कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नये
हसवता आल नाही तरी रडण्याचे कारण होऊ नये
-----------
जेव्हा तुम्ही रागात असतात तेव्हा
कोणताच निर्णय घेऊ नका
जेव्हा तुम्ही आनंदी असतात तेव्हा
कोणालाही शब्द देऊ नका
-----------------
फुला सारखी हसत राहिलींस....
तर मी खुश आहे,
मोकळेपणाने जगत राहलीस...
तर मी खुश आहे,
मी असं नाही म्हणत कि रोज मला भेट....
दिवसातून फक्त एकदा,
जरी राणी माझी आठवण काढलीस.
तर मी खुश आहे...
---------
परी सारखी नसेल तरी चालेल
पण खरी असली पाहिजे
-------
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला महत्व आहे
मृत्युपेक्षा श्वासाला किंमत असते
प्रेम तर सर्वच करतात - पण प्रेमा पेक्षा विश्वासाला किंमत असते
-------
भिंतित भेग पडली तर भिंत पडते
नात्यात भेग पडली तर भिंत उभी राहते
----
नात्याची गरज असावी - पण गरजेपूरता नव्हे
----
लोक पिझ्झा साठी ३०० रुपये देतात मात्र ३ रुपये कमी करत नाही म्हणून गरीब भाजी वाल्यासोबत वाद घालतात.
----
४०००
रुपयाच्या फटाके ४ मिनिटात फोडून लाखों लोकांना धुरात ढकलून आयुष्य खराब
करण्यापेक्षा - ४ घास गरिबाला खाऊ घाला ; ४ दिवस नक्कीच चांगला आयुष्य जगाल
आणि ४ लोक पण तुमचा नाव काढतील .. सांगायचा माझा काम - बाकी तुमची मर्जी
----
तलाव जेव्हा पाण्याने पुर्ण भरलेला असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात
जेव्हा तलाव खाली होतो तेव्हा किडे माशांना खात असतात
संधी प्रत्येकाला मिळते - मित्रांनो आपली संधी येण्याची वाट पाहू
-------
चालणारे २ पाय किती विसंगत चालतात
एक पुढे व एक मागे
पुढच्याला अभिमान नसतो आणि मागच्याला अपमान नसतो
कारण त्यांना माहित असता हे सगळा क्षणिक आहे आणि परिस्थिती बदलणार - यालाच जीवन असे म्हणतात
-----
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला