Total Pageviews

Monday, July 14, 2014

भारत निर्माण -- by Jayendra Jayant Salgaonkar

चला तर! आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करू या! !प्रिय जनहो,
आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करुया!
एका अमेरिकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला “मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टीका करण्यामधे कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही. अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुध्धा आपल्या जंगलाला एव्हढी नांवे ठेवत नाही. अमेरिकेमधे आपल्या देशाला नांवे ठेवणे हे आपल्या आईला नांवे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशांत बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा का?” हा अमेरिकन माणूस स्टॅनफोर्ड या प्रसिध्ध विद्यापिठातील नोबेल पारितोषिक विजेता प्रोफेसर होता.अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगितले, “तुम्ही भारतीय लोक एक चूक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इंग्लंड-अमेरिकेशी करत असता. पण या देशांना स्वातंत्र्य मिळून 200 वर्षे होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून फक्त 60 वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणे म्हणजे 10 वर्षांच्या मुलाची तुलना 30 वर्षांच्या माणसाबरोबर करण्यासारखे आहे.”
भारतातील आत्ताच्या अनागोंदिबद्दल ते म्हणतात, “तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसिडेन्ट असो किंवा ब्रिटनचा प्राइम मिनिस्टर असो, त्यांना थोडा- फार तरी ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो. पण अनुभव नसताना सुद्धा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी युरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणे म्हणजे युरोपातील एका देशातुन दुसर्‍या देशात जाण्यासारखे आहे. युरोपमधे देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही तर सरकार, नियम, चलन सगळेच बदलते (त्या वेळी युरो आस्तित्वात नव्हते). पण भारतात तसे नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल. पण देश बदलत नाही. एव्हढी विविधता असूनही तुमचा देश अजूनही एकसंध आहे हीच आमच्या दृष्टीने मोठी कौतुकाची गोष्ट आहे. युरोपीयन लोकांना हे अजून जमलेले नाही. आता भारतामधे सत्तेवर येणार्‍या लोकांमधे ऍडमिनिस्ट्रेशनचा(प्रशासनाचा)अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडून देताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.”
अमेरीकेतील एक सिनेटर आहेत. ते भारत द्वेष्टे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्यांची एक मुलाखत नुकतीच वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे, “भारतापुढे आज जी संकटे आहेत. आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लगला, ती सगळी संकटे “एकमेवद्वितीय (Unique) आहेत.जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेले नाही. त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्यूशन्स मिळणार नाहीत. भारतीयांनाच या समस्यांवर तोडगा शोधून काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक यामधे यशस्वी होतील. एव्हढे असूनही भारताने जी प्रगती केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे.” हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात.
असाच एक अमेरिकन इंजिनीयर भेटला. तो काही वर्षे भारतात राहून गेला आहे. भारतामध्ये प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना अहे त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली, “तुमच्या देशामधे सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक सरकारवर फार अवलंबून आहात. आमच्याकडे असे नाही. आम्ही सरकारवर कमीत कमी अवलंबून असतो. पुष्कळशा गोष्टी आमच्या आम्ही करत असतो. तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनिक स्वच्छता, वाहतुकिच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा , करप्शन नसणे या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे केले म्हणून दिसत नाहीत. उलट आमच्या सरकारचे म्हणणे आहे की कायदे करुन किंवा कायद्याचा बडगा दाखवून लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहून कायदेकानून पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणापासूनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत, तसेच नागरीक म्हणून आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवले जाते.”
मी मुद्दामच अमेरिकन लोकांचे उदाहरण दिले आहे. कारण अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावे म्हणून.येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्‍वातंत्र्य मिळून ६७ वर्षे होत आहे. त्यानिमित्त आपण आपल्या देशाविषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणे जरुरीचे आहे.
१. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे.
२. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केले व काय करू शकतो याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचे यापेक्षा मी रस्यात थुंकायची, रस्यात घाण किंवा कचरा टाकण्याची,बेशिस्त वागण्याची, वाहतुकिचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरिमिरी देउन सुटका करुन घेउन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उद्धटपणे वागायची, संधि मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार?
३. आपणच घाण करायची आणि ती उचलायला सरकारी माणूस येइल याची वाट बघायची. नाही तर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणार, याचा आता गंभिरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
४. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी प्रगति केली आहे ती तिथल्या जनतेने केली आहे,सरकारने नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहे, सरकारच्या नाही, याची जाणिव होणे आवश्यक आहे. आणि सरकार म्हणजे कोण? ते कोणी परग्रहावरुन आलेले लोक नाहीत आपल्यातिलच लोक आहेत. याचे भान ज्याचे त्याने ठेवावे हीच अपेक्षा.
चला तर! आपण सगळे मिळून प्रगत भारत निर्माण करू या !!

Monday, June 23, 2014

एवढं जगात दुसरं भयंकर काहीही नसतं....

खरंतर वाचायला काहीच नाहीये. पण, तरीही ते कोरे कागदही वाचून संपत नाहीयेत.
कुठेही पोहोचलो नाहीयेय, वाट संपत नाहीये. पण, वाटेतलं अंतर कापणंही मी सोडलं नाहीये
खरंतर विझणं कधीचच अनुभवलंय मी. पण, तरी जळणं काही सुटत नाहीये.गर्दी माणसांची आहे, पण मी त्यात नाहीये. मग, एकटाच माणूस गोंगाट कसा करू शकतो?
इथे कुणीही दुसरं नाहीये. मग काचेत दिसतंय ते कोण आहे? तो हसतो, तो रडतो, हसत हसत रडतो अन रडत रडत हसतो.
सोबत असलेली माणसं पटत नसतात आणि पटत असलेली माणसं सोबत नसतात, यालाच 'नरक' म्हणतात बहुतेक.
आपण एखाद्या गोष्टीमागे जीव तोडून धावत जातो, पाठलाग करतो आणि आपण पाठ फिरवून निघून जाताना मागे वळून पहिल्यावर आपला पाठलाग मात्र कुणीच नाहीये याची जाणीव टोचणारी असते.यालाच 'तुच्छ' म्हणतात बहुतेक.
कितीतरी बोलत रहावे, मनात असेल नसेल सगळं बडबडत रहावं आणि थोड्या वेळाने लक्षात यावं की, आजूबाजूला कुणीच नाहीये. या जाणीवेला 'भकासपणा' म्हणतात बहुतेक.
स्वतःची किंकाळी स्वतःच ऐकण्याएवढं जगात दुसरं भयंकर काहीही नसतं.

वारी- काय आहे जाणून घ्या

 http://api.ning.com/files/vSdspwTjNvUjno2CX1PB2Cm-qE2FAPzdmHAeP25evIYdSx72OWXQJoxid37Zq8boy646mCBHWmWVmjgtzaruF3g*exMc3wHj/AshadhiEkadasiPandharpurYatra02.jpg


वारी- काय आहे जाणून घ्या

१) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!
२) पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
३) अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.
४) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.
५) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.
६) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.
७) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.
८) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.
९) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.
१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.
११) वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.
या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgHYhD2okwawjNavly_u9XUGpxshiLfFwsxPQH1XE7F5OeKDbvip-KpMBTFu230xsJZ0jReOU4KVv2EBoHfqle1bh1zp4_XAu9Z8p-JW4ZGiQUmbkgVKm3wh9YrRR7YnZs5sDW8GWKZIaI/s1600/2.jpg

१२) वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात.
१३) सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.
१४) दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.
१५) वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात.
१६) वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.
१७) वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात.
१८) रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.
१९) काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते. २०) काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात.
२१) वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात.
२२) संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात.
२३) श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात.
२४) वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो.
२५) श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात ‘माऊली’ असेच म्हणते. लेकराचे हित चिंतते ती माऊली! विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे ‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊली’ म्हणून गौरविले. नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते.
जगी ऐसा बाप व्हावा| ज्याचा वंश मुक्तीस जावा॥पोटा येतां हरले पापा| ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय म्हणतात.
२६) श्रींचे वारी सोहळ्यात होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत...
सौजन्य: Rajesh N. Prabhu-Salgaonkar

Friday, May 30, 2014

जायचे होते तरीही

कळलेच नाही ..

जायचे होते तरीही
पाऊले उठलीच नाही..
हाक तु नाही दिली
अन आसवे ढळलीच नाही

कोणते होते बहाणे ?
तुज मनाच्या गंधकोशी
अंतरातुन साद आली
पण अंतरे सरलीच नाही

हासतांना तु सख्या
गेला निरोपा देवुनी
धुरकटे आभाळ होते
मी तरी भिजलेच नाही

का तुला कळलीच नाही
भावना माझी कधी
मी कविता होत गेले
सुर उद्भवलेच नाही ..

