असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..
असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..
असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..
असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..
असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................
marathi kavita | subhashita | mhani | thoughts | marathi poems | kavita collection
Total Pageviews
Showing posts with label marathi kavita poem. Show all posts
Showing posts with label marathi kavita poem. Show all posts
Monday, June 23, 2008
Friday, June 20, 2008
तू काय आहेस.......??
तू काय आहेस.......??
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाहीपण आवाजाची गोडि फार छान आहे
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण स्वभावाची रंगत फार न्यारी आहे
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण बोलण्याची लकब मोठी भारी आहे
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण रागातील नखरा तर बाप रे बाप!
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण प्रेमाच्या ओळाव्याला मोलच नाही
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण खुडकन हसलीस म्हणजे वाटे चांद हाती
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण डोल्यातील पाणी खरे अनमोल मोती!
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही......!!
आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा…..
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा…..
Subscribe to:
Posts (Atom)