Total Pageviews

Thursday, May 29, 2014

तुझा हट्ट

तुझा हट्ट

तू मला मा्गावं काहीतरी
मी जिवाचं मग रान करावं
हौस पुरी झाली एकदा की
तू खुदकन गोडसं हसावं

परत तुझा नवीन हट्ट
मी तो अलगद पुरवण्याचा
स्मितभर हसतो अता मी
उगा प्रयत्न करतो नभांतून
शेवटचा टाटा करण्याचा...

तेंव्हा पाऊस पडत होता..............

तेंव्हा पाऊस पडत होता..............
आठवतो आपला श्वास जसा
एकमेकांत मिसळला होता
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता

वाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तर
इतकं दुःख सोसावं लागेल
आज पर्यंत श्वासांनी मला, पण
यापुढे त्यांना पोसावं लागेल

तुझ्या आठवणींच्या साखर झोपेत
माझी कालची रात्र गोडव्यात सरली
पुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पण
काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली

'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला

माझं दुःख बघवलं नाही
म्हणून एक ढग रडत होता
तुमचं आपलं काहीतरीचं
म्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय

शांत चेहरा, ना शब्द काही,
डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला.
मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला.

स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,
स्वप्णाना तुटतांना पाहिलय,
होय, मी आज...
माज़या बापाला रडतांना पाहिलय.

आई,मला सायकल हवी,
आई म्हणायची बेटा पैसे नाही,
दुसर्या दिवशी माज़या हातात चावी असायची.
मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,
पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,कारण
त्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.

मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.

मोठा झालो खर्च वाढला,
मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,
सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,
छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,
पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.
तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,
मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,
पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.

त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,
माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,
होय, मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.

तो जळत राहिला वात बनून,
माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,
मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,
स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,
चुक कळली मला,
त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,
त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.
पण, आज तो या जगात नाही.

तरीही....
माज़या प्रत्येक संकटात,
मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलय
होय, मी आज...
माज़या बापाला रडतांना पाहिलय.


निशब्द (देव)

प्रेमळ पत्नीसाठी दोन शब्द...

प्रेमळ पत्नीसाठी दोन शब्द...
°°° आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी °°°
°°° तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी °°°
°°° अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते °°°
°°° स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते °°°
°°° अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का °°°
°°° तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का °°°
°°° कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे °°°
°°° वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे °°°
°°° भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने °°°
°°° स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे °°°
°°° साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे °°°
°°° सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने °°°
°°° मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे °°°
°°° वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे °°°
°°° वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे °°°
°°° पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे °°°
°°° झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे °°°
°°° जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे °°°
°°° हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे °°°
°°° नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे °°°
°°° अशी काहीशी साथ दे °°°
°°° मित्रत्वाचा हात दे °°°

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
सुरेश भट

तुमच्या आई वडिलांना कधीच दुख: देऊ नका...

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो,

 ते विचारतात "बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत."

मुलगा : "मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन."

बाप: "ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील!" (रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो.

घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो.)

काही दिवसानंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते.

त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते.

ती असते.. "आज माझ्या सोन्याला ताप आला होता, 'Taxi' न मिळाल्यामु ळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे..(वेळ : रात्री २ वाजता..)"

त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण आता सर्व संपले होते.

 तुमच्या आई वडिलांना कधीच दुख: देऊ नका. तुम्ही आज जे काही आहात ते त्यांच्यामुळे..त्यामुळे त्यांना त्रास होईल असं कधीच वागू नका..

Wednesday, May 28, 2014

"आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?

"आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?
"आई-बाप" "आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, ऍडव्हान्स पाठबळ असतं
तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं
"आई" तुमच्या आयुष्याच्या गाडीच योग्य दिशा देणार "स्टीयरिंग" असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे " अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं
"आईच प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणार "बँक बॅलन्स" असतं
बाप म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असत
आई म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच "नेटवर्क" असतं
कधी "नेटवर्क"थकले; तर बाप, अर्जेंट "एस.एम.एस." असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, "अँटी व्हायरस " असतं
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, "बाप" हे "क्वारनटाईन" बटण असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, 'शिक्षणाच विद्यापीठ' असते
"बाप" म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते
"आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कमर् कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर "बाप" हा जवळचा मित्र असतो
आई म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा बाप एक संत असतो
आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं
बाप म्हणजे, भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन्हाड असतं
कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं
आणि भलेमोठे संकट आलेकी उच्चारात "बाप रे बाप" असतं
परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं
म्हणूनच म्हणतो, परमेश्वर, अध्यात्म, भगवंत- हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं "आई-बाप" हे "कनेक्शन" असतं
"आई-बाप" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव"-- 'पितृ देवो भव" म्हणलेलं असतं

Thursday, May 8, 2014

Political Sunglasses - My perspective


जो तो किनाऱ्याचा अर्थ शोधतोय ....

सगळे धावतायत नुसते.....तेही आतल्या आत....
काय शोधतायत काय नक्की??....
ज्याला त्याला हात हवाय...साथीचा....
जो जगाला 'रिकामा' दिसतोय त्याला हि आणि जो जगाला 'भरलेला' दिसतोय त्याला हि.....
माणूस जातीचा इतका तिरस्कार करूनही ज्याला त्याला माणूसच हवाय...साथीचा....
ज्याला त्याला वाटायचंय....स्वत:चं दु:ख....ते वाटायला माणूस हवाय.....साथीचा....
प्रत्येकाला कात टाकून पुढे जावसं वाटतंय....म्हणजे याचा अर्थ....मागे जे काही घडलंय ते फक्त दु:खच होतं का ?
ते इतकं निरर्थक होतं का?...जर निरर्थक होतं तर तसं जगायला कुणी जबरदस्ती केली होती का?

प्रत्येकजण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतोय....काही स्वत: केलेल्या गोष्टींचा तर काही दुसऱ्यांनी केलेल्या.....
दोष देतोय....दोष घेतोय....काही बोलून दाखवतोय....काही मनात बोलतोय....
काहींना नियतीने गिळलेले छळतंय....काहींना मिळालेलं मिळूनही छळतंय..
छळ कायम आहे....पण बळ नाहीयेय....
कळ कायम आहे....पण इथून पळ नाहीये....
ज्याचं त्याचं जहाज किनारा शोधतंय....
पण किनारा म्हणजे नक्की काय ? ....जो तो किनाऱ्याचा अर्थ शोधतोय ....

Monday, December 2, 2013

परीस शोध

एक माणूस परीस ( पारस )
शोधायला निघाला....
त्यासाठी रस्त्यात जो दगडयेईल
तो घ्यायचा,
गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकू
द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू
झाला दिवस
गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल
झाला नाही ....दगड
घ्यायचा, साखळीला लावायचाआणि मग
तो फेकून द्यायचा.. शेवटी तो माणूस
म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि त
ो आपले शेवटचे श्वास मोजत
होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष
त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचाआणि फेकून
द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच
गेले नाही....
 

तात्पर्य:--
प्रत्येकाच्या जीवनातएकदा तरी परीस
येत
असतो... कधी आई- वडिलांच्या रूपाने,तर
कधी भाऊ- बहीनीच्या नात्याने... तर
कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ..
कोणत्या नाकोणत्या रूपात
तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने
करीत असतो...... आपणजे
काही असतो किवा बनतो त्यात
त्यांचा बराच
हातभार असतो . पणफार कमी लोक
या परीसाला ओळखू शकतात..!

म्हणुन मला "जगायला" आवडते.

आहात तुम्ही 'सावरायला' म्हणुन
'पडायला' आवडते,

आहात तुम्ही 'हसवायला' म्हणुन
'रडायला' आवडते,

आहात तुम्ही 'समजवायला' म्हणुन
'चुकायला' आवडते,

माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे "मित्र"
म्हणुन मला "जगायला" आवडते.

एक उकडीचा मोदक दुसर्‍या मोदकाला

एक उकडीचा मोदक दुसर्‍या मोदकाला भेटल्यावर काय म्हणेल ?
.
.
.
....
काय सॉल्लिड उकडतंय ना !!!


------

एका अट्टल दारुड्याला प्रश्ण विचारला...
"तुमचे आवडते कावि कोण?"
दारुडा.."मंगेश पाडगावकर."

"अरे वा ....त्यांची कोणति कविता आवडते?"

"झोपाळ्या वाचुन झुलायचे"...!!!


============
 

पुणेरी एकदम तिखट

पुणेरी एकदम तिखट..

पाहुणा : अहो camp ला जायला कुठली बस पकडू ??

पुणेरी : २० number ची पकडा. . .
.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर. . ??
.
पुणेरी : १० १० च्या २ पकडा.....!!

एक भन्नाट जादू

एक भन्नाट जादू....

एका ग्लासमध्ये थंडगार पाणी घ्या.

ते आपल्या बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर ओता..

तो माणूस लगेच गरम होईल......

माणसा रे माणसा

पैसे नसतात तेव्हा
झाडपाला खाऊनही दिवस काढायची माणसाची तयारी असते.
पैसा आल्यावर
हाच झाडपाला तो हॉटेलात ऑर्डर करतो.

पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.

पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते.
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.

माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.

पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.

पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.

माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?