी पार्टी असेल, बसून दारू पिऊ आणि मस्त नॉन व्हेज खाऊ (कोंबडी),
नाहीतर काहींचा प्लॅन 31 ला बाहेर फिरायचे , खायचे आणि घरी यायचे, झोपायचे..

मला तर काही फरक वाटत नाही .. काल आणि आज मध्ये

31 डिसेंबर 2017 आणि 1 / 1/ 2018 मध्ये

उलट आपले सण बघा आणि

* नवीन वर्ष "गुढी पाडवा - चैतन्य मास आरंभ" कसा निसर्गात चैतन्य लागल्याची चाहूल असते.. सगळीकडे वृक्ष हिवाळा सम्पून हिरवेगार झालेले असतात.. सर्व निसर्गच नवीन वर्षात जाण्यासाठी, नवीन रूपासाठी आतुर असतो.. म्हणून आपले नवीन वर्ष ते जे निसर्ग सुद्धा मानतो..

* मकर संक्रांती - पौष / माघ महिन्यात - सूर्याच्या मकर राशी संक्रमणाशी जोडलेला आहे, इथे सुद्धा निसर्ग खुद्द सूर्य तुमच्यासोबत साजरा करतोय

थंडी ओसरून आता उन्हाळा लागणार

* वैशाख शुक्ल तृतीया - अक्षय तृतीया

* बुद्ध पौर्णिमा - या दिवशी तुम्ही चंद्र नक्की बघा. सांगा  बाकीचे दिवस व आज चंद्रा मध्ये काय फरक दिसतो ते.

* गुरू पौर्णिमा - आषाढ पौर्णिमा - नेमकी शाळा चालू झाल्यावर जून-जुलै असते

* नागपंचमी - श्रावण शुक्ल पंचमी - नेमकी पावसाळ्यात
* नारळी पौर्णिमा - श्रावण शुक्ल पौर्णिमा
* गोपाळकाला / दहीहंडी
* गणेश चतुर्थी - भाद्रपद शुक्ल 4 चतुर्थी
* ऋषी पंचमी - भाद्रपद शुक्ल पंचमी

* घटस्थापना - अश्विन शुक्ल प्रथमा
* दसरा - अश्विन शुक्ल नवमी
* कोजागिरी पौर्णिमा - अश्विन पौर्णिमा

* दिवाळी
अश्विन कृष्ण 13 - त्रयोदशी - धन त्रयोदशी
अश्विन कृष्ण 14 चतुर्दशी
अश्विन कृष्ण 15- अमावस्या - लक्ष्मी पूजन
कार्तिक शुक्ल 1 - बलिप्रतिपदा
कार्तिक शुक्ल 2 - भाऊ बीज

सर्व वरील दिवाळी मस्त थंडगार हिवाळा ची सुरुवात असते




लेखक - श्रीनिवास मधुकर वाणी

Saturday, June 3, 2017

वाचत रहा ...

 वाचत रहा ... 

-----------------------------------------------------------
एक छान कविता शेअर करतोय

जीवनाच्या वाटेवर

साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*

काडिनं देतात,
गाडीनं काढतात,
मातीत घालतात,
मातीलाही जातात
ती ही असतात ...... *माणसं !*

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... *माणसं !*

नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायचीत कशी.................
*सारी असतात आपलीच माणसं !*

 -----------------------------------------------------------
बेसिक

ती बोलत होती तावातावाने

काय आहे ना !

*'मुळात आपलं*
*बेसिकच चुकतंय '*

लहानपणापासून गोष्ट ऐकतो
एक होता राजा .
त्याला दोन राण्या
होत्या ...

तिथेच प्रश्न यायला हवा

*मनात .दोन राण्या का होत्या ?*
एकच का नव्हती ?

सीतेने अग्निपरीक्षा दिली
आपण लगेच स्वीकारतो
का नाही येत प्रश्न
का दिली ? राजा होता ना !
*माझा माझ्या पत्नीवर*
*विश्वास आहे .*
*का नाही सांगितलं*
*ठणकावून ?*

पती द्यूत हरला म्हणून
द्रौपदीचे वस्त्रहरण ?
विचारलं होत डावाला लावू
का बाई तुला
असं पांडवांनी तिला ?
घेतली होती तिची
परमिशन ?

एक राजकुमारी असते
तिला न्यायला राजकुमार
घोड्यावरून येतो
आणि हुंडा वैगरें
ना मागता चक्क
राणी बनवून घेऊन जातो?

सालं ! सगळं खोटं
आला राजकुमार ?
भेटला कधी कुणाला ?

अगदी आजही बायकांवर
पत्नी वर सर्रास कटकटी वैगरें
असे जोक्स असतात ..
आणि आपणच दात विचकून
वर ते फॉरवर्ड करतो ?

कार्टून मध्ये
एक स्कुटर त्यावर बसलेली
त्याची खूप लठ्ठ बायको
आणि फालतू जोक ...

का पुरुष नसतात लठ्ठ ?
त्यांच्या बायका नसतात
सडपातळ ?
त्यांच्यावर का नाही
येत जोक ????

तिच्या प्रश्नांच्या
सरबत्तीने हैराण झाले

पण ! खरंच ना !
हे असच आहे
*ती काय खोटं बोलते ?*

तिच्या एकाही प्रश्नाचं
समर्पक उत्तर देऊ
शकेन मी ?

*की ती म्हणते*
*तस आपलं बेसिकच*
*चुकतंय ??????*

-----------------------------------------------------------
*अपघातातून ‘सीएम’ बचावताच*
*प्रतिक्रिया आल्या रगड*
*विकृत हीन वृत्तीचे*

*महाभाग पडले उघड*
 
*मरणावर टपलेली गिधाडे*
*घिरट्या घालून थकली*
*यमराज सुद्धा म्हणाला*
*आमची वाट चुकली!*

-----------------------------------------------------------
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास...
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....।।।।।
"जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण

हसवून जाईल...
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल.....

-----------------------------------------------------------
मास्तर - असे कोणते बुक 📙📔आहेत जे तुमच्या जीवनात महत्वाचे आहेत ?

दिप्या - सर मी सांगतो...🤒

ास्तर - हा सांग...

दिप्या - माज्या बापाच👨🏻 चेक बूक 💳आणि तुमच्या मुलीच🙆🏻फेसबुक...🤒
😂😎
- मास्तरनी दिप्याला उलट टांगलय...

-----------------------------------------------------------   
 गाडी कीतीही फास्ट पळवली तरी ..मागचा टायर काय पुढच्या टायरच्या पुढे नाही जानार
----------------------------------------------------------- 
*एक प्रेमळ सत्य*

*मिर्ची* आणि *नवरा*

कितीही तिखट असले
तरी बायको त्यांचं *लोणचं* घालतेच,

*कोल्हापूरच्या* बायका तर *ठेचा* बी करत्यात..!

-----------------------------------------------------------

भारतात रिकाम्या लोकांची संख्या इतकी आहे की
.
.

नाल्यातून कचरा काढणारया JCB मशीनला पाहण्यासाठी पण 30-35 लोकं तासन तास उभे राहतात.

-----------------------------------------------------------
*अनाथ आश्रम ओर वृध्धाश्रम को साथ मे कर दिया जाये तो.....*

*बच्चों को मा-बाप मिल जायेगे ओर माॅ-बाप को बच्चे*


--------------------------------------------------------
मुलगा असो किंवा मुलगी​

घरी आल्यानंतर त्याचा तोंडून एकच प्रश्न नीघणार ??


​" आई " कुठे आहे..?​

आई कडे काही काम नसते पण,, ​आईला बघुन​ मनाला मिळालेली शांतता वेगळीच असते...


---------------------------------------------------------
काही पुणेकर :
आम्हाला सूर्या कडे बघायला ही वेळ नसतो. काही तर सूर्य उगवायच्या आधी उठतात आणि सूर्य मावळल्या वर घरी येतात. दुपारचे कुंभकर्ण होत नाही पुण्या सारखे. 

