* १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
* २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
* ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
* ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
* ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
* ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
* ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
* ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
* ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
* १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
* ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
* १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
* १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
* १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
* १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
* १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
* १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
* १८) आधी विचार करा; मग कृती करा.
* १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
* २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
* २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
* २२) अतिथी देवो भव ॥
* २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
* २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
* २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
marathi kavita | subhashita | mhani | thoughts | marathi poems | kavita collection
Total Pageviews
Saturday, June 9, 2012
चालता चालता कधीतरी ठेच लागणारच, जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच? दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच? दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे. आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं..ह्यालाच जगणे म्हणतात …. स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो …. .दुसऱ्याच्या आनंदात आपले सुख पाहतो ….तो सुखी राहतो..!
जमेल का पून्हा लहान व्हायला..? जमेल का पून्हा लहान व्हायला..? "क्षणात घेतात कट्टी अन क्षणात घेतात बट्टी आवडते त्यांना शाळा जर असेल तर सूट्टी ... कोणाच काही न ऐकनारा स्वभाव त्यांचा हट्टी धाक दाखवायला घ्यावी लागते हातामध्ये पट्टी .. अभ्यासाचा वेळी यांना खेळ भारी सुचतो क्लासमध्ये बसल्या बसल्या बाजुवाल्याला पेन्सीलच टोचतो .. छडीसारखे प्रसाद तर यांना रोजचेच भेटतात दप्तर फ़ेकून घरात खेळायला पळतच सुटतात .. अभ्यासात नेमके यांचे पाढेच कसे चुकतात गणित सोडवायला घेतल की हातचे एकच हुकतात .. चित्र काढतांना मात्र चित्रामध्येच घुसतात ओरडा खाऊन मोठ्यांचा कोपर्यात जाऊन बसतात .. अस हे लहाणपन पून्हा कधीच वाट्याला कुणाच्या येत नाही लहान मुलांबरोबर खेळतांना ठरवूनही मन लहान होत नाही.....!!!!!.
Monday, June 4, 2012
जीवनाच्या प्रवाहात
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........
नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........
पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही.....
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........
नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........
पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही.....
Sunday, June 3, 2012
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का.?

Some of the good marathi blogs
Some of the good marathi blogs
http://www.marathimati.com/balmitra/marathi_stories/chaturya_katha/chaturya_katha_34.asp
www.maayboli.com/
www.amolmayekar.com
www.khapre.in/content/marathi/index.aspx
mr.upakram.org/
http://sanvaad.blogspot.com/
http://lopamudraa.blogspot.com/2007_12_02_archive.html

येत नाही.....
कपडे स्वच्छ ठेवून कधी,
चिखलात पडता येत नाही
आरसा पुढे ठेवून
स्वतः पासून दडता येत नाही
प्रेम आणि स्वात्यंत्र
हे विरूध्दार्थी शब्द आहेत
पंखात पंख घालून कधी,
गगनात उडता येत नाही
मनात जिद्द असेल तर
"एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो
मेलेल्या मनाला साधा,
जिना चढता येत नाही
आयुष्य धरायला गेलात तर, चावतं
एखाद्या कुत्र्यासारखं
पण पळून जाईल ह्या भितीने,
त्याला सोडता येत नाही
पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा
उपयोग नाही
जेव्हा तुम्हाला
माणसाला, माणूस जोडता येत नाही
चिखलात पडता येत नाही
आरसा पुढे ठेवून
स्वतः पासून दडता येत नाही
प्रेम आणि स्वात्यंत्र
हे विरूध्दार्थी शब्द आहेत
पंखात पंख घालून कधी,
गगनात उडता येत नाही
मनात जिद्द असेल तर
"एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो
मेलेल्या मनाला साधा,
जिना चढता येत नाही
आयुष्य धरायला गेलात तर, चावतं
एखाद्या कुत्र्यासारखं
पण पळून जाईल ह्या भितीने,
त्याला सोडता येत नाही
पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा
उपयोग नाही
जेव्हा तुम्हाला
माणसाला, माणूस जोडता येत नाही
सॅंडविच
सॅंडविच
Saturday, February 07th, 2009 AT 1:02 PM
खरं म्हणजे माझं आणि बायकोचं पटत नाही, असं अजिबात नाही. कुठल्याच विषयात आमचे टोकाचे मतभेद नाहीत; पण तिचं माझ्या आई-वडिलांशी जमत नाही. मग ती मला सारखं त्यांच्यावरून टोकत असते. मुलं त्यांच्याकडे गेली तरी मोठा वाद होतो. एखादा निर्णय मी आई-वडिलांना विचारून घेतलाय, असं नुसतं वाटलं तरी तो तिनं फिरवलाच म्हणून समजा. आता आता तर तिनं सांगायलाच सुरवात केली आहे, "एक तर मी नाही तर ते'. हे एक सोडलं तर ती चांगली शिकलेली आहे, नोकरी करते. घर, मुलंसुद्धा नीट बघते. माझ्याविषयी तिला आकस आहे, असं नाही; पण सतत आई-वडिलांशी वाद आणि त्यांच्याशी संबंध सोडायची भाषा.
"दुसरीकडे म्हणाल, तर मी एकुलता एक मुलगा. आई-वडील म्हणतात, की तुझं लग्न केलं आणि तू पार बदललास. त्यांचं आणि माझ्या बायकोचं अजिबातच जमत नाही. आईचा आणि तिचा तर छत्तीसचा आकडा. आईच्या मते तिला शिस्त नाही, पद्धत नाही, आमच्या घरात ती एकरूपच झालेली नाही. तर हिच्या मते माझी आई संसारात फारच ढवळाढवळ करते. थोडक्यात काय, तर मी दोन्ही बाजूंनी फटके खातो.'"तसं पाहिलं तर आई-वडिलांनी खस्ता खाऊन माझं शिक्षण पूर्ण केलंय. माझ्या कॉलेजच्या मोठाल्या फी भरल्यात. आता लग्न झालंय म्हणून आई-वडिलांना तोडून टाकावं, हे मला मान्य नाही. तसंच बायकोलाही आई-वडिलांशी जमत नाही एवढ्या कारणानं मी दूर करू शकत नाही.'
""म्हणजे चांगलाच समजूतदार आहेस की तू.'' मी म्हणालो. ""अहो, पण उपयोग काय त्याचा? थोडक्यात सांगायचं तर माझं "सॅंडविच' झालंय. सगळ्यात वाईट म्हणजे माझ्यावर दोघंही नाखूष. बायको म्हणते, की एवढं आई-वडिलांचं ऐकायचं होतं तर लग्नच करायचं नव्हतं. आई वडील म्हणतात, की तू इतका बावळट आणि बायकोच्या आहारी जाणारा निघशील असं वाटलं नव्हतं. आता मी तरी काय करू? मला तर वाटतं, की सगळ्यांनाच सोडून द्यावं किंवा आपणच कुठंतरी पळून जावं, कारण कोणीच माघार घ्यायला तयार नाही.'
""अरे, पण हा काही त्यावरचा उपाय नाही.'' मी त्याला कसंबसं समजावलं; पण त्याची स्थिती दया येण्याजोगी होती, हे मानायलाच पाहिजे. काही ठिकाणी मुलगा "खमक्या' असल्याने तो आई-वडील आणि बायको दोघांनाही आपापल्या ठिकाणी ठेवतो. मात्र काही मुलं या वादात प्रचंड चिंतेत पडतात. त्यांना दोघांचंही पटतं आणि मग नक्की काय करावं, हे कळत नाही. तिसरा प्रकार फारच वेगळा असतो. ते लोक आई-वडील आणि बायको यांच्या वादाचा आणि आपला काहीही संबंध नाही, असं जाहीर करून स्वतः सुखी होतात; पण सरहद्दीवरच्या चकमकी मात्र जोरात चालूच राहतात.
अर्थात हा काही सर्वसामान्य नियम नाही किंवा वादाचं एकमेव कारण नाही. अनेक ठिकाणी सुनेला मुलीप्रमाणे आणि सासू-सासऱ्यांना आपल्या आई-वडिलांप्रमाणे वागवलं जातं. पण जिथं असं घडत नाही तिथं मात्र मुलगा हवालदिल होतो. दोन्ही बाजूंकडून मुलावर हक्क प्रस्थापित करण्याच्या नादात वाद वाढत जातात. अशा स्थितीत मार्ग कसा काढावा, या चिंतेत मुलगा पडतो.हा विषय वर्षानुवर्षं चर्चिला जात आहे. याला अनेक पैलूही आहेत. फक्त व्यवसायात दिसणारा हा एक वादाचा मुद्दा. मात्र कुटुंबं छोटी झाल्याने तो गंभीर बनला आहे. या अशा वादात खरा तोटा, ज्याच्याशी कोणाचाच वाद नाही, अशा मुलांचाच होतो. दोघांचाही हेतू त्या मुलाचं हित व्हावं, हाच असतो. पण मग दोन्ही बाजूंनीही समजूतदारपणा दाखवला आणि आपल्या वादात विनाकारण मुलाचा तोटा होतो आहे, याचा विचार केला, तर या "सॅंडविच'चा खप थोडा कमी होईल.
ऍड. अभय आपटे

Labels:
adjustment,
compromise,
marriage,
married life,
saptarang Close...
Saturday, April 3, 2010
Kind Request to Blog readers/ followers
Dear Blog readers, this blog is just my copy paste collection of nice poems I liked most.
Some of people created rumours that I am writing poem in someone's memory. But fact is read the blog properly you will understand.
Some of people created rumours that I am writing poem in someone's memory. But fact is read the blog properly you will understand.
Friday, July 18, 2008
मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...
ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
मग एक दिवस,
चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......
पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं....... -मंगेश पाडगांवकर

तिथे आता कुणी रहात नाही
पाया ढासळलेला पिंपळाचा पार
ओढ्याच्या पल्याडचं चौसोपी घर,
कुत्रही त्याच्या वाटयाला जात नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही
घुसण्याची हिम्मतच नाही कुणाची
एका भणालेल्या वाऱ्याशिवाय..
तोही अधून मधून धुडगूस घालतो..
मन मानेल तस्सा.. दारू पिल्यागत…
पिचलेल्या भिंतीवर धडका मारतो..
माजलेल्या मस्तवाल बोकडागत…
त्याला पुर्वीचा माळी अडवत नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही
मोडकळीस आलेला लाकडी जीना
त्याला अगदी मोजक्याच पायऱ्या…
त्यातही दोनचार पेकाट मोडलेल्या..
खिळ्यावर अधांतरी लोंबलेल्या..
लाचार दिनवाण्या..आश्रितासारख्या..
जीना खाली येतो..पण वर जात नाही..
कारण तिथे आता कुणी रहात नाही
वर्षातून फ़क्त एकदा वाडा जिवंत होतो..
हसण्या खिदळण्याचा आवाजही येतो…
चांदण्यात रातराणीचा सुवास दरवळतो..
वळचणीचा निपचीत सापही वळवळतो..
चुलीची उष्णता त्यादिवसापुरती टिकते
सून तिच्यावर श्राद्धाची पोळी भाजते..
कणिकदिव्याला तेल मात्र मिळत नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही
>>>>>भूपेश ( २००८-०७ )<<<<<<<
.
ओढ्याच्या पल्याडचं चौसोपी घर,
कुत्रही त्याच्या वाटयाला जात नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही
घुसण्याची हिम्मतच नाही कुणाची
एका भणालेल्या वाऱ्याशिवाय..
तोही अधून मधून धुडगूस घालतो..
मन मानेल तस्सा.. दारू पिल्यागत…
पिचलेल्या भिंतीवर धडका मारतो..
माजलेल्या मस्तवाल बोकडागत…
त्याला पुर्वीचा माळी अडवत नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही
मोडकळीस आलेला लाकडी जीना
त्याला अगदी मोजक्याच पायऱ्या…
त्यातही दोनचार पेकाट मोडलेल्या..
खिळ्यावर अधांतरी लोंबलेल्या..
लाचार दिनवाण्या..आश्रितासारख्या..
जीना खाली येतो..पण वर जात नाही..
कारण तिथे आता कुणी रहात नाही
वर्षातून फ़क्त एकदा वाडा जिवंत होतो..
हसण्या खिदळण्याचा आवाजही येतो…
चांदण्यात रातराणीचा सुवास दरवळतो..
वळचणीचा निपचीत सापही वळवळतो..
चुलीची उष्णता त्यादिवसापुरती टिकते
सून तिच्यावर श्राद्धाची पोळी भाजते..
कणिकदिव्याला तेल मात्र मिळत नाही
कारण तिथे आता कुणी रहात नाही
>>>>>भूपेश ( २००८-०७ )<<<<<<<
.
Wednesday, July 16, 2008
आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा…..

Tuesday, July 15, 2008
तरीसुद्धा ----------- मंगेश पाडगांवकर
समूहात बसून ही गाणी
ऎकावीशी वाटली तर
त्यात काय चूक आहे ?
शब्दांचं नादरूप
असं मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे !
तरीसुद्धा डोळे मिटून
मनोमय तालावर
आपल्यालाच मनात नाचता आलं पाहिजे;
एकटं बसून एकट्याने
प्रत्येक गाणं
आपल्याच मनात वाचता आलं पहिजे !
----------- मंगेश पाडगांवकर
ऎकावीशी वाटली तर
त्यात काय चूक आहे ?
शब्दांचं नादरूप
असं मिळून भोगणं ही
प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे !
तरीसुद्धा डोळे मिटून
मनोमय तालावर
आपल्यालाच मनात नाचता आलं पाहिजे;
एकटं बसून एकट्याने
प्रत्येक गाणं
आपल्याच मनात वाचता आलं पहिजे !
----------- मंगेश पाडगांवकर
भेट तुझी माझी स्मरते - मंग॓श पाडगांवकर
भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची ॥ध्रु॥
कुठे दीवा नव्हता, गगनी एकही ना तारा
आंधळ्या तमातुन वाहे , आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भीतीच्या वीषाची ॥१॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....
क्षुद्र लौकीकची खोटी झुगारुन नीती
नांव्गांव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ॥२॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....
केस चींब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्याची कीती फुले झाली
श्वासांनी लीहीली गाथा प्रीतीच्या रसाची ॥३॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नांतच स्वप्न दीसावें तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची
- मंग॓श पाडगांवकर

इतके दुर होतो? ---- मंगेश पाडगावकर
आठ ऒळी
इतके दुर होतो???खरेच ठाऊक नव्हते,
रितेच होते विणलेले श्वासांचे घरटे???
निसर्गक्रमाची सोयिस्कर साधनेच नुसती????
जवळपणात कधीच घडले नाही मोती???
सावल्यांच्या अफवांत दोन झाडे उभी राहीली,
पाने आली आणी पाने गळून गेली:
चंद्र उगवला जेव्हा रिकाम्या फांद्यांमागे
डोळ्यात बाहुल्यांत कुणीच नव्हते जागे.
---------------------मंगेश पाडगावकर

Subscribe to:
Posts (Atom)