Total Pageviews

Monday, December 2, 2013

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती By Mr.Sudhir Vaidya
१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते कि रोज सकाळी , " गुड मोर्निंग " ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.
२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्ण वापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.
३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .
4. फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.
५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू , ह्या न्यूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्यूज सांगत सुटतात.
७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.
८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दु:ख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.
९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंट करायला कधी येत नाही.
१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.
११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.
१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.
१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.
१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,
१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.
१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.
१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.
१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा ........ हि हि करत असतात.
२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.

सौजन्य: दिलीप पटवर्धन

पत्नी प्रसन्न व्रत

पत्नी प्रसन्न व्रत

संसारात पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला चंद्रसेन मार्गदर्शन घेण्यासाठी सोमदत्त या अनुभवी गुरुकडे गेला, तेव्हा सोमदत्ताने त्यास ‘पत्नी प्रसन्न व्रता’ची माहिती सांगितली. तो म्हणाला-
हे चंद्रसेना, मी आज तुला पत्नी प्रसन्न व्रताची सविस्तर माहिती सांगणार आहे. ती तू भक्तिभावाने श्रवण कर. या व्रताचे पालन करणार्‍याचा संसार सुखाचा होतो याबद्दल शंका बाळगू नकोस. या व्रतामध्ये पत्नीला प्रसन्न ठेवण्यासाठी करावयाचे विधी सांगितले आहेत. सर्व वयोगटातील विवाहित पुरुषांना हे व्रत करता येईल. या व्रतासाठी साधकाने आपली मनोदेवता आपली पत्नीच आहे, हे मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अशा प्रकारची भूमिका एकदा निश्चित केली, की मग या देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. प्रातःकाली पत्नीदेवतेचे दर्शन घेऊनच कार्याला लागावे. निद्रादेवतेने बहाल केलेल्या सुखाची रक्तिम कांती असणार्‍या या देवतेचे रूप प्रातःस्मरणीय असते. हे रुपडे मनात साठवून ठेवल्यास दिवसभर कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि शारीरिक विश्रांतीची गरज उरत नाही. श्रमाला प्रतिष्ठा देणारी ही देवता आहे हे समजून घे.

या व्रतामध्ये, पतीने पत्नीआधी जागे होणे आवश्यक आहे. पत्नीदेवीच्या सेवेसाठी रात्री गोंधळ घातला असेल, तरी पहाटे तिच्या झोपेत व्यत्यय येणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. सर्वप्रथम अंथरूण, पांघरूण, उश्या इत्यादी वस्तू व्यवस्थित घड्या घालून निर्दिष्ट करण्यात आलेल्या जागेवर ठेवून द्याव्यात. पत्नीदेवतेचा स्वतःचा अवतार कसाही असला, तरी भक्त मात्र अजागळ असणे तिला आवडत नसते. यास्तव सेवकाने दाढी, आंघोळ आदी प्रातःकालीन कार्ये ती जागी होण्यापूर्वी पूर्ण करावीत आणि संपूर्ण शुचिर्भूत होऊन, प्रसन्न मुखकमलाने तिला जागे होण्याची विनंती करावी. अशा वेळी फाजील लाडात येणे, म्हणजे स्वतःच्या अपमानाला निमंत्रण होय, हे पक्के ध्यानात ठेवावे. मुखप्रक्षालन वगैरे करून पत्नी तयार होताच चहा करते. कारण, अशा चवीचा आणि मनाला व शरीराला चैतन्य प्राप्त करून देणारा चहा फक्त तिला (आणि तिच्या आईलाच) येतो, यावर उपासकाचा विश्वास असावा. रोज पत्नीच्या हातचा चहा घेताना, ‘तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!… क्या बात है! ‘ हे वाक्य कंटाळा न करता रोज म्हणावे. या वाक्याचा सराव होण्यासाठी सर्रास खोटे बोलता येणे आवश्यक आहे. असा चहा घेतल्यानंतर मनास चैतन्य येवो अथवा न येवो, परंतु शरीराच्या पोट नावाच्या अवयवाची चेतना जागृत होते आणि पायांना हालचाल करून घरातील कोपरा गाठण्यासाठी धावाधाव करावी लागते. तिच्या हातचा चहा घेताच तत्काळ ओक्के.. होत असले, तरी परतताच ‘ तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!.. क्या बात है! ‘ असे मनापासून म्हणावे.
यानंतर ती साफसफाई, स्वयंपाक इत्यादी कष्टाची कामे करत असताना, आसपास घोटाळत तिच्या आई-वडिलांचा विषय काढावा. तिच्या वडिलांच्या आयुष्यातील कर्तृत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करावा. त्यांच्या निर्णयामुळे आपल्या आयुष्याचे तीन-तेरा वाजलेले असले, तरी त्यांचे निर्णय किती अचूक असतात याचे कौतुक करावे.

