Total Pageviews

Wednesday, August 20, 2014

एका स्रीचा प्रश्न तिच्या नवर्याला

एका स्रीचा प्रश्न तिच्या नवर्याला जो सरळ
तुमच्या हि हृदयाला स्पर्श करेल.
------------------------
देह माझा ,
हळदी तुझ्या नावाची।
हाथ माझे ,
मेहंदी तुझ्या नावाची।
डोकं माझं ,
ओढ़णी तुझ्या नावाची।
माथा माझं ,
कुंकू तुझ्या नावाचं ।
कपाळ माझं ,
टिकली तुझ्या नावाची ।
नाक माझं ,
नथनी तुझ्या नावाची ।
गळा माझा ,
मंगलसूत्र तुझ्या नावाचं ।
कलाई माझी ,
बांगड्या तुझ्या नावाच्या ।
पाय माझे ,
पैंजण तुझ्या नावाचे ।
बोटं माझी ,
जोडवे तुझ्या नावाचे ।
वडीलधाऱयांच्या पाया मी पडते ,
आणि "सदा सौभाग्यवती " चा आशिर्वाद
तुझ्या नावाने ।
अजुन तर अजुन -
करवाचौथ/वडपौर्णिमेचा उपवास तुझ्या नावाचे

ईथ पर्यंत कि
पोट माझं / रक्त माझं / दूध माझं ,
आणि बाळ ?
बाळ तुझ्या नावाचं ।
घरच्या दरवाज्या वर लावलेली
'नेम-प्लेट' तुझ्या नावाची ।
अजुन तर अजुन -
माझ्या नावा समोर लिहलेल गोत्र पण माझ
नाही ,तुझ्या नावाचं ।
दोघेही बाहेर कमवून
आणणार तेही तुला हाथभार लावण्यासाठी पण
मग फक्त घरातली काम मीच एकटीने
का करावीत ते करताना तू का नाहीस
माझ्याबरोबर आणि सर्व
काही तुझ्या नावाचं .. नम्रता पूर्वक विचारते :
शेवटी तुझ्या जवळ ....
काय आहे माझ्या नावाचं ?

ज्याला त्याला हवी बायको गोरी

ज्याला त्याला हवी बायको गोरी
काळ्या मुली जातील कुण्या घरी
तो एकेक पाहूणा येतो
फक्त मुलगी पाहुनी घेतो
गुणात कशीही रंगानेच गोरी
काळ्या मुली जातील कुण्या घरी
मुलगा डांबरचा काळा गोळा
गोरया मुलीवर त्याचा डोळा
डांबर ही म्हणे पाहीजे गोरी
काळ्या मुली जातील कुण्या घरी
हा कसा बदलला काळ
ऐकून पोटात होतो जाळ
छान छबेली पाहीजे न्यारी
काळ्या मुली जातील कुण्या घरी
लग्न करतील कुणा संग
कसा आला हा प्रसंग
गळा दोरी घ्या फासावरी
काळ्या मुली जातील कुण्या घरी

मरावे तरी कसे ??

मन मोकळेपणाने वावरले तर म्हणतात,
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीरपणे वावरले
की म्हणतात, आमोरासमोर
बोलण्याची हिम्मत नाही!!
लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लपवायचे असेल !
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलीतच काहीतरी खोट आहे !!
खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागासलेली असेल !!
मित्र मंडळी असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल. !
मित्र मंडळी कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंडी असेल.!!
या अशा दोन्ही बाजूने लोक
बोलतात तर , माणसाने या जगात
जगावे तरी कसे
व निरपराध असताना सुद्धा मरावे
तरी कसे ??

तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी,
पण
एक चुक पुष्कळ आहे ते
दिशाहीन करण्यासाठी,

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी,
पण
जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्या साठी,

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी,

किती सराव करावा लागतो
विजयश्री वर नाव कोरण्यासाठी,
पण
जरासा आळस कारणीभूत
ठरतो जिंकता जिंकता हरण्यासाठी,

किती तरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी,

किती तरी अनुभवातनं जावं
लागतं आयुष्य एक कोडं आहे
हे पटण्यासाठी,

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जीवनभर तारण्यासाठी,

एक अविश्वासाचा दगड
सक्षम आहे ते कायमचं
उद्धवस्त करण्यासाठी
कलीयुगाचे पर्व आहे..,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!

मी आहे तरच सर्व आहे...,
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!

अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!

प्रेमाने जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द

हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!

कधीतरी कुठेतरी आपण, कोणावर तरी प्रेम करतो

कधीतरी कुठेतरी आपण, कोणावर तरी प्रेम करतो
देवाने दिलेल्या, सुंदर भेटीचा स्वीकार करतो
प्रेमात असतो तेंव्हा, सगळ काही छान वाटत
पण कोणी जात सोडून तेंव्हा, सार खोट अस
जाणवत
प्रेमात असताना, इतर सगळ नको नकोस वाटत
अन प्रेम दूर गेल्यावर, सार काही जवळच भासत
आयुष्यात कुठेतरी , काहीतरी चुकत असते
पण ठेच लागल्याशिवाय, आयुष्य हि सुंदर बनत नसते
…. !!!!

मला माणसे जोडायला आवडतात

मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण
माझा विश्वास आहे की,
माझ्या मृत्यूनंतर
मी कमावलेली संपत्ती
मी माझ्याबरोबर घेऊन जाणार
नाही,परंतु
मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील
अश्रूंचा एक थेंब हाच
माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच
माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई
असेल

नवरा विरुद्ध बायको.

नवरा विरुद्ध बायको....?
नवरा हा नवराच असतो
बायको ही बायकोच असते
हक्काचे आणि प्रेमाचे
दोघांचे एकच जग असते
तिची धाव जरी माहेरच्या कुपणापर्यंत
तरी घरातल्या वीटेवीटेत तिचे अस्तित्व असते
तिच्या अस्तित्वानेच येतो घरी ओढल्यागत
जरी मित्राच्या घरी रंगलेली रात्र असते
लग्न करतात दोघे तेव्हा
तो उताविळ नवरा आणि ती लाजरी नववधु
दोघही एकमेकां वर करत असतात
आंधळं प्रेम आणि नजरेनं जादू..
तालावर नाचवाताना ती
संसाराची लय सोडत नाही
नाचतो तो ही गप गुमान
तिची साधलेली लय बिघडवत नाही
कधी तो कधी ती
चुका दोघही करतात
तो चूकतो तंव्हा आणतो गजरा
ती चूकते तेंव्हा येते लाडात
मोलकरणीवर गेलेलं लक्ष
तिला आवडत नाही
आणि तिच्याकडे कोणी पाहिलं
तर त्यालाही खपत नाही
तिच्या तोंडी माहेरचा गोडवा
तो म्हणतो माझ्या आईच्या हातची चवच न्यारी
दोघांनाही असतात
आपापल्या माहेरची माणसं प्यारी
घरात असले दोघे
पेटलेलं भांडण असते
एक कोणी नसेल तर
न सोसणारी आठवण असते
जन्म दिलेल्या बाळांचे
त्यांना मिळालेले पालक्त्व असते
त्यांचे नाते ह्यामुळेच
अधिकच झाले परिपक्व असते
संकटातही दोघांना
एकमेकांची साथ सोबत असते..
कारण तुझं वेगळं-माझं वेगळं
अशी संकटांची वाटणीच नसते
कधी तांडव कधी मांडव
कधी तप्त ऊन कधी थंड छाया
आसुसलेल्या त्याच्या स्पर्शासाठी
तिची रसरसलेली काया
'नवरा विरुद्ध बायको'
कधी न संपणारं हे भांडण आहे
खरंतर दोघांचही अस्तित्व
एकमेकांशिवाय अपुर्ण आहे.

बायको कशी असावी

बायको कशी असावी ...
बायको कशी असावी ...
सुंदर नसली तरी चालेल,
पण चार चौघात उठून दिसणारी असावी ...
बायको कशी असावी,
समजुद्दार नसली तरी चालेल,
पण माझ्या भावना समजून घेणारी असावी ...
बायको कशी असावी,
प्रेमळ नसली तरी चालेल,
पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी असावी ...
बायको कशी असावी,
हुशार नसली तरी चालेल,
पण सर्व गोष्टी हुशारीने हाताळणारी मात्र असावी ...
बायको कशी असावी,
धैर्येवान नसली तरी चालेल,
पण दुःखाच्या क्षणी मला सावरणारी असावी ...
बायको कशी असावी,
गमतीदार नसली तरी चालेल,
पण माझ्यासारखी खोडकर नक्की असावी ...
बायको कशी असावी...
हसताना गालावर खळ्या पडल्या नाहीत तरी चालेल,
पण तिच्या हसण्यातून दुसऱ्यांच्या दुखांवर फुंकर मारणारी आणि हसू
फुलवणारी मात्र असावी ...
ती कशीही असुदे, पण बायको पेक्षा एक मैत्रीण म्हणून जास्त
असावी ..

गंध फुलांचा गेला सांगून


गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मीलन, व्हावे
मीलन
सहज
एकदा जाता जाता मिळुनि हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत
भावना गेली बांधून
विरह संपता,
मीलनाची अमृतगोडी चाखीत
असता
सखया अवचित जवळी येता ढळे
पापणी गेले लाजून
मनामनांच्या हर्षकळ्यांची आज
गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची गुंफून
सखया तुलाच वाहीन

दुनिया में सब चीज मिल जाती है


दुनिया में सब चीज मिल जाती है,
केवल अपनी गलती नहीं मिलती ..!!!!!

Changing The Gear On Right time

Race Can Not Be Won by Accelerating On " Top Gear "
But ,
It Can Be Won Only By Changing The Gear On Right time ... !!!

जिंदगी में बहुत गम मिलेंगे

जिंदगी में बहुत गम मिलेंगे ,
सच मानो अच्छे दोस्त कम मिलेंगे …!
जिस मोड पर सब साथ छोड देंगे ;
उस मोड पर इंतजार करते हम मिलेंगे …. !!!


 ------------------------------------------

मंज़िलों से भी गुमराह कर देते हैं कुछ लोग…
हर किसी से रास्ता पूछना, अच्छा नहीं होता।।

आयुष्य सापशिडी सारखं असतं.

आयुष्य सापशिडी सारखं असतं.
सृष्टी चालवणारा "क्षणाला" अंकांच्या ठोकळ्यासारखं वापरतो. सापशिडी वरती हा ठोकळा टाकला जातो. एक, दोन, तीन... अंक पडत राहतात.
आयुष्यात येणारी कोणती व्यक्ती शिडी बनेल आणि कोणती व्यक्ती सापासारखी वागेल याचा अंदाज लावता येत नाही.
पाचची अपेक्षा असतात दोन मिळतात आणि कधी तीनची अपेक्षा असताना सहा मिळतात.
सहा वरती कधी कधी साप वाट्याला येतो आणि "नेहमी कमी मिळाले म्हणून रडणारा माणूस कधी कधी जास्त मिळालं म्हणून पण रडतो."
होणाऱ्या 'वेदना' आपल्याला 'आपल्या अस्तित्वाची' जाणीव करून देतात.
काही तरी "गमावणं" हि गोष्ट "आपल्याकडे गमावण्यासारखं पण काहीतरी होतं" हे कळून देण्यासाठी गरजेचं असतं.
खेळ चालत राहतो... शिड्या मिळतात... साप गिळतात... क्षणाचे फासे पडत राहतात...
पण प्रत्त्येक क्षण काही न काही देऊन जातो.
कारण खेळातला असो व आयुष्यातला असो... अंकांच्या ठोकळ्यावर "शून्याचा" अंक नसतो. म्हणून प्रत्त्येक क्षण लुटून घ्यायचा.🎲🎲🎲

तू छोड़ दे कोशिशें इन्सानों को पहचानने की ...

तू छोड़ दे कोशिशें
इन्सानों को पहचानने की...!
यहाँ जरुरतों के हिसाब से
सब नकाब बदलते हैं...!

मेरे बारे मे कोइ
राय मत बनाना दोस्त !
मेरा वक्त भी बदलेगा,
और तेरी राय भी..!

You Remembered By The

You May Be Known By The Designation On Your Visiting Card ....

But Are You Remembered By The :
" VALUES " You Show ...
" PRINCIPLES " You Live .....
And
" LOVE " You Give .... !!!