Total Pageviews

Thursday, May 29, 2014

तुमच्या आई वडिलांना कधीच दुख: देऊ नका...

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो,

 ते विचारतात "बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत."

मुलगा : "मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन."

बाप: "ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील!" (रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो.

घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो.)

काही दिवसानंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते.

त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते.

ती असते.. "आज माझ्या सोन्याला ताप आला होता, 'Taxi' न मिळाल्यामु ळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे..(वेळ : रात्री २ वाजता..)"

त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण आता सर्व संपले होते.

 तुमच्या आई वडिलांना कधीच दुख: देऊ नका. तुम्ही आज जे काही आहात ते त्यांच्यामुळे..त्यामुळे त्यांना त्रास होईल असं कधीच वागू नका..

Wednesday, May 28, 2014

"आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?

"आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?
"आई-बाप" "आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, ऍडव्हान्स पाठबळ असतं
तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं
"आई" तुमच्या आयुष्याच्या गाडीच योग्य दिशा देणार "स्टीयरिंग" असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे " अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं
"आईच प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणार "बँक बॅलन्स" असतं
बाप म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असत
आई म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच "नेटवर्क" असतं
कधी "नेटवर्क"थकले; तर बाप, अर्जेंट "एस.एम.एस." असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, "अँटी व्हायरस " असतं
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, "बाप" हे "क्वारनटाईन" बटण असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, 'शिक्षणाच विद्यापीठ' असते
"बाप" म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते
"आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कमर् कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर "बाप" हा जवळचा मित्र असतो
आई म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा बाप एक संत असतो
आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं
बाप म्हणजे, भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन्हाड असतं
कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं
आणि भलेमोठे संकट आलेकी उच्चारात "बाप रे बाप" असतं
परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं
म्हणूनच म्हणतो, परमेश्वर, अध्यात्म, भगवंत- हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं "आई-बाप" हे "कनेक्शन" असतं
"आई-बाप" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव"-- 'पितृ देवो भव" म्हणलेलं असतं

Thursday, May 8, 2014

Political Sunglasses - My perspective


जो तो किनाऱ्याचा अर्थ शोधतोय ....

सगळे धावतायत नुसते.....तेही आतल्या आत....
काय शोधतायत काय नक्की??....
ज्याला त्याला हात हवाय...साथीचा....
जो जगाला 'रिकामा' दिसतोय त्याला हि आणि जो जगाला 'भरलेला' दिसतोय त्याला हि.....
माणूस जातीचा इतका तिरस्कार करूनही ज्याला त्याला माणूसच हवाय...साथीचा....
ज्याला त्याला वाटायचंय....स्वत:चं दु:ख....ते वाटायला माणूस हवाय.....साथीचा....
प्रत्येकाला कात टाकून पुढे जावसं वाटतंय....म्हणजे याचा अर्थ....मागे जे काही घडलंय ते फक्त दु:खच होतं का ?
ते इतकं निरर्थक होतं का?...जर निरर्थक होतं तर तसं जगायला कुणी जबरदस्ती केली होती का?

प्रत्येकजण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतोय....काही स्वत: केलेल्या गोष्टींचा तर काही दुसऱ्यांनी केलेल्या.....
दोष देतोय....दोष घेतोय....काही बोलून दाखवतोय....काही मनात बोलतोय....
काहींना नियतीने गिळलेले छळतंय....काहींना मिळालेलं मिळूनही छळतंय..
छळ कायम आहे....पण बळ नाहीयेय....
कळ कायम आहे....पण इथून पळ नाहीये....
ज्याचं त्याचं जहाज किनारा शोधतंय....
पण किनारा म्हणजे नक्की काय ? ....जो तो किनाऱ्याचा अर्थ शोधतोय ....

Monday, December 2, 2013

परीस शोध

एक माणूस परीस ( पारस )
शोधायला निघाला....
त्यासाठी रस्त्यात जो दगडयेईल
तो घ्यायचा,
गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकू
द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू
झाला दिवस
गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल
झाला नाही ....दगड
घ्यायचा, साखळीला लावायचाआणि मग
तो फेकून द्यायचा.. शेवटी तो माणूस
म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि त
ो आपले शेवटचे श्वास मोजत
होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष
त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचाआणि फेकून
द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच
गेले नाही....
 

तात्पर्य:--
प्रत्येकाच्या जीवनातएकदा तरी परीस
येत
असतो... कधी आई- वडिलांच्या रूपाने,तर
कधी भाऊ- बहीनीच्या नात्याने... तर
कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ..
कोणत्या नाकोणत्या रूपात
तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने
करीत असतो...... आपणजे
काही असतो किवा बनतो त्यात
त्यांचा बराच
हातभार असतो . पणफार कमी लोक
या परीसाला ओळखू शकतात..!

म्हणुन मला "जगायला" आवडते.

आहात तुम्ही 'सावरायला' म्हणुन
'पडायला' आवडते,

आहात तुम्ही 'हसवायला' म्हणुन
'रडायला' आवडते,

आहात तुम्ही 'समजवायला' म्हणुन
'चुकायला' आवडते,

माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे "मित्र"
म्हणुन मला "जगायला" आवडते.

एक उकडीचा मोदक दुसर्‍या मोदकाला

एक उकडीचा मोदक दुसर्‍या मोदकाला भेटल्यावर काय म्हणेल ?
.
.
.
....
काय सॉल्लिड उकडतंय ना !!!


------

एका अट्टल दारुड्याला प्रश्ण विचारला...
"तुमचे आवडते कावि कोण?"
दारुडा.."मंगेश पाडगावकर."

"अरे वा ....त्यांची कोणति कविता आवडते?"

"झोपाळ्या वाचुन झुलायचे"...!!!


============
 

पुणेरी एकदम तिखट

पुणेरी एकदम तिखट..

पाहुणा : अहो camp ला जायला कुठली बस पकडू ??

पुणेरी : २० number ची पकडा. . .
.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर. . ??
.
पुणेरी : १० १० च्या २ पकडा.....!!

एक भन्नाट जादू

एक भन्नाट जादू....

एका ग्लासमध्ये थंडगार पाणी घ्या.

ते आपल्या बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर ओता..

तो माणूस लगेच गरम होईल......

माणसा रे माणसा

पैसे नसतात तेव्हा
झाडपाला खाऊनही दिवस काढायची माणसाची तयारी असते.
पैसा आल्यावर
हाच झाडपाला तो हॉटेलात ऑर्डर करतो.

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?

तुमची स्वत:ची किंमत स्वत:च निर्माण करा

एकदा एक प्रवासी जोडपे एका बसमधून पर्वतीय प्रदेशातून
प्रवास करीत होते.
बराच प्रवास केल्यावर एका ठिकाणी त्यांनी बसमधून
उतरण्याचा निर्णय घेतला. ते प्रवासी
जोडपे उतरल्यावर बस पुन्हा सुरु
झाली आणि आपल्या मार्गाला लागली. काही अंतर
गेल्यावर त्या बसवर डोंगरातून गडगडत येणारा एक मोठा दगड
पडला आणि त्याने बसमधील
सगळ्या प्रवाशांचा मृत्यू ओढवला. हे दृश्य पाहून त्या बसमधून
उतरलेल्या प्रवासी
जोडप्याने म्हटले,......
अरेरे ! हे काय झाले. आम्ही त्या बसमध्ये असतो तर बरे
झाले असते.........
तुम्हाला काय वाटते, त्या जोडप्याने असे का म्हटले
असेल?..........
जरा डोके खाजवा ............
काय म्हणता डोके चालत नाही.
अरे ! अशी हार मानू नका.........
थोडे आणखी प्रयत्न करा. उत्तर नक्की सापडेल.
काय म्हणता उत्तर सापडत नाहीय.
ठीक आहे
उत्तर आहे..........
जर का ते जोडपे उतरण्याऐवजी त्या बसमध्येच असते, तर
त्याना जो उतरण्यासाठी वेळ
लागला तो न लागता, बस न थांबताच तशीच पुढे गेली असती.
म्हणजेच ती बस दगड पडण्याच्या वेळी तेथे नसती.
ती काही अंतर
पुढे गेलेली असती आणि म्हणूनच हा अपघाताचा प्रसंग आलाच
नसता.
याचाच अर्थ असा की जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार
करा आणि दुस-यांना मदत
करण्यासाठी सदैव तत्पर रहा.
जीवनामध्ये बरेच वेळा यशाच्या विरोधी अपयश नसून,
हाती घेतलेले कार्य अर्धवट
सोडून जाणे असते. (म्हणजेच पलायन होय.)
विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.
काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका.
त्यासाठी झगडा,
झटापटी करा आणि त्या घडवून आणा.
तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका.
तुम्ही तुमची स्वत:ची किंमत स्वत:च निर्माण करा!!!

17 camels and 3 sons...

A father left 17 camels as an asset for his three sons.

When the father passed away, his sons opened up the will. The Will of the father stated that the eldest son should get half of 17 camels while the middle son should be given 1/3rd (one-third).The youngest son should be given 1/9th (one-ninth) of the 17 camels.

As it is not possible to divide 17 into half or 17 by 3 or 17 by 9, three sons started to fight with each other.

So, the three sons decided to go to a wise man.
The wise man listened patiently about the Will. The wise man, after giving this thought, brought one camel of his own and added the same to 17. That increased the total to 18 camels.

Now, he started reading the deceased father’s will.
Half of 18 = 9. So he gave the eldest son 9 camels.
1/3rd of 18 = 6. So he gave the middle son 6 camels.
1/9th of 18 = 2. So he gave the youngest son 2 camels.

Now add this up: 9 plus 6 plus 2 is 17 and this leaves one camel, which the wise man took back.

MORAL: The attitude of negotiation and problem solving is to find the 18th camel i.e. the common ground. Once a person is able to find the common ground, the issue is resolved. It is difficult at times. However, to reach a solution, the first step is to believe that there is a solution. If we think that there is no solution, we won’t be able to reach any!

If you liked this story… please share with friends, family and children…
You might spark a thought, inspire and possibly change a life forever!!

क्या बात है...........

पुस्तकाची पाने पलटताना एक विचार
मनात येतो

आयुष्याची पाने अशीच पलटली तर
"क्या बात है" ...!!!

स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण
खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर
"क्या बात है"..!!!

काही लोक स्वार्था साठी शोधतात
मला पण
निस्वार्थीपणे कोणी शोधात आलं तर
"क्या बात है"...!!!

मन मारून काळीज कोणीही घेऊन जाईल
माझे पण
मन जिंकून काळीज नेणारा भेटला तर
"क्या बात है" ...!!!

जिवंतपणी तर सगळ्यांना
मी हसवत ठेवीन
पण...
.
.
.
.
.
.

माझ्या मरणावरही, कोण अश्रूत हसले तर
"क्या बात है" ...!!!

आत्माही माझा असाच हसत- हसत देईन
पण
त्या राखेतहि मला कोण शोधत बसले तर..

''क्या बात है ..."

आयुष्य

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात यापेक्षा तुमच्या मुळे किती जण आनंदी आहेत ह्याला महत्व आहे..

जगातील दोन कठीण कामे---
(1) आपल्या डोक्यातील विचार दुस-याच्या डोक्यात उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात  आणणे.
* पहिल्या कामात हुशार  त्याला 'शिक्षक' म्हणतात.
* दुस-या कामात हुशार त्याला 'व्यापारी' म्हणतात.

* आणि दोन्ही कामात हुशार तिला 'बायको' म्हणतात.

आयुष्य म्हणजे काय..

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते,
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते,
सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता,
पण प्रत्येक वेळी नवनवीन गाठ बनत जाते,
दाखविणाऱ्याला वाट माहित नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते,
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी,
"अनुभव" म्हणजे काय हे तेव्हाच कळते...

असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही...
असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही..
असे हृद्य बनवा कि ज्याला तडा जाणार नाही...
असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही...
असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही...
असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही...