Total Pageviews

Wednesday, August 20, 2014

तू छोड़ दे कोशिशें इन्सानों को पहचानने की ...

तू छोड़ दे कोशिशें
इन्सानों को पहचानने की...!
यहाँ जरुरतों के हिसाब से
सब नकाब बदलते हैं...!

मेरे बारे मे कोइ
राय मत बनाना दोस्त !
मेरा वक्त भी बदलेगा,
और तेरी राय भी..!

You Remembered By The

You May Be Known By The Designation On Your Visiting Card ....

But Are You Remembered By The :
" VALUES " You Show ...
" PRINCIPLES " You Live .....
And
" LOVE " You Give .... !!!

DAHI HANDI

What Is The Learning Out Of The Famous "DAHI HANDI ". Which Is Dedicated To The Lord KRISHNA ?

Unless You Build A Base ,
Unless Build Your TEAM ,
Unless Build Your Career With Fundamentals,
You Can't Reach The Top.

Fill Your Mind With Positive Thought And Build A Strong TEAM. So That We Rebuild And Keep Achieving It Year On Year ..... !!!!!

लाश को देखकर...

किनारे पर तैरने वाली
लाश को देखकर
ये समझ आया...
बोझ शरीर का नही
साँसों का था....

Steps for Happy Life

" Minimum Requirements And Maximum Adjustments Are The Two Steps Of Happy & Successful Life ".

The Best Thing To Learn In Life Is The Habit Of COMPROMISE Because Its Better To Bend A Little Than To Break A Beautiful Relation .... !!!

The Quality Of Life Cannot Be Raised Unless We Raise The Texture Of Our Thoughts And The Depth Of Our Understanding ...!!!  

Don't Take Life Too Seriously ,
Always Find Time To Laugh Because It May Not Add Years TO Your Life .
But ,
Adds More Life To Your Years ................!!!!!
 



" Importance And Respect Should Be Given Appropriately .. " !
Because ,
If Given MORE It Will Not Be VALUED .!!
And
If Given LESS It Won't Be CONSIDERED .... !!!
 

Sunday, July 27, 2014

राखीचा धागा

राखीचा धागा हा नुसताचसुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षणकरणारे, सतत संयमी ठेवणारे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावामिळतो वं मन प्रफु ल्लीत होते.एकमेकांना जोडणारा असा हा सणइतरकोणत्याही धर्मात संस्कृ तीत नाहे. सामाजिकऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचेसण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नातीजोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारचीएकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे....!!!

काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे

सह्याद्रीच्या छाताडातून, नादजिजाऊ गाजे...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!!
तुफ़ानगर्जतो, आगओकतो, वाघ मराठा माझा!
सन्मानराखतो, जान झोकतो तुफानं मातीचाराजा !
झुकवूनतुतारी माना, शंखनाद हा वाजे....
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!!
सुराज्य थाटले, मेढ रोवली स्वातंत्र्याची शीळा !
ही तलवार भवानी पाहून, तोफ फिरंगी लाजे...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!!
तेरक्तं सांडले, प्राण वेचले नसे उगाचबाता!
जगणे त्यांचे, जगणे होते त्या वेगळ्याचवाटा!
ही आहुती त्या वीरांची, काय तुझेनिमाझे...
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे!!

|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

गाढवाची गोष्ट ...

एके दिवशी एका शेतकर्याचं गाढव
शेतातल्या कोरड्या विहिरीत पडलं.
जखमी झाल्यामुळे ते विव्हळत होतं
आणि मोठ्याने ओरडत होतं.
लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने
बराच ं
विचार केला फार प्रयत्न केले.
त्या गाढवाला त्या विहीरीतून बाहेर
काढण्याचे
पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत
नव्हते.
दिवस
मावळायला आला होता
शेतकरीही आता थकला ही होता आणि कंटाळला होता त्याने
विचार केला .
'आता हे गाढव तर असेही म्हातारे
झाले आहे असेही निरुपयोगी आहे
आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...
त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून
द्यावे... विहीरीत
माती लोटावी...
गाढवाचा प्रश्न ही सुटेल
आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.......'
मग काय जमलेल्या सार्या लोकांकडून त्याने
मदत मागीतली. आणि सगळे कामाला लागले
कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात
झाली.....
मध्ये
पडलेल्या त्या जखमी गाढवाला काही कळेनासे
झाले ...
विहीरीत पडल्याने
शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात
भर म्हणजे आयुष्यभर
ज्या मालकाची चाकरी केली
त्याची ओझी वाहीली आज
तोचं मालक जिवावर उठला ...
ते दुखाने अजून मोठयाने ओरडू लागले....
वरुन माती पडतचं
होती...
काही वेळाने गाढवाचा ओरडण्याचा आवाज
थांबला .....
सागळ्यांना वाटले गाढव मेलेचं बहुतेक
शेतकर्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले
तर
तो पहातचं राहीला...
अंगावरची माती झटकत गाढवउभे राहीले
होते...
लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु
केले...
परत पाहीले तर गाढव त्याचा त्याचा मग्न
होता तो वरुन
माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या
मातीच्या थरावर
उभा राहीचा ......
असं करता करता कोरडी विहीर बरीचं
भरली आणि कठडा जवळ येताचं ते गाढव
तो कठडा ओलांडून बाहेर आले......


आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???


आपण खड्यात पडलो तर आपणास
काढायला कोणीतरी एकचं येते पण
आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात
पडल्यावर माती लोटणारे
आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं
भेटतात...


म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा .... आपले
डोके नेहमी शांत ठेवा
समस्या कीतीही मोठी असो.... शांत मनाने
ती हाताळा.... 


खड्ड्यात
पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल
दुखः करायपेक्षा
त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.....
झटका ती माती आणि त्या मातीची एक एक
पायरी करत... हळूहळू करत वरया....

Friday, July 25, 2014

About आई ..

प्रिय आई ...

स्वर्ग हि एक कल्पना आहे
ते काय असतं ते मी बघितलं नाही
मी जरी नाही आठवलं तरी
डोळे माझे तुला आठवतात
प्रत्येक भेटीनंतर तुझी प्रतिमा
ते स्वतःमध्ये साठवतात...!!!

---------- 


बाहेरचं खाल्ल्यावर पोट भरतं
आईच्या हातचं खाल्ल्यावर मन भरतं !



-----------

"आई "हे पृथ्वीतलावरचे ईश्वराचे रूप आहे.
जे मुलांच्या सुखासाठी तळमळते,
प्रसंगी जीवही देते, सर्वस्वाचा त्याग करते.
त्या मातेला मग ती आपली असो किंवा दुसऱ्याची माता
तिला दुखावले जाणार नाही
याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.....!!!!!

------------
थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार - संकटसमयी तूच एक आधार - थोर तुझे उपकार


------------
आईवडीलांना वृद्ध झाल्यावर आश्रमात टाकाल तर.......
हाच विचार पुढची तुमची पिढी तुमच्याबरोबर करेल......


वृद्धाश्रम

जवळच वृद्धाश्रम आहे पण कधीच तिकडे जाण्याचा विचार हि मनात आला नव्हता आला नव्हता.. आज अगदी ठरवूनच माझी पावुले तिथे वळली मी आतमध्ये गेलो.तिथे एक आजी बसलेल्या दिसल्या ,मी त्यांचाशी बोलण्याचा प्रयत्न केला...
.
आजी जेवण झाले का?

नाही रे पोरा मला नाही जाणार आज जेवण ........
पण कसे काय आज या आजीबाई कडे केले येणे....
माज्या म्हातारी शी बोलायला वेळ नसतो कोणाला इकडे ...
कधी तरी फोन ची रिंग वजते इकडे ...
हेल्लो हेल्लो मनी ऑर्डर पोहचली का?..
म्हणून फोन बंद पडतो ...अन
डोळ्यातील अश्रू गालावर पोहचून कंठ दाटतो ....
.
पुन्हा मी म्हणाले आजी थोडसे तरी खाऊन घ्या...
नाही रे पोरा मला नाही आज जाणार जेवण ....
माझ्या लेकाचा आज वाढदिवस आहे...
मन माझे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तडपते आहे ....
मन त्याचे का माज्यापर्यंत येण्यासाठी अडवत आहे..
पूर्वीसारखे दिवस नाही राहिले आता..
म्हणून प्रेम माझे त्याचाव्रचे अजूनही संपले नाही....
पूर्वीसारखी मन तक्रार नाही करत आता..
म्हणून तो मला घेऊन जाईल विचार करणे अजूनही सोडले नाही ...
.
थोडा वेळ डोळ्यातले अश्रू पुसत स्तब्ध शून्यात बघत राहिल्या..
लहानपणी एक घास चिऊ चा एक घास कौऊ चा करत घास भरवायचा..
आयुष्यभर एक एक पैसा जपून वापरायचा..
हौस होतीना लेकाला डॉक्टर बनवायचा..
आता रोज एक च विचार करायचा..
एकदा तरी माझ्या पिल्लाला आमची आठवण येते का?
एकदा तरी माज्या पिल्लाला आमची काळजी वाटे का?
पण अपेक्षा नी आता कसली,इछाच नाही आता उरली..
आई बापांची किंमत नाही ज्याने केली..मजबुरी त्याने सांगितली..
आपली माणसे ज्याला अडगळ वाटली ...आपली माणसे त्याला परकी झाली.
....
थोडेसे रागवत..
तुज्या बाबांना मात्र तुज्यावर राग आहे बरे का ,,'
आपल्या आईला का कोणी असे वेगळे करते ,
रक्ताच्या नात्याला का कोणी क्षणात परके करते,,
नाही आठवत का रे तुला आम्ही घेतलेले कष्ट..?
बरे आहे न सगळे तिकडे?
कसे काय फोन विचारायचं नुसते..
इथे सर्वे काही ठीक आहे ,मजेत आहे बाळा ..
तू मात्र सुखी रहा ,आनंदात राहा नेहमीच आशीर्वाद असतील बाळा..
फक्त एकच गोष्ट आहे..
आपल्या माणसाच्या प्रेमापासून तू मुकला आहेस..
आपली माणसे कोण ते आता आम्हाला हि उमजले आहे..

वृद्धाश्रमातील आजी

वृद्धाश्रमातील आजी .........२

येता हाक मायेची
डोळ्यात तराळले पाणी
हृदयला भिडणारी कोणाची
असेल मधुर वाणी
रात्रीअंती दिवस उजाडतो
दिवसामागे सरते रात्र
वृद्धाश्रमातील भिंतीवरचे केवळ
उलटते तारखेचे पत्र
तारुण्यात मोठ्या हौशेने
संसाराची केली मांडणी
वार्धक्याने आलेल्या लाचारीने
केलीय अडगळीत मोडणी
मायेचा खोटा पुरावा
टपालाने हातात येतो
दोन लुगड्यांच्या गाठोड्यात
लाडवांचा चुरा मिळतो
कपकपणाऱ्या हाताना केवळ
भिंती आधार देतात
डोळ्यानच्या भिजलेल्या वाती
मायेचा प्रकाश शोधतात
कोणी मायेचा भुकेला
येतो कधी वाट बदलून
चार क्षणाच्या सहवासात
जगण्याची उमेद जातो वाढवून
सोडून पदराची गाठ
आगंतुकासी हृदयासी कवटाळते
काळजाची करून होडी
मायेच्या सागरात डोलावते....

सौजन्य :- फेसबुक मित्र सखा श्रीगिरीश

काय सांगू शेजीबाई

आईला, आपल्या लेकीच फार कवतिक असत,लहानपणापासून नांदायला गेल्यावर सुद्धा तिला तिची फार माया असते,जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा ती आपल्या शेजारणीला काय सांगते

काय सांगू शेजीबाई,
माझ्या लेकीचं कवतिक
घरासाठी तिनं बाई,
खस्ता काढल्या कितीक....!!!!
होती लहान ती जवा,
सांभाळले भाऊराया,
झाली लेकराची माय, घास
त्याला भरवाया.....!!!
भाऊ शाळेमंदी जातो,
गिरवतो यक दोन,
त्याले शिकवते तीन,
त्याची आडाणी बहीन......!!!!
आली वयामंदी जवा, लाज
अंगात मायीना,
चाले नाकाम्होरं पोर, वर
करून पाहीना......!!!!
हात पिवळे करण्या, बाप
बोलला झोकात,
देण्या-घेण्याच् या रीवाजी,
त्याचं मोडलं पेकाट......!!!!
चाले लगनाची घाई,
गेली मोहरून पोर,
लळा मायीचा सुटेना,
तिला आईचाच घोर ......!!!
जाता सासराला लेक,
झाली दादल्याची राणी,
तिच्या पावलांनी तिथं,
लक्ष्मी भरतेया पाणी......!!!!
लेक माझी ग गुणाची,
नाही नाही ग कुणाची,
तिचा जीव माह्यापाशी,
लेक मायीच्या मनाची......!!!
लेक व्हाढतो ग ताट, लेक भरवते
घास,
लेक कोरडा कोरडा, लेक
पान्हाळली कास...!!

स्वत:च्या कामासाठी स्वत:लाच उभं राह्वं लागतं

लहानपणी आई एक गोष्ट अगदी रंगवून रंगवून सांगायची,आणि आम्हीही {मी आणि माझी मोठी बहिण गुड्डी }ती माहीत असलेली गोष्ट पून्हा पून्हा तितक्याच उत्कंठेने ऐकायचो... आता मला माहीत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही असं होईल का?
तर एका गावा बाहेर एक साळीचं शेत असतं.चंडोलपक्षानं त्या पिकामधे आसरा घेत पिल्लांसाठी घरटं बांधलेलं असतं. चंडोल पक्षाचं घरटं असलं तरी त्याचा पत्ताच नसतो त्याची मादीच आपली तीन पिल्लाना सांभाळत त्या घरट्याची रखवाली करत असते. पिल्लाना चारा आण, किडॆ आण, टोळ मिळाला तर तो आणून भरव, कुठे काडी निसटली तर ती ठीक कर कापूस आणून भर, पिल्ल आपली बघावं तेंव्हा चोच आवासून आपल्या आईची वाट बघत असायची ती पक्षीणी पिल्लं जरा मोठी झाल्यावर त्याना सांगते, घाबरायचं नाही कोणाची चाहूल लागली तर गप्प बसायचं कोण काय बोलतय, कसे आवाज काढतय सगळ्यावर लक्ष ठेवायचं काही महत्वाचं वाटलं तर माझ्या कानावर घालायचं. पिल्लं आपली त्यांच्या भाषेत हो हो म्हणत माना डोलावतात. कुठेही जा माना डोलवणं सेमच असतं नाही.. आपण सुद्धा...
असो! तर एकदा काय होतं? त्या शेताचा जमीनदार शेताची पाहणी करायला शेतात फेरफटका मारायला येतो. बरोबर त्याचा लोचट मुनीमजी असतोच. तयार झालेलं शेत बघून जमिनदार म्हणतो "हं! शेत कापायला झालय, आता कापायला हवं... पिल्ल घाबरतात.. हे आईच्या कानावर घलायला हवं शेत कापलं तर आपण कुठे जायचं? आई आल्या आल्या पिल्ल कलकलाट करतात पण ते ऐकून आई आपली शांतच. पिल्ल विचारतात, आई तुला भिती नाही वाटत? आई म्हणते अजून नाही पण तुम्ही मात्र सावध रहा शब्दंशब्द ऐका आणि मला सांगा काही दिवस जातात पून्हा जमिन्दार येतो सोबत मुनीनजी असतोच जमिनदार म्हणतो अरे आता शेत कापायला घ्यायला हवं जरा त्या शिरप्याला विचारा म्हणावं जरा कापून दे... पिल्ल हे ऐकातात तत्परतेने आईच्या कानावर घलातात तरी आई आपली शांतच परत थोडे दिवस जातात शेत तसच डुलत असतं पिल्लं वाढत असतात पण अजून पंखात बळ येणं बाकी असतं त्या दरम्यान जमिनदार असाच फेर्‍या मारून जातो पाहणी करून जातो देवदयेनं या घरट्याकडे त्याचं लक्ष जात नाही. याला सां गा त्याला सांगा करण्यात समय जात असतो. आणि एक दिवस जमिनदार येतो त्याच्या बरोबर त्याचा मुलगाही असतो कोणा कोणाला शेत कापायला सांगितलं याची उजळणी होते नोकर चाकर गडी माणसं,गावातली माणसं... शेवटी मुलगा म्हणतो जाऊदे अप्पा! आता उद्या अपणच येऊया आणि शेत कापायला घेऊया कशाला कोण हवय?
आई आल्या आल्या पिल्लं तिला हे सांगतात आणि जेंव्हा ती हे ऐकते की आता कोणावरही अवलंबून नं राहता जमिनदार स्वत:च शेत कापायला घेणार आहे तेंव्हा मात्र ती आई अस्वस्थ होते पिल्लाना दाखवत नाही पण जरा घाबरते
.. पिल्लं विचारतात..आई काय झालं?विचारात पडलेली ती आई म्हणते.. इतके दिवस ते दुसर्‍या कोणाची वाट बघत होते तो पर्यंत काळजी नव्हतीपण आता ते स्वत:च शेत कापणार म्हणजे.आपली इथून हलायची वेळ झाली.
पहाटेलाच पिल्लाना म्हणते जरा उडायचा प्रयत्न करा त्यानिंबावर जाऊन बसा .. आणि आईच्या इशार्‍या बरोबर ती पिल्लं घरटं सोडतात... कसाबसा जवळचा निंब गाठतात
माँरल आँफ द स्टोरी काय? स्वत:च्या कामासाठी स्वत:लाच उभं राह्वं लागतं
माझं कपाट आवरायची वेळ आलीकी राहून राहून मला ही गोष्ट आठवते.. तात्पर्य काय तर ..

"उद्या बहुतेक आपली भेट होणे नाही..."

(from Shri.Rajesh Parulekar )

रिटर्न्स कसा भरायचा, कसा नाही?

आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी रिटर्न्स भरण्याची शेवटी तारीख ३१ जुलै आहे. ज्या नोकरदारांचा टीडीएस कंपनी कापून घेते आणि ज्यांना कर भरावा लागणार नाही, अशा नोकरदारांनी ३१ मार्च २०१५ पर्यंत रिटर्न्स जमा केले तरी हरकत नाही. ज्यांना मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे आहेत त्यांनी ते कसे भरावेत, याची सविस्तर माहिती देत आहोत.
रिटर्न्स कसा भरायचा, कसा नाही?
आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या स्लॅबनुसार, वयोवर्षे ६० च्या आतील पुरुष व महिलांचे वार्षिक दोन लाख उत्पन्न असेल तर ते उत्पन्न करमुक्त आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ही मर्यादा अडीच लाख रुपये आहे. तर, ८० वर्षांच्या वरील ज्येष्ठांसाठी ही मर्यादा पाच लाख रुपये इतकी आहे. ३१ मार्च २०१४ रोजी ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक मानले जाईल. त्याचप्रमाणे ३१ मार्च २०१४ रोजी ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना सुपर सीनिअर सिटिझन्स मानले जाईल. कलम ६ ए नुसार गुंतवणूक व व्याजवरील सवलतीपूर्व उत्पन्न वरील मर्यादेपेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न्स भरावा लागेल. गुंतवणुकीवरील सवलतीनंतरही करप्राप्त उत्पन्न या मर्यादेच्या आत असेल तरीही रिटर्न्स भरावे लागतील. आपले उत्पन्न (ग्रॉस इन्कम) अडीच लाख रुपये असेल आणि वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल, तुम्ही कलम ८० सी नुसार, पीपीएफ आणि विमा योजनांमध्ये ६० हजार रुपये गुंतवणूक केली. तर, तुमचे करप्राप्त उत्पन्न १.९० लाख रुपये होते. हे उत्पन्न २ लाखाच्या एक्झेम्शन मर्यादेपेक्षा कमी आहे. पण, वजावटीपूर्वीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त होते. त्यामुळे रिटर्न्स भरावा लागेल.
टॉप पाच चुकांची शक्यता
चुकीचा फॉर्म निवडणे
कोणता फॉर्म भरायचा यासाठी नेमके नियम आहेत. याबाबत इथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनेकदा चुकीचा फॉर्म निवडला जातो, त्यामुळे योग्य फॉर्म निवडा आणि तोच भरा
रिकाम्या फॉर्मवर सही
जे लोक एखाद्या एजंटमार्फत रिटर्न्स भरतात ते बऱ्याचदा न भरलेल्या फॉर्मवर न बघताच सही करून देतात. न भरलेल्या फॉर्मवर सही करू नका. एजंटकडून फॉर्म भरण्यात थोडी जरी चूक झाली तरी त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागेल. त्यामुळे योग्यरितीने फॉर्म भरलेला आहे का याची शहानिसा करा. तुम्ही सही केली याचा अर्थ या फॉर्ममधील माहितीची जबाबदारी तुमचीच असते.
क्रमांक योग्य आहे का बघा
रिटर्न्स फॉर्ममधील पॅन, आयएफएस कोड, खाते क्रमांक, मालकाचा टॅन आदी माहिती भरताना चुका होऊ शकतात. या चुका टाळण्यासाठी क्रमांकांकडे लक्ष द्या. पॅन क्रमांकातील एखादा आकडा भरायचा राहून गेला तर इन्कम टॅक्स विभाग दंड आकारू शकते.
अॅकनॉलॉजमेंट भरताना चूक
जे करदाते ई फायलिंग करतात पण, डिजिटल सही करत नाहीत त्यांना आयटीआर पाच हा फॉर्म भरून तो बेंगळुरूला इन्कम टॅक्स ऑफिसला पाठवावा लागतो. हा फॉर्म रिटर्न्स भरल्यानंतर १२० दिवसांच्या आत भरावा लागतो. करदाते अनेकदा हा फॉर्म भरण्याचे विसरून जातात वा फॉर्म भरून तो कुरिअरने पाठवतात. पण, हा फॉर्म पोस्टाने वा स्पीड पोस्टानेच पाठवायचा असतो.
फॉर्म १६ न घेणे
तुम्ही आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर पूर्वीच्या आणि सध्याच्या कंपनी मालकांकडून 'फॉर्म १६' घ्या. पूर्वीच्या नोकरीत केलेली बचत, त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती नव्या कंपनी मालकांना दिली नसेल तर कर कमी कापला जाईल मात्र, नंतर व्याजासहित तो भरण्याची वेळ येईल.
अशी असेल ही वजावट
'८० सी'नुसार मिळणारी वजावट
८० सी, ८० सीसीसी आणि ८० सीसीडी अंतर्गंत करसवलत मिळते. ही मर्यादा सन २०१३-१४ साठी एक लाख रुपये आहे.
रिटर्न्स भरण्याची तयारी
रिटर्न्स भरण्यापूर्वी खाली दिलेली कागदपत्रे तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. रिटर्न्स फॉर्म बरोबर कागदपत्रे जोडायची नसली तरी फॉर्म भरताना त्याची आवश्यकता पडू शकते.
फॉर्म १६
तुम्ही नोकरदार असाल तर आत्तापर्यंत तुमच्या कंपनी मालकाने तुम्हाला फॉर्म १६ दिलेला असेल. याचा अर्थ कंपनीने तुमचा टीडीएस कापून घेतलेला आहे.
टीडीएस सर्टिफिकेट
पगाराव्यतिरिक्त तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर आणि टीडीएस कापला गेला असेल तर ती संस्था तुम्हाला टीडीएस सर्टिफिकेट देते. भाड्यातून मिळणारे उत्पन्न, शेअर्स, एफडी वगैरेमधून मिळणारे उत्पन्न.
फॉर्म २६ एएस
कापून गेलेला टीडीएस सरकारकडे जमा झाला आहे की नाही याची माहिती फॉर्म २६ एएस द्वारे मिळते. म्हणजेच हा टीडीएस इन्कम टॅक्सकडे पोहोचला आहे, यावर शिक्कामोर्तब होते. याची महिती तुम्हाला दोन पद्धतीने घेता येते. Incometaxindiaefining.gov.in वर जाऊन view form 26 AS वर क्लिक करा. इन्कम टॅक्स साइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे पाहता येईल. तुम्ही नेट बँकिंग करत असाल तर बँकेच्या वेबसाइटवर जाऊन view your tax credit वर क्लिक करून फॉर्म २६ एएस पाहता येईल. या बँकेतील तुमची एफडी, बचत खात्यावरील व्याज याचीही माहिती त्यात मिळू शकते.
बँक स्टेटमेंट
बचत खात्याचे वर्षभराचे (१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४)चे बँक स्टेटमेंट घ्या. वर्षभरात बँकेने किती व्याज दिले आहे हे समजेल. या व्याजातून मिळालेले उत्पन्न रिटर्न्समध्ये दाखवावे लागेल.
अन्य दस्तऐवज
पॅन नंबर, बँकेची सविस्तर माहिती आपल्याकडे पाहिजे. बँकेचा आयएफएससी नंबर रिटर्न्समध्ये भरावा लागतो. रिफंडचा पैसा थेट तुमच्या खात्यात जमा होतो.
रिटर्न्स खालील पद्धतीने भरा
कोणता फॉर्म भरायचा, हे पाहा
करदात्याच्या उत्पन्नाचा स्रोत पगार वा पेन्शन, एकाच घराच्या भाड्यातून, व्याजातून उत्पन्न मिळत असेल तर हा फार्म भरावा.
भरू नये
अन्य स्रोतातून होणाऱ्या उत्पन्नातून तोटा झाला असेल तर आयटीआर-२ हा फॉर्म भरावा.
करातून सूट (exempt income) मिळालेले उत्पन्न ५ हजारांपेक्षा जास्त असेल आयटीआर-१ न भरता आयटीआर-२ हा फॉर्म भरावा. गेल्या वर्षीपासून सीबीडीटीने हा नियम केला आहे. पीपीएफवरील व्याज, लाभांश, करमुक्त बॉण्डवरील व्याज आदी रक्कम exempt income मध्ये येते.
विदेशात मालमत्ता असेल तरीही आयटीआर-१ भरू नये.
वैयक्तिक वा हिंादू एकत्रित कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न पगार वा पेन्शन, एकापेक्षा जास्त घरांतून मिळणारे भाडे, भांडवली उत्पन्न (capital gain), व्याज तसेच, लॉटरी, घोड्याची स्पर्धा अशा अन्य स्रोतातून उत्पन्न मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.
भरू नये
व्यवसाय वा व्यावसायिक (profession) क्षेत्रातील कामातून उत्पन्न मिळत असेल तर हा फॉर्म भरू नये. फॉर्म-४ भरावा.
फर्ममधील सहयोगी सदस्यांचे उत्पन्न व्याज, पगार, बोनस, कमिशन, मोबदला, भांडवली उत्पन्न (capital gain), एकापेक्षा जास्त घरांतून मिळणारे भाडे मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.
करदात्याचे उत्पन्न मालकी उद्योगातून व्यावसायिक क्षेत्रांतून (डॉक्टर, वकील इत्यादी) वा कमिशन यातून मिळत असेल तर हा फॉर्म भरावा.
ज्यांच्या बिझनेसची उलाढाल एक कोटींपेक्षा कमी असेल तर वा प्रकल्पित कर नियमांत (presumptive taxation rules) उद्योगाचा समावेश असेल तर हा फॉर्म भरावा.
भरू नये
capital gain झाला असले तर वा व्यावसायिक स्वयंरोजगार (डॉक्टर, वकील वगैरे) असेल तर वा कलम ४४ ए (१) अंतर्गत व्यावसायिक क्षेत्राची नोंद होत असेल तर हा फॉर्म भरू नये.
हा फॉर्म सर्व करदात्यांनी भरावा लागतो. हा पावती फॉर्म असून तुम्ही हाताने टॅक्स रिटर्न्स भरला असेल वा तुम्ही ई फायलिंग केले असेल पण, डिजिटल सही केली नसेल तर हा फॉर्म बेंगळूरूमधील इन्कम टॅक्स ऑफिसच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) पाठवावा लागतो. सही केलेला आयटीआर-५ फॉर्म सीपीसीला मिळाल्याखेरीज तुम्ही भरलेल्या रिटर्न्सची प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जात नाही.
फॉर्म कसा भरायचा?
इन्कम टॅक्स रिटर्न्स दोन पद्धतीने भरला जातो.
मॅन्युअली किंवा ऑनलाइन. मॅन्युअली भरण्यासाठी फॉर्म स्टेशनरी दुकानातून घ्या किंवा www.incometaxindia.gov.in या बेवसाइटवरून डाऊनलोड करा. सीए, वकील वा इन्कम टॅक्स विभागातील 'टीआरपी'ला फी देऊन हा फॉर्म भरून घेऊ शकता. दुसरी पद्धत म्हणजे स्वतः हा फॉर्म भरा. स्वतः फॉर्म कसा भरायचा हे समोरच्या पानावर सविस्तर सांगितलेले आहे. टीआरपीच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरणार असाल तर खालील पद्धतीने भरता येईल.
'टीआरपी'च्या मदतीने
http://www.trpscheme.com या वेबसाइटवर जा. Locate TRP वर क्लिक करा. तुम्हाला गुगुल मॅप दिसेल. त्याच्याखाली लिहिलेल्या सूचना पहा. Name या सदरात काहीही भरू नका. State व district हे पर्याय भरल्यामुळे आपल्या विभागातील टीआरपीचे नाव, पत्ता आणि फोन नंबर मिळेल. त्याच्याशी संपर्क साधा. वेळेवेळी इन्कम टॅक्स विभाग टीआरपी बाबत मीडियातून माहिती प्रसिद्ध करत असते. टोल फ्री नंबर १८००-१०-२३७३८ वर फोन करून टीआरपीसंबधी माहिती मिळवू शकता. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कधीही या नंबरवर फोन करता येईल.
कोणताही टीआरपी देशातील कुठल्याही व्यक्तीचा रिटर्न्स भरू शकतो. टीआरपीचे ओळखपत्र वा सर्टिफिकेट तपासता येऊ शकते.
टीआरपीला फॉर्म १६ ची फोटोकॉपी द्या, मूळ फॉर्म देऊ नका. त्याच्या मदतीने तो रिटर्न्स भरेल आणि जमा करेल. जमा केल्यानंतर तो त्याची पावतीही देईल. फॉर्म भरण्यात गडबड झाली तर त्याची जबाबदारी टीआरपीची असते.
खर्च किती येईल?
फॉर्म भरून तो जमा करण्यासाठी टीआरपी २५० रुपये फी घेतो.
कुठे जमा करायचे?
मुंबईतील पगारदार जे ऑफलाइन फॉर्म भरत असतील त्यांनी आयकर भवन, चर्चगेट येथे असेसमेंट ऑफिसरकडे रिटर्न्सचे फॉर्म जमा करावेत. असेसमेंट ऑफिसरबाबत माहिती मिळवण्यासाठी incometaxindia.gov.in वर जाऊन पॅनवर क्लिक करा. know your AO code वर क्लिक करा. पॅन मागितला जाईल. त्यानंतर एंटर दाबा. आयटीओ वॉर्डच्या संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. पण, तुम्ही वर्षभरात नोकरी बदलली असेल तर नव्या कंपनीनुसार वॉर्ड असेल. या बेवसाइटवर असलेली माहिती गेल्यावेळी भरलेल्या रिटर्न्सच्या आधारावर दिलेली असते. वेबसाइटवरून ही माहिती मिळत नसेल आणि तुम्ही नोकरीही बदलली नसेल तर गेल्या वर्षी भरलेल्या रिटर्न्सच्या पावतीवरून वॉर्ड मिळवता येईल.
ऑनलाइन फॉर्म असा भरा
ऑनलाइन फॉर्म भरणे अत्यंत सोपे आणि अचूक असते. त्यामुळे रिफंडही लवकर मिळतो. ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असते, त्यांना ऑनलाइन रिटर्न्स भरणे सक्तीचे आहे. अर्थात पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले करदातेही ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अनेक वेबसाइट आहेत पण, त्या फी आकारतात. इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर फॉर्म मोफत भरता येतो. त्यासाठी खाली दिलेले टप्पे पार पाडा.
incometaxindia.gov.in या वेबसाइटवर जा.
continue वर क्लिक करा. डाव्या बाजूला असलेल्या File Returns Online-Income Tax Return या पर्यायावर क्लिक करा.
A Y 2014-15 या मेन्यूमध्ये ITR1 वर क्लिक करा.
आयटीआर १ मधील Excel Utility वर क्लिक करा. यावर्षीसाठीचा 'सहज' फॉर्म येईल. आता डॉयलॉग बॉक्स मधील Save File पर्याय क्लिक करा. फॉर्म डेस्कटॉपवर सेव्ह करा.
आता फॉर्म ऑफलाइन भरा. फॉर्म व्हॅलिडेट करा.
फॉर्म भरल्यानंतर Generate XML file क्लिक करून फॉर्मचा एक्सएएमएल व्हर्जन तयार करा.
पहिल्यांदाच ई-रिटर्न्स भरत असाल तर इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि ई-मेल अकाऊंट आणि पासवर्ड मिळवा. त्यासाठी incometaxefiling.gov.in वर जा. Register वर क्लिक करा. पॅन मागितला जाईल. काही बेसिक माहिती देऊन रजिस्ट्रेशन करा.
त्याच्या मदतीने लॉग इन करा आणि Submit Return वर क्लिक करा.
एक्सएमएल फाइल ब्राउज करून अपलोड करा. अॅकनॉलेजमेंट फॉर्म येईल.
डिजिटल सही असेल तर ती द्या.
डिजिटल सही नसेल तर, अॅकनॉलेजमेट फॉर्मची प्रिंट त्यावर सही करा आणि १२० दिवसांच्या आत पोस्ट वा स्पिड पोस्टाने 'आयटी विभाग, सीपीसी, पो. बॉ. १, इलेक्ट्रॉनिक सिटी पोस्ट ऑफिस, बेंगळुरू- ५६०१०० या पत्त्यावर पाठवा.
त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाकडून १५ ते २० दिवसांत रिटर्न्स यशस्वीरित्या भरल्याचा अॅकनॉलेजमेंटसंबंधी ई-मेल वा एएसएमएस येईल. अनेकांना शंका येते की, पोस्टाने अॅकनॉलेजमेट फॉर्म बेंगळुरूला पोहोचलाच नाही तर? १५ ते २० दिवसांत ई-मेल वा एएसएमएस आला नाही तर अॅकनॉलेजमेट पुन्हा पाठवा. बेंगळुरू ऑफिसच्या ०८०-४३४५६७०० या फोन नंबर चौकशी करता येईल.
गेल्या वर्षी ऑनलाइन रिटर्न्स भरले असतील तर यंदाही भरा. असे करणे सोपे आहे. तुम्हाला फक्त उत्पन्नाचे आकडे भरावे लागतील. बाकी ‌डिटेल्स आपोआप येतील.
खर्च किती येईल?
इन्कम टॅक्स विभागाच्या साइटवरून भरत असाल तर खर्च येणार नाही. अन्य साइटवरून भरत असाल तर १०० ते ७५० रुपयांपर्यंतचा खर्च येईल.
---- महाराष्ट्र टाईम्स -----

Wednesday, July 23, 2014

येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले

येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले
करुणा कल्लोळे
पांडुरंगे पांडुरंगे भक्तजन वत्सले ||धृ||

सजल जलद घन
पीतांबर परिधान येई
उध्धरणे केशीराजे भक्तजन वत्सले ||१||

नामा म्हणे तू विश्वाची जननी
क्षिराब्धि निवासनि जगदंबे
भक्तजन वत्सले ||२||

येई हो विठ्ठले भक्तजन वत्सले येई हो विठ्ठले
पांडुरंग पांडुरंग