यानंतर पत्नीच्या आईच्या गृहकृत्यदक्षतेची चर्चा करावी. खरे तर तुझ्या आईचे नाव सीता, तारा, मंदोदरी, अहिल्या, द्रौपदी या पंचकन्यांच्या जोडीनेच घेणे आवश्यक आहे असा सूर लावावा. अशा चर्चेने स्वयंपाक चविष्ट होत असतो आणि ती व्रताच्या योग्य दिशेची पावती असते.
या व्रताचा भाग म्हणून, दररोज पत्नीच्या आई-वडिलांचे कौतुक केले तर व्रताचे रहस्य तिला समजून येऊ शकते आणि आपला कावा तिच्या लक्षात येऊ शकतो.

दुसर्‍या दिवशी, तिचे भाऊ कर्तृत्ववान आहेत पण त्यांना बायका ‘ काहीतरीच ‘ मिळाल्या आहेत अशी प्रस्तावना करावी. बाकीचा प्रबंध ती पूर्ण करते.

तिसर्‍या दिवशी ‘ तिच्या जावा आणि दीर ‘ यांच्या वागण्यामधील खोड्यांची चर्चा करावी, बाकीचा प्रबंध ती पूर्ण करते.

चवथ्या दिवशी ‘ आपले आई-वडील ‘ याविषयी चर्चेला सुरुवात करून द्यावी. बाकीचे व्याख्यान पूर्ण करण्याएवढा मसाला तिच्याकडे असतो.

पाचव्या दिवशी आपल्या बहिणी तथा तिच्या नणंदांचा विषय काढावा. त्या ‘ कित्ती कज्जाग ‘ आहेत यविषयी ती सहज माहिती पुरविते.

सहाव्या दिवशी पुन्हा तिचे आई-वडील या विषयावर यावे आणि याच क्रमाने दररोज चर्चा करून तिला प्रसन्न आणि स्वयंपाक रुचकर करून घ्यावा.

दिवस असा आल्हाददायक गेल्यानंतर सायंकाळ फार महत्त्वाची असते. दररोज सायंकाळच्या खर्चासाठी अतिरिक्त निधीची व्यवस्था करून ठेवावी. शहरातील विविध बागांमध्ये आलटून पालटून जात जावे. पाणी-पुरी, पाव-भाजी, रगडा-पॅटीस, छोले-भटूरे वगैरे जोडीदार पदार्थ खावेत, म्हणजे आपली जोडीदारीण प्रसन्न होते आणि त्याचा प्रत्ययही लगेच येत असतो. बागेत जाण्याचे इतरही अनेक फायदे असतात. इतर महिलांची वेषभूषा अणि केशभूषा यांचा अभ्यास करण्याची संधी पत्नीला मिळत असते. साड्यांमधील नवीन पोत, मंगळसुत्रांचे डिझाईन्स, ब्लाऊझच्या बाह्यांमधील चित्र-विचित्र फॅशन्स, सँडलींची उंच किंवा कमी हिल, जरदोजी वर्कमुळे आलेला उठाव, मॅचिन्ग टिकल्यांचे बाजारात आलेले नवनवीन आकार आणि प्रकार. कर्णभूषणांमधील नावीन्य, भांगामध्ये लावायच्या सिंदुराची लांबी, पंजाबी, पतियाळा, पॅरलल या वस्त्र-प्रावरणांमधील शॉर्ट, मिडियम, लाँग प्रकार इत्यादी समकालीन परिवर्तनाची चाहूल गार्डनमध्ये लागत असते. या विविध प्रकारांमधील आपण नेमके कोणते उचलायचे याचा अभ्यास पत्नी यावेळी करू शकते. अशा अभ्यासाचा एक वेगळाच आनंद तिच्या चेहर्‍यावर दृग्गोचर होतो. अशा वेळी स्वतःच्या पोटात खर्चाच्या भितीने गोळा उठला, तरी चेहर्‍यावर मात्र प्रशंसेचे भाव असणे आवश्यक आहे, हे साधकाने विसरता कामा नये. एखाद्या नवविवाहितेकडे पाहून पत्नीने नाक मुरडले, तर आपणही आपले नाक तीनशे साठ अंशाच्या कोनातून मुरडले पाहिजे. पण बागेमध्ये फिरताना तुझे डोळे भिरभिरते नसावेत. साधकाची नजर स्थिर आणि केवळ आपल्या आराध्य देवतेवरच असणे आवश्यक आहे. क्वचित कधी ‘ मन वढाय वढाय ‘ झाले, तरी नजरेच्या वारूंना संयमाचा आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा या घटकेपावेतो केलेल्या व्रतपालनाचा नाश होऊ शकतो.

याशिवाय जेवताना छान, झक्कास, व्वा.. सुरेख.. अशा उद्गारवाचक शब्दांचा सढळ हाताने वापर करावा म्हणजे तितक्याच सढळ हाताने पदार्थ ताटामध्ये येत असतात. ‘ तुझ्या हातच्या जेवणाची चव कोणत्याही हॉटेलमधील जेवणाला नाही ‘ हे म्हटले तर खरे आणि म्हटले तर तद्दन खोटे वाक्य सर्रास वापरावे. हेच वाक्य हॉटेलमध्ये जेवायला जाण्याची वेळ आली, तर तिथेही खुबीने वापरता येते.
हे चंद्रसेना, वरीलप्रमाणे पत्नी प्रसन्न व्रताचे जो निष्ठेने पालन करील, त्याच्या संसारामध्ये शांतता आणि सौख्य सदैव नांदत राहील याबद्दल तू निःशंक रहा. असे संसार घटस्फोटांपासून शेकडो योजने दूर राहतील. अशा घरांमधील संतती आज्ञाधारक, शिस्तप्रिय आणि आदर्श नागरिक होईल.

या व्रताचे पालन न केल्यास, तशा संसाराचे गलबत दिशाहीन होऊन किनार्‍यावरील खडकावर आदळून त्याचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित!

सौजन्य: विवेक नातू

अपुर्णतेत मजा आहे....

जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..

सोन्याकडून सुवासाची अपेक्षा मुळीच नाही, पण कमीतकमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत ?
अपुर्णतेत मजा आहे; पण माणूस ते कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत ती अपुर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंतच.

माणसं कृती विसरतात , पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात...

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस ’माणूस’ राहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य..

वार्याने उडवून दिलेल्या पाचोळ्याला आपण कुठे पडावं,कसं पडावं, जमिनीवर पडावं की पाण्यावर पडावं असं काही मत असतं का ?

ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की " आता हा असा का वागला ?"

पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बर्याचदा होते..

माझ्या वडिलांनी जे सांगितलं ते लिहिलं ते लिहिताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी करावी......

सौजन्य : मयुरी नेरूरकर.

Saturday, November 9, 2013

काही चारोळ्या खाऊ या

कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नये
हसवता आल नाही तरी रडण्याचे कारण होऊ नये 
-----------
जेव्हा तुम्ही रागात असतात तेव्हा
        कोणताच निर्णय घेऊ नका
जेव्हा तुम्ही आनंदी असतात तेव्हा
        कोणालाही शब्द देऊ नका
-----------------

फुला सारखी हसत राहिलींस....
तर मी खुश आहे,
मोकळेपणाने जगत राहलीस...
तर मी खुश आहे,
मी असं नाही म्हणत कि रोज मला भेट....
दिवसातून फक्त एकदा,
जरी राणी माझी आठवण काढलीस.
तर मी खुश आहे...
---------
परी सारखी नसेल तरी चालेल
पण खरी असली पाहिजे
-------
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला महत्व आहे
मृत्युपेक्षा श्वासाला किंमत असते
प्रेम तर सर्वच करतात - पण प्रेमा पेक्षा विश्वासाला किंमत असते
-------
भिंतित भेग पडली तर भिंत पडते
नात्यात भेग पडली तर भिंत उभी राहते
----
नात्याची गरज असावी - पण गरजेपूरता नव्हे
----
लोक पिझ्झा साठी ३०० रुपये देतात मात्र ३ रुपये कमी करत नाही म्हणून गरीब भाजी वाल्यासोबत वाद घालतात.
----
४००० रुपयाच्या फटाके ४ मिनिटात फोडून लाखों लोकांना धुरात ढकलून आयुष्य खराब करण्यापेक्षा - ४ घास गरिबाला खाऊ घाला ; ४ दिवस नक्कीच चांगला आयुष्य जगाल आणि ४ लोक पण तुमचा नाव काढतील .. सांगायचा माझा काम - बाकी तुमची मर्जी
----
तलाव जेव्हा पाण्याने पुर्ण भरलेला असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात 
जेव्हा तलाव खाली होतो तेव्हा किडे माशांना खात असतात
संधी प्रत्येकाला मिळते - मित्रांनो आपली संधी येण्याची वाट पाहू
-------
चालणारे २ पाय किती विसंगत चालतात
एक पुढे व एक मागे
पुढच्याला अभिमान नसतो आणि मागच्याला अपमान नसतो
कारण त्यांना माहित असता हे सगळा क्षणिक आहे आणि परिस्थिती बदलणार  - यालाच जीवन असे म्हणतात
-----


प्रपोज Idea


एका मुलाने प्रपोज
करताना बोललेले सुंदर
वाक्य.
"जेव्हामी मोठा होईन
आणि माझी मुलगी मला विचारेल
कि,
"बाबा,
तुमचे पहिले
पहिले प्रेम कोण होत"?
तेव्हा मला कपाटातून
जुने फोटो काढून
दाखवायचे नाही आहेत,
मला फक्त माझा हात
वर करून बोटाने
दाखवायचेआहे कि,
"ती किचन मध्ये
उभी आहेना तीच माझे
पहिले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहे.

तुझी वाट पाहताना दिवस

तुझी वाट पाहताना दिवस
संपतात...
पण वाट पाहणं संपत नाही...
आयुष्यावरील तुझी छाप पुसून
टाकणं...
मला अजूनही जमत नाही....
का तुझा सहवास दरवळत राहतो
आजही...???
का खोलवर
झालेल्या जखमा बुझता बुझाता..,
पुन्हा वाहायला लागतात... ?
का ती वेदना नको असतानाही हवीशी
राहते...?
का तुझी आठवण
नको असताना
येतच राहते

इच्छा आहे प्रिये

इच्छा आहे प्रिये
तुला मिळवण्याची..

बाकी कसलीच आशा
नाही ह्या प्रियकराची...

तक्रार माझ्याकडे
नाही देवाकडे कर..

काय गरज होती
तुला इतके सुंदर बनविण्याची ?

लहानपणी वाटे, एक बहिण असावी..

ही कविता खास ज्यांना बहिण नाही त्याच्यासाठी...
.
लहानपणी वाटे, 

एक बहिण असावी..
एक गोळी तीला चिमणीच्या दाताने
तोडून द्यावी,
उरलेली अर्धीही तीलाचं द्यावी..♥♥ .
एक बहिण असावी..
पाठीशी तीला घालताना आईची बोलणी नंतर
मात्र तीलाचं एक ठेऊन द्यावी..♥♥ एक
बहिण असावी..
चीडवायला तीला फार मजा यावी, पण
रडू ती लागताचं
जिवाची घालमेल व्हावी..♥♥
.
एक बहिण असावी.....
पहिल्या माझ्या पगारात तीला छान
गिफ्ट
आणावी, आणि गिफ्ट हातात पडताचं तिने
वर पार्टीही उकळावी..♥♥
.
एक बहिण असावी..
असेचं आणि बरेचं नेहमी मला वाटे, एक
बहिण असावी..♥♥
.
पण?????
मला बहिण का नसावी? त्यामुळे
राखी पोर्णिमा माझी सूनीसुनी जावी..
आणि अचानक आयुष्यात माझ्या एक
छोटुकली यावी..
सख्खी नसेल तरीही सख्ख्याहून
सख्खी वाटावी..♥♥
.
एक बहिण यावी..
तीच्याशी बोलताना माझी सुःख दुःखे
सांगावी,
सांगता सांगता तीचीही जाणून
घ्यावी..♥♥
.
खरचं घर मुलीशिवाय अपूर्ण असतं..

Sunday, November 4, 2012

मी डोलकर डोलकर डोलकर दयार्चा राजा - mi dolkar dolkar dolkar daryacha raja - koli geet

Lyricist
- Shanta Shelke
Singer
- Lata Mangeshkar - Hemant Kumar
Music Director
- Hridayanath Mangeshkar

मी डोलकर डोलकर डोलकर दयार्चा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो नेसलय अंजिरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमाळता वार्‍यान घेतय झेपा
नथ नाकान साजिरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलीवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतय मौजा

या गो दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगर लाटा
कवा उदानवारा शिराला येतय फारु
कवा पान्यातूनी आभाला भिरतंय तारु
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
जाते पान्यान भिजून धराती
येते भेटाया तसाच भरतार माजा

भल्या सकालला आभाल झुकतंय हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी रापण टाकतो जाळी
धन दर्याचं लुटून भरातो डाली
रात पुनवेचं चांदन प्याली
कशी चांदीची मासोली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा


Dev Jari Maj Kadhi (Movie - Molkarin) Singer - Asha Bhosle

Song - Dev Jari Maj Kadhi
Movie - Molkarin (1963)
Lyrics - P. Savalaram
Music - Vasant Desai
Singer - Asha Bhosle
Actors - Sulochana

गीत - देव जरी मज कधी
चित्रपट - मोलकरीण (१९६३)
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत देसाई
स्वर - आशा भोसले
कलाकार - सुलोचना

गीत - देव जरी मज कधी भेटला, माग हवे तो माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला

कृष्णा गोदा स्नान घालु दे, रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी, मुक्ताई निजवु दे तुजला

शिवरायाच्या मागिन शौर्या, कर्णाच्या घेइन औदार्या
ध्रुव, चिलयाच्या अभंग प्रेमा, लाभु दे चिमण्या राजाला

लेक लाडकी या घरची - Lata Mangeshkar



गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - कन्यादान (१९६०)
--------------------------------------

लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची

सौख्यात वाढलेली
प्रेमात नाहलेली
कळिकळि फुलून ही चढते
मंडपी वेल मायेची

संपताच भातुकली
चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदुखुदू हसते
होऊनी नवरी लग्नाची

हे माहेर, सासर ते
ही काशी, रामेश्वर ते
उजळिते कळस दो घरचे
चंद्रिका पूर्ण चंद्राची

जीवनात ही घडी अशीच राहू दे - Lata Mangeshkar, Yashwant Dev

Song - Jeevanat hee ghadi
Movie - Kamapurta Mama (1965)
Lyrics - Yashwant Dev
Music - Yashwant Dev
Singer - Lata Mangeshkar

गीत - जीवनात ही घडी
चित्रपट-कामा पुरता मामा (१९६५)
गीतकार - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - लता मंगेशकर

Lyrics :- जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविणका अर्थ वेगळा
स्पशार्तून अंग अंग धूंद होऊ दे

पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे

विठ्ठला, तू वेडा कुंभार -- Sudhir Phadake, Movie Prapanch, Lyrics - Ga Di Madgulkar

गीत - ग. दि, माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - प्रपंच (१९६१)
राग - तिलककामोद, देस (नादवेध

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार !

माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !

तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडीसी
न कळे यातुन काय जोडीसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !

सागरा प्राण तळमळला --- Vir Vinayak Damodar Sawarkar

VIR SAWARKAR --- Ne Majasi Ne Parat Matrubhumila

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला
 
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला



हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा by Vir Sawarkar

Singer- Lata Mangeshkar
Music- Hridaynath Mangeshkar
Lyrics- V.D. Savarkar

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा