Total Pageviews

Saturday, April 3, 2010

Kind Request to Blog readers/ followers

Dear Blog readers, this blog is just my copy paste collection of nice poems I liked most.

Some of people created rumours that I am writing poem in someone's memory. But fact is read the blog properly you will understand.

Friday, July 18, 2008

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........

तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,

चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं....... -मंगेश पाडगांवकर

तिथे आता कुणी रहात नाही

पाया ढासळलेला पिंपळाचा पार
ओढ्याच्या पल्याडचं चौसोपी घर,
कुत्रही त्याच्या वाटयाला जात नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही

घुसण्याची हिम्मतच नाही कुणाची
एका भणालेल्या वाऱ्याशिवाय..
तोही अधून मधून धुडगूस घालतो..
मन मानेल तस्सा.. दारू पिल्यागत…
पिचलेल्या भिंतीवर धडका मारतो..
माजलेल्या मस्तवाल बोकडागत…
त्याला पुर्वीचा माळी अडवत नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही

मोडकळीस आलेला लाकडी जीना
त्याला अगदी मोजक्याच पायऱ्या…
त्यातही दोनचार पेकाट मोडलेल्या..
खिळ्यावर अधांतरी लोंबलेल्या..
लाचार दिनवाण्या..आश्रितासारख्या..
जीना खाली येतो..पण वर जात नाही..
कारण तिथे आता कुणी रहात नाही

वर्षातून फ़क्त एकदा वाडा जिवंत होतो..
हसण्या खिदळण्याचा आवाजही येतो…
चांदण्यात रातराणीचा सुवास दरवळतो..
वळचणीचा निपचीत सापही वळवळतो..
चुलीची उष्णता त्यादिवसापुरती टिकते
सून तिच्यावर श्राद्धाची पोळी भाजते..
कणिकदिव्याला तेल मात्र मिळत नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही

>>>>>भूपेश ( २००८-०७ )<<<<<<<



.

Wednesday, July 16, 2008

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,

फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा…..

Tuesday, July 15, 2008

तरीसुद्धा ----------- मंगेश पाडगांवकर

समूहात बसून ही गाणी
ऎकावीशी वाटली तर
त्यात काय चूक आहे ?
शब्दांचं नादरूप
असं मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे !

तरीसुद्धा डोळे मिटून
मनोमय तालावर
आपल्यालाच मनात नाचता आलं पाहिजे;
एकटं बसून एकट्याने
प्रत्येक गाणं
आपल्याच मनात वाचता आलं पहिजे !

----------- मंगेश पाडगांवकर




भेट तुझी माझी स्मरते - मंग॓श पाडगांवकर

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची ॥ध्रु॥

कुठे दीवा नव्हता, गगनी एकही ना तारा
आंधळ्या तमातुन वाहे , आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भीतीच्या वीषाची ॥१॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

क्षुद्र लौकीकची खोटी झुगारुन नीती
नांव्गांव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ॥२॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

केस चींब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्याची कीती फुले झाली
श्वासांनी लीहीली गाथा प्रीतीच्या रसाची ॥३॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नांतच स्वप्न दीसावें तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची

- मंग॓श पाडगांवकर

इतके दुर होतो? ---- मंगेश पाडगावकर

आठ ऒळी
इतके दुर होतो???खरेच ठाऊक नव्हते,
रितेच होते विणलेले श्वासांचे घरटे???
निसर्गक्रमाची सोयिस्कर साधनेच नुसती????
जवळपणात कधीच घडले नाही मोती???

सावल्यांच्या अफवांत दोन झाडे उभी राहीली,
पाने आली आणी पाने गळून गेली:
चंद्र उगवला जेव्हा रिकाम्या फांद्यांमागे
डोळ्यात बाहुल्यांत कुणीच नव्हते जागे.
---------------------मंगेश पाडगावकर


जीव भरुन तुझे व्हावे एकदा. ---------- मंगेश पाडगावकर.

जीव भरुन पहावे तुला एकदा
रानाच्या बरगड्यातून पळस पेटताना.
पाण्याच्या रिकाम्या चेहेऱ्याच्या
शुभ्र शुभ्र कळ्या होताना.

जीव भरुन पहावे तुला एकदा
अनिवार हाक प्राणात भरुन:
मोर अंधाराचा थुईथुई भिजताना
पिसाऱ्याचे उधळे आभाळ करुन.

जीव भरुन पहावे तुला एकदा
कळ्यांच्या पहाटे,फुलांच्या सकाळी;
काजव्यांच्या लिपीतले झुलते गाणे
मिटल्या डोळ्यात ओलावताना कधी काळी.

जीव भरुन पहावे तुला एकदा.
जीव भरुन तुझे व्हावे एकदा.
---------- मंगेश पाडगावकर.

एकमेकांशिवाय. मंगेश पाडगावकर.

एकामेकांशिवाय
आपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.
तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.
हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.
गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो.
आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन.
एकमेकांजवळ. एकमेकांना. एकमेकाने.एकमेकांहून.
एकमेकांआत : एकमेकांशिवाय.

असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :
आणि असा चालतो आशयाचा प्रवास.
एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो:
अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:
त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली.
पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ.एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.
मंगेश पाडगावकर.

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...



आपलं जे असतं;
ते आपलं असतं
आपलं जे नसतं;
ते आपलं नसतं
हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


आलेला मोहोर;
कधी जळुन जातो
फुलांचा बहर;
कधी गळुन जातो
पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


कधी आपलं गाव;
आपलं नसतं
कधी आपलं नाव;
आपलं नसतं
अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


पींजऱ्यात कोंडुन;
पाखरं आपली होत नाहीत
हात बांधुन;
हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


झाड मुकं दीसलं तरी;
गात असतं
न दीसणाऱ्या पावसात;
मन न्हात असतं
कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


-मंगेश पाडगांवकर

शुक्रतारा मंद वारा -- मंगेश पाडगावकर

शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥

मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझा आज तू पवन वाहा
तू असा जवळी रहा ॥ २ ॥

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा ॥ ३ ॥

शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटूनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फ़ांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा ॥ ४ ॥

प्रेम करणं सोपं नसतं... Mangesh Padgaonkar

प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...

खाली डोकं, वर पाय ! -- मंगेश पाडगावकर

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !



-- मंगेश पाडगावकर

प्रेम म्हणजे प्रेम असतं !! मंगेश पाडगांवकर

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करत येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चूकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात ती
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लगतात
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !

लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं :
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी मणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण
चक्क मला म्हणाला:
"आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही !

पाच मुलं झाली तरी
प्रेमबी कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का ?
प्रेमाशिवाय अडलं का ? "

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हणलं :

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं मात्र 'सेम' नसतं !

तिच्या सोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने !
एक चोकलेट अर्ध अर्ध
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत
तासनतास फिरला असाल
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!

दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!

मंगेश पाडगांवकर

फसलेली प्रेमकहाणी!!

फसलेली प्रेमकहाणी!!

नाही वाटले कधीही
कुणा दुसऱ्यावरती झुरावे
तुझ्या नकाराने का माझे
जन्मांचे प्रेम सरावे?

नसते काही कळ्यांच्या
नशिबी भाग्य फ़ुलाचे
म्हणूनी का वेड्या कळ्यांनी
जन्म घेण्याचे थांबावे?

खचलो जरी मी आज
राहेन उभा नव्याने
उरी जपुन ठेवीन मात्र
माझे हे अर्धवट गाणे

जाशिल तू जिथेही
तव पायी सुख नांदावे
‌इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मी
की तव शुभहीतही न चिंतावे!!

जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्र
मांडेन माझे गाऱ्हाणे
विचारेन, इतके का शुल्लक होते
माझे हे प्रेम दीवाणे?