अमॄता__

Thursday, May 29, 2014

तु नाही म्हटल्यावर

तु नाही म्हटल्यावर....(1)

तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
गण्यला सन्गीत नाहि म्हटल्यावर रसिक तरि का गा म्हणनार...

तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
दिव्या ला ज्योत नस्ल्यास दिवा तरी कसा जळणार...

तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
स्पंदनाशिवाय ह्रुदयाला भावनांचे गीत कसे कळणार?

तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तुला माझ्या भावना कळत नाहीत ह्याला कोण काय करणार...

तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
पण भीती वाटते कि तुझ्या शिवाय मि कसा जगणार?

तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
स्वप्न आणि वास्तवात फ़रक असतो त्याला काय करणार?

तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
माझे मन जर तुला कळाले नही तर हे शब्द कसे कळणार?

तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,
तुझ्या विरहा चे दुख: मला असेच झळत रहणार.....

ति परत येणार नाही.......

ति परत येणार नाही.......

ति कधी परत येणार नाही...

दूसरी काही मला आवडत नाही

तिसरीचा विचार मि करत नाही

चौथी काही भाव देत नाही

पाचवी वर लाईन माराचे धाडस होत नाही

सहावी चा खर्च मला परवडत नाही

सातवी हात देखिल लाऊ देत नाही

आठवी ची भाषा मला कळत नाही

नववी चा नखरा मला सहन होत नाही

दहावी ला सोडायची चुक मि करणार नाही

कारण ति परत येणार नाही...
ति परत येणार नाही.......

चाललिस ना..... जा,मि तुला अडव्नार नाहि.

चाललिस ना..... जा,मि तुला अडव्नार नाहि.

चाललिस ना..... जा,
मि तुला अडव्नार नाहि.
"माझ्या एवढा प्रेम कर्नारा,
तुला कधिच भेट्नार नाहि""
मि असेहि म्हननार नाहि.

भेटेलहि कदाचित.....
पन जेन्व्हा हि तो,
तुझा हात त्याच्या हातात घेइल्ल,
तुला माझा स्पर्श जान्वेल...

तु तुझा हात त्यच्या हातात देशिलहि,
पन तुझ मन मात्र..
मझ्यातच राहिल न....

तो म्हनेल तुला
"माझे तुझ्यावर प्रेम आहे"
तु हि त्याला तसेच म्हन्शिल..
पन ...
तु मला जसे पापन्या खालि करुन,
लाजुन म्हनायचिस..
तसे त्याल मनातुन म्हनु शकशिल?


तुझे शब्द तर त्याच्या कानि पडतिल,
पन तुझ्या ओठानवर,
माझेच नाव असेल.
तु मला आठ्वावस ,
अस मि कधिच म्हन्नार नाहि.
चाललिस ना , जा
मि तुला अडवनार नाहि.



मि राहिल असाच,
ओठान्वर हास्य सजवुन,
कुनि विचारलेच तुझ्याबद्दल,
तर म्हनेल..
"ति रागावलि आहे माझ्यावर
माझ्याच चुकिमुले"!

तुला कुनि मझ्याबद्दल विचारले तर सान्गशिल,
"तो चान्गला न्हावता,
मला तो फ़सवुन गेला"
खरेच तु असे म्हटले तरि,
मला वाइट वाट्नार नाहि.
चाललिस ना..... जा,
मि तुला अडव्नार नाहि.

पन जाता जाता एक सान्गतो,

मि मेलो असे कळल्यावर,
चुकुनहि रडु नकोस..
लोकन्चा प्रेमावरुन विश्वास उडेल....

फ़क्त एवढच म्हनशिल..... "चान्गलेे झाले एक लोफ़र कमि झाला".

निशब्द(देव)

तुझा हट्ट

तुझा हट्ट

तू मला मा्गावं काहीतरी
मी जिवाचं मग रान करावं
हौस पुरी झाली एकदा की
तू खुदकन गोडसं हसावं

परत तुझा नवीन हट्ट
मी तो अलगद पुरवण्याचा
स्मितभर हसतो अता मी
उगा प्रयत्न करतो नभांतून
शेवटचा टाटा करण्याचा...

तेंव्हा पाऊस पडत होता..............

तेंव्हा पाऊस पडत होता..............
आठवतो आपला श्वास जसा
एकमेकांत मिसळला होता
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता

वाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तर
इतकं दुःख सोसावं लागेल
आज पर्यंत श्वासांनी मला, पण
यापुढे त्यांना पोसावं लागेल

तुझ्या आठवणींच्या साखर झोपेत
माझी कालची रात्र गोडव्यात सरली
पुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पण
काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली

'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला

माझं दुःख बघवलं नाही
म्हणून एक ढग रडत होता
तुमचं आपलं काहीतरीचं
म्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय

शांत चेहरा, ना शब्द काही,
डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला.
मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला.

स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,
स्वप्णाना तुटतांना पाहिलय,
होय, मी आज...
माज़या बापाला रडतांना पाहिलय.

आई,मला सायकल हवी,
आई म्हणायची बेटा पैसे नाही,
दुसर्या दिवशी माज़या हातात चावी असायची.
मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,
पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,कारण
त्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.

मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.

मोठा झालो खर्च वाढला,
मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,
सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,
छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,
पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.
तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,
मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,
पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.

त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,
माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,
होय, मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.

तो जळत राहिला वात बनून,
माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,
मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,
स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,
चुक कळली मला,
त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,
त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.
पण, आज तो या जगात नाही.

तरीही....
माज़या प्रत्येक संकटात,
मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलय
होय, मी आज...
माज़या बापाला रडतांना पाहिलय.


निशब्द (देव)

प्रेमळ पत्नीसाठी दोन शब्द...

प्रेमळ पत्नीसाठी दोन शब्द...
°°° आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी °°°
°°° तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी °°°
°°° अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते °°°
°°° स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते °°°
°°° अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का °°°
°°° तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का °°°
°°° कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे °°°
°°° वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे °°°
°°° भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने °°°
°°° स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे °°°
°°° साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे °°°
°°° सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने °°°
°°° मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे °°°
°°° वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे °°°
°°° वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे °°°
°°° पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे °°°
°°° झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे °°°
°°° जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे °°°
°°° हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे °°°
°°° नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे °°°
°°° अशी काहीशी साथ दे °°°
°°° मित्रत्वाचा हात दे °°°

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
सुरेश भट

तुमच्या आई वडिलांना कधीच दुख: देऊ नका...

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो,

 ते विचारतात "बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत."

मुलगा : "मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन."

बाप: "ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील!" (रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो.

घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो.)

काही दिवसानंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते.

त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते.

ती असते.. "आज माझ्या सोन्याला ताप आला होता, 'Taxi' न मिळाल्यामु ळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे..(वेळ : रात्री २ वाजता..)"

त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण आता सर्व संपले होते.

 तुमच्या आई वडिलांना कधीच दुख: देऊ नका. तुम्ही आज जे काही आहात ते त्यांच्यामुळे..त्यामुळे त्यांना त्रास होईल असं कधीच वागू नका..

Wednesday, May 28, 2014

"आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?

"आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?
"आई-बाप" "आई-बाप" म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, ऍडव्हान्स पाठबळ असतं
तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं
"आई" तुमच्या आयुष्याच्या गाडीच योग्य दिशा देणार "स्टीयरिंग" असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे " अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं
"आईच प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणार "बँक बॅलन्स" असतं
बाप म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असत
आई म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच "नेटवर्क" असतं
कधी "नेटवर्क"थकले; तर बाप, अर्जेंट "एस.एम.एस." असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, "अँटी व्हायरस " असतं
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, "बाप" हे "क्वारनटाईन" बटण असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, 'शिक्षणाच विद्यापीठ' असते
"बाप" म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते
"आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कमर् कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर "बाप" हा जवळचा मित्र असतो
आई म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा बाप एक संत असतो
आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं
बाप म्हणजे, भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन्हाड असतं
कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं
आणि भलेमोठे संकट आलेकी उच्चारात "बाप रे बाप" असतं
परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं
म्हणूनच म्हणतो, परमेश्वर, अध्यात्म, भगवंत- हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं "आई-बाप" हे "कनेक्शन" असतं
"आई-बाप" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव"-- 'पितृ देवो भव" म्हणलेलं असतं