------------------------------------------------------------

संसार इंजिनियरच्या मँपने व डिझाईनने होत नाही. 

----------------------------------------------------------- 

*बिरबलाने दिलेली दहा सर्वश्रेष्ठ प्रश्नांची उत्तरे.....*

💐*1*- विश्वातली सर्वात सुंदर निर्मिति कोणती ?
उत्तर- *माता*..
💐*2*- सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?
उत्तर- *"कापसाचे फूल"*
💐*3*- सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ?
उत्तर- *पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध*..
💐*4*-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ?
उत्तर- *"वाणीचा"*
💐*5*- सर्वश्रेष्ठ दूध-
उत्तर- *मातेचे*..
💐*6*- सर्वात काळे काय आहे ?
उत्तर- *"कलंक"*
💐*7*- सर्वात वजनदार काय आहे ?
उत्तर- *"पाप"*
💐*8*- सर्वात स्वस्त काय आहे ?
उत्तर- *सल्ला*..
💐*9*- सर्वात महाग काय आहे ?
उत्तर- *"सहयोग"*
💐*10*-सर्वात कडू काय आहे ?
उत्तर- *"सत्य"*...
💐*खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...*
प्रश्न : *आयुष्य* म्हणजे काय ?

उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " *नाव* '' नसतं पण " *श्वास*'' असतो आणि ...
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त *"नांव''* असतं पण *"श्वास"* नसतो.
*" नाव ''* आणि *" श्वास "* यांच्या मधिल अंतर म्हणजेच *"आयुष्य"*...

शेवटी काय..

दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते
आणि आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात...


जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची..?

शेवटी काय...
*हसत रहा, हसवत रहा आणि
मजेत जगत रहा..*

Saturday, May 20, 2017

Monday, February 20, 2017

संत रामदास

आज दास नवमी

एक आगळा संत!

महाराष्ट्राच्या उज्ज्वल संतांच्या प्रभावळीत संत रामदासांचे वेगळेपणे फार ठसठशीतपणे समोर येते. वाङ्मयीन, सामाजिक आणि राजकीय या तीन अर्थानीच रामदास हे इतरांपेक्षा वेगळे होते असे नव्हे, तर ते ज्या काळात जन्मले आणि जी शिकवण त्यांनी दिली हे पाहिले तर त्यांच्यातील मोठेपण समजून घेण्यास मदत होईल. अल्लाउद्दीन खिलजीचे आपल्या प्रदेशात येणे, विजयनगर साम्राज्याची वाताहत आणि एकंदरच या प्रदेशावर झालेले परकीय आक्रमण यामुळे ज्याला आज महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते तो प्रदेश मनाने मेलेल्या अवस्थेत जवळपास चारशे वर्षे राहिलेला होता. तेराव्या शतकाच्या सुरुवातीस यवनांचे आक्रमण महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आपल्याकडील राजवटींनी सुरुवातीच्या काळात त्यांना तोंड दिले. परंतु नंतर नंतर त्यांचा धीर सुटला. विजयनगरच्या साम्राज्यातला रामदेवराय मारला गेला आणि हा संपूर्ण टापू परकियांच्या अमलाखाली आला. एका दुर्दैवी योगायोगाचा भाग म्हणजे एकीकडे आपला प्रांत असा परकियांच्या अमलाखाली येत होता आणि त्याच वेळी संत ज्ञानेश्ववर समाधी घेत होते. अल्लाउद्दीन खिलजी ज्या वर्षी आपल्या प्रांतात आला त्याच काळात संत ज्ञानेश्ववरांनी संजीवन समाधी घेतली. त्यानंतर जवळपास चारशे वर्षे हा प्रदेश मनाने मेलेलाच राहिला. अनन्वित अत्याचार झाले. परंतु भागवत धर्माचा प्रभाव इतका की त्यालाही तोंड देऊन माणसं जिवंत राहिली, धर्म जिवंत राहिला; परंतु काही करायची ऊर्मी मात्र हा समाज घालवून बसला.

अशा या मनाने मेलेल्या समाजाला उभे राहावे असे वाटले ते १६३० नंतर. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर. त्यानंतर या प्रदेशात धुगधुगी निर्माण झाली आणि मुर्दाड समाजाला पहिल्यांदा ‘स्व’ची जाणीव झाली. राजकीय पातळीवर हे होत असताना सामाजिक पातळीवर या आणि अशा ओल्या समाजाला आकार देण्याचे काम संतांनी केले. त्यात रामदासांचा वाटा जास्त महत्त्वाचा. कारण त्यांनी भक्तांना मेल्यानंतर स्वर्गात जाता यावे यासाठी पुण्य जमा करण्याचे शिकवण्याची संतांची पारंपरिक भूमिका सोडून इहलोकातील अस्तित्वास महत्त्व द्यायला शिकविले. तोवर हा देह नश्वर आहे. तो कधी तरी जाणारच. त्याची कशाला इतकी काळजी करायची. वगैरे प्रकारच्या शिकवणींनी मराठी मनावर शेवाळ निर्माण झाले होते. ते रामदासांनी घालवले. शरीरास महत्त्व आहे. तेच टिकले नाही तर पुण्य काय करणार. असा थेट सवाल केला आणि धडधाकट राहण्याचे महत्त्व निर्माण केले. सर्वसाधारण जनतेस निराकार भक्ती जमत नाही. डोके ठेवण्यासाठी त्यांना कोणाची तरी मूर्ती हवी असते, एखादा ज्याला देव म्हणता येईल असा आकार हवा असतो. मारुतीच्या निमित्ताने समर्थानी तो आकार मोठय़ा प्रमाणावर समाजात पसरवला. त्यामुळे पूजा करायची तर भीमरूपी महारुद्राची करायची आणि अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होण्याच्या त्याच्या क्षमतेची आराधना करायची हे रामदासांनी तरुण, बेकाम पोरांना शिकवले.

कोणापुढे तोंड उघडायाची वेळ आली तर आपला अभ्यास पक्का हवा, हा त्यांचा सल्ला आहे. त्यासाठी ते सांगतात.. अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे. याचा साधा अर्थ असा की एखाद्या विषयावर बोलायच्या आधी अभ्यास हवा, तो नसेल तर आपलेच हसू होईल आणि ते काही बरे नाही.
रामदासांपर्यंतच्या संतांच्या शिकविण्यात तत्कालीन परिस्थितीमुळे असेल, पण एक प्रकारचा निरिच्छवाद दिसतो. त्या वेळी परकीय आक्रमक मोठय़ा प्रमाणावर अत्याचार करीत होते. घरेदारे, पोरेबाळे लुटत होते. त्यामुळे संसार हा एक प्रकारे असार बनला होता आणि प्रपंचाचा एक प्रकारे कंटाळा आला होता. तो संतांच्या वाङ्मयातही दिसतो. हा कंटाळा रामदासांनी घालवला. प्रपंच करण्यात काहीही कमीपणा नाही, तो करतानासुद्धा ईश्वरभक्ती करता येते. किंबहुना तो चांगला झाला तरच ईश्वर भेटतो इतक्या ठसठशीतपणे रामदासांनी आपली शिकवण दिली. प्रपंच करावा नेटका. असे अन्य कोणी संतांनी सांगितल्याचे दिसणार नाही. ‘संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता, विचारेची होय. दृढ निश्चय करावा, संसार सुखाचा करावा, विश्व जन उद्धारावा, संसर्गमात्रे’ अशी रामदासांची शिकवण. प्रपंच नेटका करायला हवा. मग तो नेटका करण्यासाठी काय काय अडचणी येऊ शकतात, याची सहज शिकवण रामदास देतात. म्हणजे तरुणपणी एखादा प्रेयसीच्या प्रेमात कसा जगाला विसरतो, आईवडिलांकडे कसा दुर्लक्ष करतो आणि नवसाने झालेला हा पोरगा बायकोच्या प्रेमापोटी आपल्याशी असा वागू लागल्यावर वृद्ध आईवडिलांना शंखतीर्थ कसे घ्यावे लागते. हे सांगणे असो, वा ब्राह्मणे बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर, जे पाहताची चतुर समाधान पावती. असा विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला असो, रामदास रोजच्या जगण्यातील उपयुक्ततेत भर घालतात. साहेब कामासी नाही गेला, साहेब कोण म्हणेल त्याला. असा प्रश्न उपस्थित करणारा व्यवस्थापन कौशल्य जाणणारा दुसरा संत शोधूनही सापडणार नाही. येके ठाई बैसोन राहिला, तरी मग व्यापची बुडाला. इतक्या नि:संदिग्धपणे रामदास सल्ला देतात तो आजच्या काळातही लागू पडतो.

हा संत इतका प्रयत्नवादी आहे की देवदेव करीत बसा असे तो अजिबात सांगत नाही. देव पहाया कारणे, देवळे लागती पहाणे. असे ते सांगतात आणि पुढे लगेच म्हणतात. देवळे म्हणजे नाना शरीरे, तेथे जीवेश्वर राहिजे, नाना शरीरे, नाना प्रकारे भगवंत भेटे असेही लिहून टाकतात. म्हणजे देव पाहायचा असेल, त्याला भेटायचे असेल तर माणसांचीच सेवा करायला हवी, अशी त्यांची मसलत आहे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. असे रामदास म्हणतात तेव्हा त्यात आधुनिक मानव व्यवस्थापन शास्त्रच असते. नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त, सर्वोत्तमी लावावे. असे ते म्हणतात तेव्हा जन्माला येऊन काही ना काही चांगले करण्याची गरजच अधोरेखित करीत असतात. रामदासांनी दीर्घकालीन नियोजनास फार महत्त्व दिले आहे. मेळवती तितके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती, दीर्घसूचनेने वर्ततीत, तेचि भले. अशा शब्दात ते भविष्यासाठी नियोजन कसे महत्त्वाचे आहे ते सांगतात. या नियोजनात मानवी मनव्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. ते लक्षात घेऊन रामदास सांगतात. पेरले ते उगवते, बोलिल्यासारखे उत्तर येते, मग कटु बोलणे, या निमित्ये. असे ते विचारतात. म्हणजे गोड बोलून काम होत असेल तर उगाच कडवटपणा कशाला तयार करायचा, हे ते विचारतात, हे आधुनिक व्यवस्थापनशास्त्रच झाले. ज्याला काही मिळवायचे आहे, समाजासाठी काही करायचे आहे, त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ते सोडवताना अनेकांची मदत घ्यावी ना ग ते. तशी ती जरूर घ्यावी, ज्यांना आपण तोंड देऊ शकत नाही, त्यांचा सामना करण्यासाठी तितक्याच तोलामोलाचा कोणी आपल्या वतीने उभा करावा, हे सांगताना त्यांच्यातील व्यवहारकुशलताच दिसते. ठकासी व्हावे ठक, खटासी व्हावे खट, लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद. असे ते सहज सांगून जातात. हे सगळे करताना महत्त्वाचे काय, तर मनाचा निश्चय आणि त्या अनुषंगाने ध्येयप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न. ते जर चोख असतील तर नशिबावर अवलंबून राहावे लागत नाही, असे रामदासांचे म्हणणे आहे. जेणे जैसा निश्चय केला, तयासी तैसाची फळला. हे ते सांगून जातात. म्हणजे तुम्हाला आज जे काही मिळाले आहे ते तुम्ही काल जे काही केले त्याचे फळ आहे. काल उत्तम असेल तर आज आणि उद्या उत्तमच असेल, असा त्यांचा प्रयत्नवादी सल्ला आहे. असे करताना अभ्यास लागतो. तो डोळसपणे करावा. कोणापुढे तोंड उघडायाची वेळ आली तर आपला अभ्यास पक्का हवा, हा त्यांचा सल्ला आहे. त्यासाठी ते सांगतात.. अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे. याचा साधा अर्थ असा की एखाद्या विषयावर बोलायच्या आधी अभ्यास हवा, तो नसेल तर आपलेच हसू होईल आणि ते काही बरे नाही. असे असले तरी ज्याला समाजकारण करायचे आहे, त्याला इतरांचे सहन करायची सवय असायलाच हवी. जो बहुतांचे सोसिना, त्यास बहुत लोक मिळेना. अशा सोप्या शब्दांत रामदास इतरांना मदत करण्याचे महत्त्व पटवून देतात.

हे झाले समाजकारणाच्या बाबतीत. परंतु रोजच्या संसारातसुद्धा अनेकदा आपल्यावर मूर्खपणा केल्याची टीका होते. ती टाळायची असेल तर रामदासांची मूर्खाची लक्षणे वाचायलाच हवीत. जगात मूर्खाची लक्षणे सांगणारा दुसरा संत मिळणार नाही. चारचौघे बैसले जन, तयामधे करी शयन. त्यालासुद्धा मूर्ख ठरवले आहे रामदासांनी. म्हणजे सगळे बसून गप्पा मारतायत. त्यात एखादा गाढवासारखा लोळतोय. हे आपणही बघत असतो. सांगे वडिलांची कीर्ति. तो येक मूर्ख. म्हणजे उगाच बापाच्या नावाने मिशीला तूप लावीत फिरतो आणि स्वत: मात्र काही करीत नाही, तोही रामदासांच्या मते मूर्ख. असोनिया व्यथ, पथ्य न करी सर्वथा. म्हणजे एखादा आजार आहे आणि तरीही कुपथ्य करतोय.. तोही मूर्खच. आपणास जेथे मान, तेथे अखंड करी गमन. तोही रामदासांच्या मते मूर्ख. परस्त्रीसी प्रेमा धरी, श्वशुरगृही वास करी. याचीही गणना त्यांनी मूर्खातच केलेली आहे. घरी विवेक उमजे, आणि सभेमधे लाजे, शब्द बोलता निर्बुजे, तो येक मूर्ख. अशी उदाहरणे आपण अनेक बघतो. घरी बडबड करतात. पण चारचौघांत बोलायची वेळ आली की लाजतात, हा एक मूर्खपणाच. तस्कारासी ओळखी सांगे, देखिली वस्तु तेचि मागे. यालाही ते मूर्खच म्हणतात आणि त्यात अयोग्य ते काय? दोघे बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे. याला मूर्ख नाही म्हणावे तर काय? कळह पाहता उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे असता खोटे साहे. तो एक मूर्ख. याचा प्रत्यय आपल्याला आजही पदोपदी दिसेल. दोघांची भांडणे कौतुकाने पाहणारे असंख्य असतात. या भांडणात मध्यस्थी न करता असा तमाशा बघत बसलेल्यांची गणना त्यानी मूर्खात केली आहे.

अशाच पद्धतीने रामदास अनेक गोष्टी सहजपणे शिकवतात. या सगळय़ात महत्त्व आहे ते विवेकाला. या गुणाची आज सार्वत्रिक कमतरता भासत असताना रामदासांची शिकवण त्यामुळेच कालबाहय़ वाटत नाही. चांगले जगणे शिकविणारा हा संत म्हणूनच आजही ताजातवाना वाटतो. त्याच्याकडे त्या नजरेने पाहायला हवे, इतकेच.
|| 🏻जय जय रघुवीर समर्थ ||
Buy Here

Saturday, August 20, 2016

कंगव्याची गोष्ट

कंगव्याची गोष्ट
#####################

मागच्या शुक्रवारी सांगोल्याच्या स्टँडवर मित्राची वाट पाहत होतो.अलफाज सोबत होता. बुकस्टॉलवरून मी मटा घेतला. स्टॉलच्या शेजारीच चॉकलेट, बिस्कीट इ. चा स्टॉल आहे. मी अलफाजला तुला काही हवंय का असं विचारलं. त्याने थोडावेळ पाहून हात केला. मी पाहून हसू लागलो, बहाद्दराला काय हवं होतं माहितीय?
'कंगवा' तोही त्याच्या शर्टला मँच करणारा.


मी जाम हसू लागलो. दुकानदार व शेजाारी उभे सर्वचजण हसत होते. अलफाज थोडं लाजला अन छोटा कंगवा खिशात ठेवून दिला.
खाण्याची वस्तू न मागता कंगवा मागणारा अलफाज पाहून ते सगळे हसत होते. मित्र म्हणाला, "बाप नेहमी असाच विचाार करतं जगावेगळा ,मग पोरगं कसं चुकेल?"
यावर मी फक्त हसलो.
अशी तुलना कधीच होऊनये. कारण यातून मुलांची व्यक्तीमत्वं फुलत नाहीत, उलट सावलीत खुरटून जातात. 


कधीच अशी तुलना करू नका. अलफाजचं माझं नातं मैत्रीचं आहे. आम्ही वाद घालतो, चर्चा करतो, एकमेकांच्या उणीवा दाखवतो, जाम वैतागतोही एकमेकांवर.. मी निश्चितच त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करायला शिकलोय.
  
प्रत्येक मूल स्व प्रतिमा जपत असतं अन एक तुमच्या जडणघडणीचं महत्त्वाचं वैशिष्ट असतं. अलफाज कंगवा घेतो म्हणजेच स्वत:चे केस नीटनीटके रहावेत व ते चांगले दिसावेत ही भावना. 


कदाचित माझ्याकडे किंवा त्याच्या दहावीतल्या चाचूंकडे पाहिलेल्या कंगव्यामुळे त्याला तो घ्यावासा वाटला असेल. पण, यातून एकच गोष्ट समोर येते ती ही की "मूल स्वत:ची प्रतिमा जपत असतं" मग ते दिसायला कसं का असेना.

आपण मुलांना सतत येताजाता काळ्या, नकट्या, बुटक्या अशा उपाध्या लावत हिंडत असतो. एकप्रकारे उमलू पाहणारं रोपटं सपासप वार करून आपण ते छाटत असतो. 


हे साधे प्रसंग आहेत पण हे मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करतात. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं कुणी म्हटलेलं खपतं का?


 नाही ना!! मग मुलांचा विचार कधी करणार?

अर्नेस्ट हेमिंग्वे - 'सिक्स वर्ड स्टोरी'

सोशल मीडियावर आजकाल 'सिक्स वर्ड स्टोरी' हा ट्रेंड भलताच व्हायरल आहे. बहुतांश लोक सहा शब्दांमध्ये जमेल ती गोष्ट सांगतायत. मात्र बऱ्याच जणांना कुणी यावर प्रश्न केला की या ट्रेंडचा नक्की अर्थ काय आहे तर ते कदाचित निरुत्तर होतील ! या ट्रेंडला एक मोठा इतिहास आहे, ७५ वर्षे होतायत या ट्रेंडला ! विश्वास बसत नसेल तर आवर्जून वाचा...

विख्यात अमेरिकन लेखक साहित्यातील नोबल पुरस्कार विजेता अर्नेस्ट हेमिंग्वे एकदा आपल्या लेखक मित्रांसोबत चर्चा करत होता तेंव्हाची ही हकीकत आहे. त्या काळात १९३२ ते १९४५ या काळात हेमिंग्वेचे लेखन इतके गाजले होते की त्यावर तिकीट बारीची मोडतोड करणारे सिनेमे तयार झाले ! मात्र त्याचे सुरुवातीचे दिवस आणि नंतरचे दिवस यात जमीन अस्मानचा फरक असल्याने त्याला लेखक म्हणून जी आयडेंटीटी हवी होती ती मिळाली नव्हती. त्या दिवशी त्याने मित्रांशी बोलता बोलता आपल्यातील सिद्धहस्त लेखकाची प्रौढी मिरवली. यावर त्याच्या मित्रांनी तू जर इतकाच भन्नाट लेखक असशील तर केवळ सहा शब्दात गोष्ट लिहून असं आव्हान त्याला दिलं अन त्यांचं हे आव्हान जिव्हारी लागलेला हेमिंग्वे हळवा झाला अन त्याने लिहून दाखवलं !
तेव्हा हेमिंग्वेनं लिहिलं होतं - 'न वापरलेले, तान्हुल्याचे बूट विक्रीला आहेत......'
( For Sale: Baby shoes, Never worn...)

हेमिंग्वेचे हे शब्द खूपच लोकप्रिय झाले कारण त्यात अनेक गूढ करूण आणि मृदू रंग भरले होते. हेमिंग्वेने मित्रांचे आव्हान स्वीकारून पैज जिंकली खरी मात्र इथून त्याची जगभरात ख्याती वाढली . लोकांनी देखील हा प्रयत्न करून पहिला ! १९९० च्या दशकात युरोपात या गोष्टीचे पुन्हा पेव फुटले अन सोशल मिडिया जेंव्हा तिथं मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला तेंव्हा दरवर्षी जून - जुलै मध्ये Six Word Stories हा ट्रेंड आघाडीवर राहू लागला !

हा ट्रेंड आता सोशल मीडियात याचा काळात झळकतो कारण दरवर्षी २ जुलैला अर्नेस्ट हेमिंग्वेचा स्मरणदिवस औचित्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. आता २ जुलै जवळ आलाय अन ते लोण आपल्या देशातील सोशल मिडीयावर देखील स्वार झालेय. विसाव्या शतकातील अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ लेखक अन Six Word Storiesचा जनक असणारा अर्नेस्ट हेमिंग्वे एक अफलातून आयुष्य जगला अन एक दुर्दैवी शेवटाने गेला !
अर्नेस्ट हेमिंग्वे जगभरात नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. हेमिंग्वेला नोबेल व पुलित्झर हे दोन्ही साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकेतील लेखकांच्या ज्या पिढीला "दि लॉस्ट जनरेशन' संबोधण्यात आले, त्या पिढीचे नेतृत्व अर्नेस्ट हेमिंग्वेने केले. त्याचे जीवन धाडसी व रोमांचक प्रसंगांनी भरलेले आहे. हेमिंग्वेच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये त्याचे हे आगळेवेगळे जीवन प्रकट झाले आहे. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी लेखकाने आपले आयुष्यच पणाला लावले पाहिजे, या मताचा हा लेखक होता. म्हणूनच त्याचे जीवन भन्नाट साहसांनी भरलेले आहे !

हेमिंग्वेचे बालपण ओक पार्क येथे व्यतीत झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर कॉलेजला न जाता त्याने "कान्सास सिटी स्टार' या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कारकीर्द सुरू केली. त्याच वेळेस जगात एक मोठी घटना घडत होती, पहिले महायुद्ध सुरू झाले होते! युद्धात आपणही सहभागी व्हावे, असे त्याला तीव्रतेने वाटू लागले. त्याला सैन्यात जायची खूप इच्छा होती; परंतु डाव्या डोळ्याची दृष्टी अधू असल्याने सैन्यात प्रवेश मिळाला नाही. मग रेडक्रॉस सोसायटीच्या ऍम्ब्युलन्सचा ड्रायव्हर होऊन युद्धभूमीवर जाण्याचे त्याने ठरविले. त्यासाठी शिकागोला जाऊन आवश्‍यक ती शारीरिक परीक्षा दिली व युरोपला जाण्यासाठी जहाजात बसला. बार्डोक्‍स येथून पॅरीसची गाडी पकडून फ्रान्सची सरहद्द ओलांडून इटलीमधील युद्धभूमीवर पोचला. प्रथम इटलीतील मिलान या गावी जखमी सैनिकांना रणभूमीवरून हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे काम पार पाडले. त्यानंतर आल्प्स पर्वताजवळील शिओ गावी पेआवे नदीच्या काठावर खंदकातील सैनिकांना आवश्‍यक वस्तू देत असताना शत्रूने फेकलेल्या बॉंबमुळे हेमिंग्वे जबर जखमी झाला. त्याच्या जवळचा एक सैनिक ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. आसपास मृत्यूचे थैमान सुरू असताना हेमिंग्वेने स्वतःची गंभीर दुखापत विसरून जखमी सहकाऱ्याला वाचविले. हेमिंग्वेला मिलान येथील रेडक्रॉस हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. त्याच्या पायातून धातूचा तुकडा व मशिनगनच्या दोन गोळ्या डॉक्‍टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढल्या. तेथे त्याला अनेक आठवडे उपचार घ्यावा लागला, त्याच्या असाधारण शौर्याकरिता इटली व अमेरिका या दोन देशांकडून शौर्यपदके मिळणार होती. वर्तमानपत्रांनी त्याचे कौतुक तर केलेच; पण शिकागोमध्येही तो "हिरो' झाला होता.

मिलानच्या हॉस्पिटलमध्ये अनेक परिचारिका होत्या व त्या हेमिंग्वेची काळजी घेत होत्या. हेमिंग्वे एका नर्सच्या प्रेमात पडला. तिचे नाव ऍग्नेस व्हॉन कुरीव्हस्की. ती उंच आणि सुंदर होती. तीसुद्धा अमेरिकेचीच होती व तिचे हेमिंग्वेवर अतोनात प्रेम होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली; पण तिने एकदम होकार दिला नाही. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी तो प्रेमात पडला. त्याने युद्धाची भयानकता पाहिली होती. मृत्यूसुद्धा जवळून पाहिला होता. त्याला हवी असलेली "ऍक्‍शन' शिओच्या रणांगणावर अनुभवली होती. ऍग्नेस भेटल्यानंतर जगात आता आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही, असे त्याला वाटू लागले. काही दिवसांनंतर ऍग्नेसची नियुक्ती फ्लॉरेन्स येथील हॉस्पिटलमध्ये झाली. मात्र त्यांच्या प्रेमाची देवाणघेवाण पत्रांतून सुरू राहिली. थोड्या दिवसांनंतर अर्नेस्टने कुबड्या वापरायचे बंद केले व तो काठीच्या आधारे चालू लागला. पाय बरा झाल्यानंतर ते दोघे घोड्यांच्या शर्यतीला गेले. दोघांनी काही काळ एकत्र व्यतीत केला. सभोवतालच्या रणधुमाळीतही त्यांचे प्रेम फुलत गेले. तिला जिथे जिथे पाठविले जाई, तिथे हेमिंग्वे तिला भेटायला जायचा. अखेर युद्ध संपले आणि हेमिंग्वे अमेरिकेत ओक पार्कला परतला. पण त्याचे चित्त मात्र इटलीकडे लागले होते. घरात बसून ऍग्नेसची पत्रे वाचणे त्याला नको वाटायचे. अंथरुणावर पडल्या पडल्या तो इटली, आल्प्स पर्वत आणि ऍग्नेसच्या आठवणीत रमून जायचा. त्याने त्याच्या पायातून काढलेल्या बॉंबच्या पत्र्याचा तुकडा अंगठीमध्ये हिऱ्यासारखा जडवला होता, ती ऍग्नेसची आठवण होती !

१९१९ च्या मार्च महिन्यात ऍग्नेसचे एक पत्र आले आणि हेमिंग्वेला जबर धक्का बसला ! तो आजारी पडला व आपल्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतले. त्याचे त्याच्या बहिणीशी- मार्सेलिनशी विशेष पटायचे. तिनेसुद्धा त्याला बोलते करायचा प्रयत्न केला. वारंवार विचारल्यानंतर हेमिंग्वेने ऍग्नेसच्या पत्राविषयी सांगितले. ती आता अमेरिकेत येणार नव्हती. ती एका इटालियन आर्मी ऑफिसरच्या प्रेमात पडली होती, तिने त्याच्याशी विवाह केला होता. हेमिंग्वे संतापला होता. तो आपल्या तीव्र भावना पेलू शकत नव्हता. नंतरच्या वर्षभरात हेमिंग्वेने युद्धाच्या कथा लिहिल्या व ओक पार्कमध्येच राहिला. त्याचे आईशी पटत नव्हते. तिने त्याला घर सोडायला सांगितले. वाढदिवसादिवशीच त्याने घर सोडले आणि मित्राकडे राहायला गेला. तिथेच त्याची ओळख हॅडली रिचर्डसनशी झाली. ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती; पण दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाहबद्ध झाले. हेमिंग्वेचे लिखाण, त्याचे मासे पकडणे, भटकणे, हसणे, बोलणे सर्वच हॅडलीला आवडले. हेमिंग्वेला पुन्हा "टोरान्टो स्टार' या वृत्तपत्रात युरोपियन प्रतिनिधी म्हणून नोकरी मिळाली. त्याने पॅरीसमध्ये राहायचे असे ठरवले. ते त्याचे अत्यंत आवडते ठिकाण होते.

लेखक व्हायचे, ही हेमिंग्वेची महत्त्वाकांक्षा होती; पण त्याला सुरवातीच्या काळात फार संघर्ष करावा लागला. त्याच्या कथा व पहिली कादंबरी "द सन ऑल्सो रायझेस' संपादकांकडून नाकारल्या जात होत्या. हेमिंग्वे त्या वेळेस गर्ट्रूड स्टेन, एझरा पौंड, जेम्स जॉईस या दिग्गज लेखकांच्या सहवासात पॅरीसमध्ये राहत होता. एके दिवशी पॅरीसच्या लेफ्ट बॅंक येथील एका रेस्टॉरंटमध्ये हेमिंग्वे मित्रासमवेत स्वतःच्या लेखनाच्या अपयशाची चर्चा करीत होता. त्याचा मित्र सहजपणे त्याला म्हणाला, की तू आयुष्यात फार काही दुःख पाहिले नाहीस, सहन केले नाहीस! क्षणातच हेमिंग्वेचा पारा चढला आणि त्याने आपली महायुद्धाच्या काळात घडलेली प्रेमकहाणी त्याला ऐकवली. मित्राने त्याला सल्ला दिला, की हीच प्रेमकथा आता तू लिहून संपादकांकडे व प्रकाशकांकडे पाठव. हेमिंग्वेने त्याचे ऐकले. त्याच्या ऍग्नेसबरोबरच्या प्रेमकथेवर आधारित "ए फेअरवेल टू आर्म्स' या कादंबरीने इतिहास घडविला आणि एका महान कादंबरीकाराचा उदय झाला !

या कादंबरीत हेमिंग्वेने स्वतःच्या ठिकाणी फ्रेडरिक हेन्‍री या पात्राची निर्मिती केली. पहिल्या महायुद्धात तो इटलीतील युद्धात रेडक्रॉस ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर असतो. बॉंबच्या स्फोटात जखमी झाल्यावर मिलानच्या हॉस्पिटलमध्ये कॅथरिन बर्कले या ब्रिटिश नर्सच्या प्रेमात पडतो. युद्ध आणि प्रेम या दोन्ही गोष्टी कादंबरीत समांतर घडत असतात. युद्धापासून दोघेही दूर जाण्याचा प्रयत्न करतात. हेन्‍री आपला लष्करी गणवेश फेकून तिच्या समवेत मोठ्या प्रयासाने स्वित्झर्लंडला जातो. कॅथरीन गरोदर असते. तेथे ते दोघेही काही दिवस आनंदात राहतात; पण बाळंतपणात तिचा मृत्यू होतो. हेन्‍री पुन्हा एकाकी पडतो. या निष्पाप प्रेमकथेत युद्ध हाच प्रेमाचा शत्रू आहे. पहिल्या महायुद्धाची भीषणता दाखवणारी ही कादंबरी फार लोकप्रिय झाली. हेमिंग्वेने कॅपोरेटो येथील सैन्यमाघारीचे हुबेहूब वर्णन केले आहे. अनेक दुःखदायक प्रसंगांचे वर्णन केले आहे. या कादंबरीवरून १९३२ आणि १९५८ मध्ये असे दोन चित्रपट तयार झाले. "द सन ऑल्सो रायझेस' या कादंबरीतही हेमिंग्वेने युद्धातील अपघाताने झालेले परिणाम दाखविले आहेत.

या दोन कादंबऱ्यांपाठोपाठ हेमिंग्वेच्या इतर कादंबऱ्या प्रकाशित झाल्या व खूप गाजल्या. जर्मन, फ्रेंच व इतर भाषांमध्ये त्या अनुवादित झाल्या. वयाच्या चाळिसाव्या वर्षी तो खूप श्रीमंत झाला होता. अमेरिकेत तो "पापा' या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्या रुबाबदार व देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे स्त्रिया आकर्षित व्हायच्या. एका पार्टीत त्याला पॉलीन पीफर भेटली. ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिने आधी हॅडलीशी मैत्री केली मग हेमिंग्वेशी. दोघे खूप जवळ आले होते. हेमिंग्वेने तिच्याशी विवाह केला. स्पेनमधील यादवी युद्धाच्या काळात मार्था गेलहॉर्न या तरुणीशी त्याची गाठ पडली. ती वार्ताहर आणि लेखिका होती. क्‍यूबामध्ये राहायला गेल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केले, पण त्याचे तिच्याशी फार काळ पटले नाही. मेरी वेल्श ही हेमिंग्वेची चौथी आणि शेवटची पत्नी. ती अमेरिकेची परराष्ट्र प्रतिनिधी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडला त्याची तिच्याशी भेट झाली. ते दोघे एकत्र आले व नंतर विवाह केला. आफ्रिकेत त्याचे छोटे विमान जेव्हा जंगलात कोसळले, तेव्हा मेरी त्याच्याबरोबर होती. दोघे जखमी झाले; परंतु वाचले!

हेमिंग्वेचे युद्धाचे आकर्षण कधीही कमी झाले नाही. त्यासाठी त्याने अनेक वेळा आपला जीव धोक्‍यात घातला होता. युद्धकाळात प्रेमात पडण्याचा योग त्याच्या बाबतीत वारंवार आला ! ऍग्नेस, मार्था, मेरी वेल्श त्याला युद्धादरम्यानच भेटल्या. शिकार, मासेमारी, स्पेनमधील बैलांच्या झुंजी पाहणे हे त्याचे छंद त्याच्या साहसी स्वभावाशी मिळतेजुळते होते. "पिलार' या त्याच्या बोटीतून त्याने खूप सागरी प्रवास केला, शिकारीच्या छंदापायी अनेकदा तो आफ्रिकेला गेला, मनमुराद शिकार आणि भटकंती केली. बैलांच्या झुंजीचा थरार अनुभवण्यासाठी स्पेनला गेला. तेथे जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा प्रथम वार्ताहर म्हणून, नंतर सैनिक म्हणून युद्धात सामील झाला. "टोरांटो स्टार'ची नोकरी करीत असताना त्याने टर्की आणि ग्रीस या देशांतील युद्धाचे वार्तांकन केले. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा तो क्‍यूबामध्ये होता. त्याने आपल्या खासगी बोटीला मशिनगन लावून युद्धनौकेप्रमाणे सजवले आणि ऍटलांटिक किनाऱ्यावर गस्त घालण्यास सुरवात केली. पुन्हा वार्ताहर बनून रणभूमीवर पोचला. त्यानंतर जर्मन रॉकेटविरोधी पथकात वायुसेनेत तज्ज्ञ म्हणून काम केले.

१९४४ मध्ये नॉर्मंडी बीचवर झालेल्या बॉंबवर्षावात हेमिंग्वेचा सहभाग होता. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर तो पुन्हा क्‍यूबामध्ये राहायला गेला व लेखन आणि मासेमारीत स्वतःला गुंतवून घेतले. माशाच्या शिकारीच्या अनुभवावर आधारित "द ओल्ड मॅन अँड द सी' ही कादंबरी लिहिली व त्यासाठी १९५२ सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. हेमिंग्वेकडे आता संपत्ती, कीर्ती व प्रतिष्ठा इ. सारे काही होते; परंतु साहसी जीवनाची सवय असलेल्या हेमिंग्वेला विकलांग होऊन मिळमिळीत आयुष्य जगायचे नव्हते. १९६१ मध्ये एकदा तो स्वतःच्या घरातच पाय घसरून पडला. तत्काळ त्याने स्वतःची आवडती बंदूक डोक्‍याला लावली आणि गोळी झाडली ! हेमिंग्वेने रोमांचक व वादळी जीवनप्रवास थांबवला. अगदी अशाच प्रकारे त्यांच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. परंतु आयुष्यात चार वेळा प्रेमविवाह करणारा अन सहा शब्दांची गोष्ट लिहिणारा हेमिंग्वे जिवंत असतानाच दंतकथा बनला होता !

http://sameerbapu.blogspot.in/2016/06/blog-post_95.html?m=1 

इंद्रेशकुमार हजरतबल दर्ग्याला भेट देतात तेव्हा...

इंद्रेशकुमार हजरतबल दर्ग्याला भेट देतात तेव्हा...

संघाचे प्रचारक देशाच्या विविध भागांत प्रतिकूल परिस्थितीतही आपले काम करत असतात. वैयक्तिकरीत्या आलेले अनुभव लिहिण्याची किंवा सार्वजनिकपणे मांडण्याची पद्धत संघात फार रूढ नाही. सामाजिकदृष्ट्या आणि प्रास्ताविकासाठी उपयोगी असलेल्या अनुभवांची तेवढी मांडणी केली जाते. 

सध्या सोशल मीडियावर इंद्रेशकुमार यांच्या एका अनुभवाचा किस्सा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अफलातून अनुभव आहे. धर्मनिरपेक्षतेचा खरा आधार काय असू शकतो, याची प्रचीती तो अनुभव देतो. 


इंद्रेशकुमार संघाचे अखिल भारतीय स्तरावरचे कार्यकर्ते आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंच नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आहे. देशभरातील असंख्य मुस्लिमांचा या संघटनेला चांगला पाठिंबा आहे. इंद्रेशकुमार यांनी आपल्या प्रचारक जीवनातील दीर्घकाळ जम्मू, काश्मीर आणि लेह-लद्दाख मध्ये घालविला आहे. दहशतवादी कारवायांसाठी कुख्यात असलेल्या काश्मीरच्या खोर्‍यात इंद्रेशकुमार आणि संघाच्या विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांची प्रचीती ते काम पाहिल्याशिवाय येऊच शकत नाही. 

आम्ही जेव्हा सिंधू दर्शनाला गेलो होतो, तेव्हा या कामाचा थोडाफार अनुभव घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, टोकाचा संघर्ष करीत, प्रसंगी जीव धोक्यात टाकून या भागात संघ विचाराचे चांगले काम उभे झाले आहे. इंद्रेशजींच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाचा अनुभव आम्हाला संपूर्ण खोर्‍यात ठिकठिकाणी आला. श्रीनगरला राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी आमचे जोरदार स्वागत केले. श्रीनगरातील खीर भवानी मंदिरात याच कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली. सोनमर्ग येथेही आमचे जोरदार स्वागत झाले. हे सर्व कार्यकर्ते इंद्रेशजींच्या कार्याने प्रभावित झालेले होते. 


यात इंद्रेशजींचा एक अनुभव त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. हा अनुभव खूप काही सांगून जाणारा आहे. कथित पुरोगाम्यांची झोप उडवणारा आहे. संघ प्रचारक आपल्या जीवनात या पद्धतीने वागू शकतो यावर त्यांचा कधीच विश्‍वास बसणार नाही. म्हणून हा अनुभव त्यांना विचलित करणारा असू शकतो. 


एकदा इंद्रेशकुमार आपल्या दोन-तीन कार्यकर्त्यांसोबत श्रीनगरच्या ख्यातनाम खीर भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले. परतताना त्यांना हजरतबल दर्ग्यात जाण्याची इच्छा झाली. असे मानले जाते की काश्मीरच्या हजरतबल दर्ग्यात रसूल साहेबांच्या दाढीचा केस जतन करून ठेवला आहे. सोबतचे कार्यकर्ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच हजरतबल दर्ग्यात सैन्याने कारवाई केली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय सेना आणि हिंदू समाजाच्या प्रति त्या परिसरात असंतोषाचे वातावरण आहे. आपण न गेलेलेच बरे. पण इंद्रेशजींनी दर्ग्यावर जायचा आग्रह धरलाच.
तेथे गेल्यावर दर्ग्याच्या बाहेरच सुरक्षाकर्मींनी त्यांना अडवले. मात्र, इंद्रेशजी परतायला तयार नव्हते. शेवटी दर्ग्याच्या आत असलेले खादीम बाहेर आले आणि इंद्रेशजींना ते समजावायला लागले. 


कपाळावर कुंकुम तिलक लावलेल्या संघ प्रचारक असलेल्या इंद्रेशजींनी त्यांना सांगितले, मी इंद्रेशकुमार. म्हणाल तर सनातनी आहे. मी आपले नावही बदलणार नाही आणि धर्मही बदलणार नाही. मला तुमची अरबी, फारसी भाषा येते. पण, मला या दर्ग्यात आपल्याच भाषेत आणि आपल्याच पद्धतीने इबादत करायची आहे. आपण मला प्रार्थना करू द्याल का? या प्रश्‍नाने सारेच खादीम गोंधळले. गेल्या अनेक वर्षांत असा प्रश्‍न त्यांना कोणी विचारलाच नव्हता. ते म्हणाले, बघा गेल्या दीड-दोनशे वर्षांत असा प्रश्‍न आमच्या समोर कधी आलाच नाही. याचे उत्तरही देणे आम्हाला कठीण आहे. हदीसमध्ये किंवा कुराणातही अशा तर्‍हेच्या प्रश्‍नाचे उत्तर आहे की नाही ते या क्षणाला आम्हाला माहीत नाही. 


इंद्रेशकुमार म्हणाले की, आता हा प्रश्‍न तुमच्या समोर आला आहे. तेव्हा तुम्ही याचे उत्तर शोधलेच पाहिजे. दर्गा कमिटीचे २८ लोक एकत्र बसले. त्यांनी आपआपसात चर्चा केली. पण ते निष्कर्षाप्रत पोहोचू शकत नव्हते. तेव्हा इंद्रेशजी त्यांना म्हणाले की, मी आपली काही मदत करू का? इंद्रेशजी म्हणाले, कुराणात अल्लाहला रब्बुल आलमीन (सारे आलम का रब) म्हटले आहे. म्हणजे तो सर्व दुनियेचा देव आहे. जर तो सगळ्या जगाचा तारणहार आहे, तर त्याच्या जगात मी नाही का? मग मी इथे प्रार्थना का करू शकत नाही. जर तुम्ही मला प्रार्थना करू दिली नाही तर तुम्हाला रब्बुल आलमीनच्या ऐवजी रब्बुल मुसलमीन (फक्त मुसलमानोका रब) असा बदल करावा लागेल. जर आपण ही संज्ञा बदलली तर जगातला इस्लाम तुम्हाला काफिर मानेल. अल्लाह केवळ अरबी आणि फारसीच समजतो असे मानणे चूक आहे. मुका आणि बहिरा जो बोलू शकत नाही, जो ऐकू शकत नाही त्याचीही भाषा अल्लाह समजतो. पशू-पक्ष्यांची भाषा समजतो तर मग माझी भाषा तो का नाही समजणार


हे ऐकून दर्गा कमेटीच्या लोकांनी इंद्रेशजींना दर्ग्यात जाऊन इबादतची परवानगी दिली. मात्र, इंद्रेशकुमार समजदार होते. ते म्हणाले, ही गोष्ट बाहेर कळली तर तुमचा बाकीचा समाज तुमच्यावर दोषारोपण करेल. प्रसंगी हल्ला देखील करेल. परिणामी तुम्ही परवानगी दिली असली, तरी माझ्या एकट्यासाठी दर्ग्याचे दरवाजे उघडू नका. पण आता खादीम ऐकायला तयार नव्हते. ते इंद्रेशजीला म्हणाले, बघा खुदा आमचे ऐकेल न ऐकेल तुमचे मात्र जरूर ऐकेल, असा विश्‍वास आमच्या मनात निर्माण झाला आहे. तेव्हा आपण जरूर दर्ग्यात जाऊन इबादत केली पाहिजे. इंद्रेशजी, खादीम आणि परिसरातील सर्व मुस्लिमांमधले अंतर पूर्णपणे संपले होते. जेव्हा इंद्रेशजी बाहेर पडले, तेव्हा दर्गा कमेटीतल्या लोकांनी त्यांचा सन्मान केला. 


अत्यंत प्रामाणिक भावनेने मांडणी केली तर टोकाच्या समस्या क्षणार्धात संपुष्टात येतात, असा मोठा बोध देणारा हा अनुभव आहे. आपापल्या धर्मग्रंथात दिलेल्या शाश्‍वत मूल्यांकडे कसे बघायचे एवढाच फक्त प्रश्‍न असतो. दृष्टी बदलली की वातावरण बदलते आणि समस्या संपुष्टात येते.


शिवराय कुळकर्णी
९८८१७१७८२७

सांगकाम्या, हरकाम्या आणि अल्लादिन का चिराग

सांगकाम्या, हरकाम्या आणि अल्लादिन का चिराग

सांगकाम्या म्हणजे सांगीतलेले काम, सांगीतलेल्या पद्धतीने करणारी व्यक्ती, हरकाम्या म्हणजे हर एक काम करू शकणारी व्यक्ती, तर ‘अल्लादिन का चिराग’ म्हणजे सांगितलेले हर एक काम सांगितलेल्या पद्धतीने स्वस्त दरात करून देणारी व्यक्ती.

आता चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच की ‘अल्लादिन का चिराग’ या प्रकारातील व्यक्ती अस्तित्वातच नसते. खर तर सांगकामे व हरकामे ह्याही व्यकी अस्तित्त्वात नसतात, त्यामुळे ‘अल्लादिन का चिराग असणे निवळ अशक्य.

पण गंमत अशी आहे की प्रत्येक उद्योजकाचे एक अव्यक्त व अगम्य असे स्वप्न असते की आपल्या पदरी ‘अल्लादिन का चिराग’ असावा. या ‘अल्लादिन का चिराग’ साठी All Rounder, हर हुन्नरी, हनुमान, Man Friday, उजवा हात, पु.ल. चा नारायण अशी नानाविध नावे प्रचलित आहेत.

आता ‘अल्लादिन का चिराग’ अस्तित्वातच नसल्याने उद्योजकाचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ते एक मधला मार्ग निवडतात. आपल्या पदरी असलेल्या ‘चुणचुणीत व आज्ञाधारक व्यक्तीचे रुपांतर ‘अल्लादिन का चिराग’ मध्ये करावयाचा प्रयत्न करतात. पण अस्तित्वात नसलेली व्यक्ती निर्माण करण्याच्या या प्रयत्नात, सुरुवातीला यश जरी आले, तरी कालांतराने अपयश येते.


वारंवार ‘अल्लादिन का चिराग’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात अपयश येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढत जाणाऱ्या अपेक्षा. हाताशी धरलेल्या व्यक्तीमध्ये ‘चुणचुणीतपणा व आज्ञाधारकपणा’ असल्याने व सुरुवातीला अपेक्षा कमी असल्याने यश येते परंतु नंतर अजून जास्त, कमी वेळेत, कमी खर्चात कामे अधिक चांगली करून घेतली जाऊ शकतात ही भावना प्रबळ होते, त्यावर अंमल केला जातो आणि काल पर्यंतचा चुणचुणीत व आज्ञाधारक माणूस अचानक निस्तेज व बंडखोर बनतो किंवा तसा वाटू तरी लागतो.


या सर्व प्रकरणाची दुसरी एक बाजू अशी आहे की मुळातच उद्योजकास ‘अल्लादिन का चिराग’ पदरी असावे असे वाटते का? 


असे वाटण्याचे मला उमजलेले कारण म्हणजे आणखीन एका उद्योजकाकडे अशी व्यक्ती आहे असा झालेला गैरसमज व चुकूनमाकून झालीय तयार अशी व्यक्ती तर काय बहार येईल? हा विचार.....
वारंवार ‘अल्लादिन का चिराग’ निर्माण करत राहण्याचे तोटे म्हणजे चुणचुणीत व आज्ञाधारक व्यक्तींचे निस्तेज होणे, थिजून जाणे किंवा कालांतराने कंपनी बदलणे, उद्योजकांचे निराश होणे, चिडचिड करणे व पर्यायाने कंपनीत तणावग्रस्त वातावरण तयार होणे.


आता यावर उतारा काय? तर त्यांची पंचसुत्री पुढीलप्रमाणे...... 


1) मुळात नेहमी आपण सांगेल ते काम, सांगेल त्या पद्धतीने कमी खर्चात व कमी वेळेत करणारी व्यक्ती या भूतलावर अस्तित्वात नाही हे उद्योजकांने एकदा मान्य करावे.
2) आपले प्रत्येक काम, सांगेल त्या पद्धतीने, कमी खर्चात व कमी वेळेत नेहमी करणारी एखादी व्यक्ती अस्तित्वात नसली तरी, आपले एखादे काम, एकापेक्षा जास्त वेळा, कमी खर्चात व कमी वेळेत करून देणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या पदरी आहेत, हे लक्षात घ्यावे व समाधान मानावे.
3) आपल्या तोडांतून निघालेला प्रत्येक शब्द प्रत्यक्षात यावा असे वाटत असल्यास मुळात शब्द जपून व कमीतकमी बाहेर पडू दयावे.
4) एखाद्यास काम सांगताना दिसेल ‘त्यास, सुचेल ते’ असे न करता कामाच्या प्रकारानुसार व्यक्तीची निवड करावी, तसेच त्या व्यक्तीवर सध्या असलेला ‘कार्याचा बोजा’ समजून घ्यावा.
5) तोंडावर ‘हो’ म्हणून काम न करणारी व्यक्ती, ही काम जमणार नसेल तर तसे सांगणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त घातक असते हे लक्षात घ्यावे.


अधिक काय लिहावे तुम्ही सुज्ञ आहातच.


रणधीर पटवर्धन
९८२२५२७१३२
rspatwardhan@gmail.com

पती-पत्नी

मॅरीड लोकांनी(च) वाचावा (च) असा लेख ...
( हा लेख माझा नव्हे )

गिरिजा व प्रसाद मुंबईला सकाळी एक्‍स्प्रेसने निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी घरी न्याहारी केली. गिरिजा ही पित्तप्रधान व प्रसाद हा कफप्रधान प्रकृतीचा होता. पित्तप्रधान प्रकृतीमुळे गिरिजाचा जठराग्नी प्रदीप्त होता. दोन तासांतच तिला भूक लागली. कर्जतला गिरिजाने वडापाव मागितला. प्रसादला भूक नसल्याने त्याने गिरिजाला वडापाव घेऊन दिला. नंतर दादरजवळ गिरिजाने सॅंडविच खाण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसाद म्हणाला, ‘‘आपण सकाळी बरोबरच न्याहारी केली. तू नंतर वडापाव खाल्लास. आता परत सॅंडवीच मागतेस. तोंडावर जरा बंधन घाल.’’ आपल्या खाण्यावर टीका केल्याने गिरिजाला राग आला व वाद होऊन दिवस खराब गेला. प्रसादला हे कळलं असतं, की पित्तप्रधान प्रकृतीच्या लोकांचं अन्नपचन लवकर होतं, त्यांना वारंवार भूक लागते; तर वाद झाला नसता.

सचिन व हेमा प्रेमळ जोडपं. सचिन वातप्रधान; तर हेमा कफप्रधान प्रकृतीची. कफप्रधान प्रकृतीचे लोक स्थूल असून, ते डुलत-डुलत चालतात. वातप्रधान प्रकृतीचे लोक वेगाने चालतात. सचिन हेमाच्या बरोबर चालताना भरकन पुढे जायचा, त्यामुळे ‘मी तुम्हाला शोभत नाही म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चालत नाही,’ असा गैरसमज करून हेमा वाद घालायची. वातप्रकृतीचे लोक जलद चालतात हे हेमाला ठाऊक असते, तर त्यांची भांडणे टळली असती.


स्त्रिया संपूर्ण दिवसात देहबोली व हावभाव धरून सुमारे २० हजार शब्द बोलतात; तर पुरुष सात हजार शब्द बोलतो. पुरुष दिवसभर घराबाहेर सात हजार शब्दांचा साठा संपवून घरी येतो. स्त्री दिवसभर घरीच असेल, तर तिचा शब्दसाठा शिल्लक असतो. शब्दसाठा संपल्यामुळे पतीची बोलायची इच्छा नसते. पत्नीला मात्र किती बोलू असं होतं. नवरा ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्यास त्याचं आपल्यावर प्रेमच नाही, असं तिला वाटतं व वातावरण बिघडायला सुरुवात होते. पुरुषाचा नैसर्गिक शब्दसाठा सात हजारच असतो, हे पत्नीला माहीत असतं, तर भांडण टळलं असतं. मागच्या पिढीपुढे ही समस्या नसायची. एकत्र कुटुंबात खूप माणसं, त्यामुळे स्त्रीचा २० हजार शब्दांचा साठा पुरा व्हायचा; पण आता मोबाईलवर बोलूनही व नवऱ्यानं प्रतिसाद न दिल्यानं तिचा हा शब्दांचा साठा पूर्ण होत नाही. ती निराश होते व बोलण्याची स्वाभाविक इच्छा पूर्ण न झाल्यानं संबंध बिनसतात.


पती-पत्नी एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादतात आणि आपल्या आवडीनिवडी, सवयी सारख्या असाव्यात, असा आग्रह धरतात. पण आपल्या साथीदाराला निसर्गनियमाला अनुसरून ‘स्पेस’ व स्वातंत्र्य द्यायला हवं. 


एकमेकांना समजून घ्यायला हवं. अहंकाराला तिलांजली देऊन जुळवून घेण्याची मानसिकता ठेवली, तर जीवनवेलीवरच्या फुलांना बहर येईल.

EGO

I go
We go
You go
He goes
She goes
It goes
They go 


But this
EGO
never goes

आपण स्वतःला गुदगुल्या का करू शकत नाही?

वैज्ञानिक खुलासा द्या

आपण स्वतःला गुदगुल्या का करू शकत नाही?
ओके, माझं मत देतो. मुळात पंचेंद्रिये ही गणना कमी आहे. आपल्या स्नायूंतून 'यत्नेन्द्रीय प्रत्यक्ष' हा प्रत्यय येतो म्हणूनच आपल्याला फोर्स कळू शकतो. बॅग जड आहे, झाकण घट्ट बसलय वगैरे. कानामध्ये तोलेन्द्रीयसुध्दा असते ते व्हर्टिकल दिशेचासंदर्भ पुरवत असते.
मुख्य मुद्दा असा की काहीतरी करणारे आपण आणि काहीतरी होणारे आपण हे जाणीवेचे दोन स्पष्ट पवित्रे आहेत. प्रेषण करणारे/ग्रहणकरणारे. कर्त्याचा पवित्रा चालू असताना भोक्त्याचा पवित्रा बंद पडतो