काल लोकल मधे फुल गर्दी, लोक अक्षय तृतीयेला नटत , सजत नाहीत तेवढे लै भारी होऊन लोकल च्या गर्दीत उभे राहून बायका पोरांना घेऊन 🙃
कशासाठी तर कोणाकडे तरी पार्टी असेल, बसून दारू पिऊ आणि मस्त नॉन व्हेज खाऊ (कोंबडी),
नाहीतर काहींचा प्लॅन 31 ला बाहेर फिरायचे , खायचे आणि घरी यायचे, झोपायचे..
मला तर काही फरक वाटत नाही .. काल आणि आज मध्ये
31 डिसेंबर 2017 आणि 1 / 1/ 2018 मध्ये
उलट आपले सण बघा आणि
* नवीन वर्ष "गुढी पाडवा - चैतन्य मास आरंभ" कसा निसर्गात चैतन्य लागल्याची चाहूल असते.. सगळीकडे वृक्ष हिवाळा सम्पून हिरवेगार झालेले असतात.. सर्व निसर्गच नवीन वर्षात जाण्यासाठी, नवीन रूपासाठी आतुर असतो.. म्हणून आपले नवीन वर्ष ते जे निसर्ग सुद्धा मानतो..
* मकर संक्रांती - पौष / माघ महिन्यात - सूर्याच्या मकर राशी संक्रमणाशी जोडलेला आहे, इथे सुद्धा निसर्ग खुद्द सूर्य तुमच्यासोबत साजरा करतोय
थंडी ओसरून आता उन्हाळा लागणार
* वैशाख शुक्ल तृतीया - अक्षय तृतीया
* बुद्ध पौर्णिमा - या दिवशी तुम्ही चंद्र नक्की बघा. सांगा बाकीचे दिवस व आज चंद्रा मध्ये काय फरक दिसतो ते.
* गुरू पौर्णिमा - आषाढ पौर्णिमा - नेमकी शाळा चालू झाल्यावर जून-जुलै असते
* नागपंचमी - श्रावण शुक्ल पंचमी - नेमकी पावसाळ्यात
* नारळी पौर्णिमा - श्रावण शुक्ल पौर्णिमा
* गोपाळकाला / दहीहंडी
* गणेश चतुर्थी - भाद्रपद शुक्ल 4 चतुर्थी
* ऋषी पंचमी - भाद्रपद शुक्ल पंचमी
* घटस्थापना - अश्विन शुक्ल प्रथमा
* दसरा - अश्विन शुक्ल नवमी
* कोजागिरी पौर्णिमा - अश्विन पौर्णिमा
* दिवाळी
अश्विन कृष्ण 13 - त्रयोदशी - धन त्रयोदशी
अश्विन कृष्ण 14 चतुर्दशी
अश्विन कृष्ण 15- अमावस्या - लक्ष्मी पूजन
कार्तिक शुक्ल 1 - बलिप्रतिपदा
कार्तिक शुक्ल 2 - भाऊ बीज
सर्व वरील दिवाळी मस्त थंडगार हिवाळा ची सुरुवात असते
लेखक - श्रीनिवास मधुकर वाणी
2 comments:
मी आर्यांच्या प्राचीन व अर्वाचीन सणांचा इतिहास हे पुस्तक वाचले. प्रत्येक सण का व कशासाठी या विषावी सविस्तर माहिती आहे. जर तू थोडा आणखीन माहिती इथे टाकशील तर छान होईल.
मस्त राकेश.. मी थोडा गडबडीत लिहिलं , तुझा अभिप्राय स्वागतार्ह आणि आवर्जून कृतीत आणण्याजोगा , खूप धन्यवाद 👍
Post a Comment