Total Pageviews

Tuesday, July 15, 2008

अक्षता...ek vichar

अक्षता... अनिल करवीर
या लग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत असतो. कारण आपला संस्कार आपल्याला असे सांगतो की भटजी ज्या वेळेला मंगलाष्टक म्हणत असतो, त्या वेळेला अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर पडल्या तर त्यांचा संसार सुखाचा होतो. भटजीने “शुभ मंगल सावधान” म्हटले की आपण वधु-वरांवर अक्षता टाकायच्या एवढं करीत असतो.
पण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षता पैकी किती अक्षता त्या वधु-वरांच्या डोक्यावर पडतात ? १०% सुध्दा नाही. जवळ जवळ ७०% अक्षता आपण आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यावर टाकतो. २०% लोक त्या अक्षतांचा विवीध गोष्टी साठी वापर करतात, एखाद्या मित्राला किंवा विशषत: मैत्रीणीला सतविण्यासाठी, कोणा व्यक्ती विरुध्द राग व्यक्त करण्यासाठी, मुद्दामहून बायकांकडे जोरात अक्षता फेकून क्षणीक विकृत आनंद मिळविण्यासाठी...
लग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून बाहेर येताना बहुतेकजण डोक्यावर हात फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात. सगळी मंडळी गेल्यावर पूर्ण हॉलभर राहतो तांदळाचा सडा... तोही लोकांनी पायानी तुडविलेला...
आपल्या धर्मात म्हटलं जातं “अन्न हे पुर्ण ब्रम्ह”. असे अन्न वाया घालवून व पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत नाही का ?
एका लग्नामध्ये सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न होतात म्हणजे सरासरी २० लाख किलो तांदुळ आपण व्यर्थ वाया घालवितो. एकीकडे जव्हार-मोखाडा येथे लहान मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत आणि आपण सहज लाखो किलो अन्नाची नासाडी करतो.
तुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर टाकायचे तरी काय ? १३५ वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा ऐवजी फुलं वापरण्याचा विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही, सगळेजण फुले वापरायला लागल्यावर २० लाख किलो फुलांच मार्केट तयार होईल, शेतक-याला, कष्टक-याला काम व पैसा मिळेल.
कोणत्याही वधु-वरांला डोक्यावर तांदळाऐवजी मऊ, मखमली फुलें पडली, त्यात त्यांना आप्तेष्टांचा आशीर्वाद व हळूवार मायेचा ओलावा जाणवेल. माझ्या मित्राला त्याच्या लग्नात अंगावर अलगद फूलांच्या पाकळ्या पडत आहेत हे फारच “रोमॅन्टीक” वाटलं.
आपल्या सारख्या प्रगल्भ व्यक्तींनी हा चांगला पायंडा पाडावा ही इच्छा. सगळ्यांनी असा विचार केल्यास वाचलेले २० लाख किलो तांदुळ अनाथाश्रमात किंवा बाबा आमटेंच्या आनंदवनात पाठविले तर त्याहुन अन्य पुण्य नोहे.......

Thursday, July 10, 2008

कोट्याधीश पु. ल.== तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना

एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "

मन हे वेडे : Yogesh

मन हे वेडे , गुंतत राहाते
स्वप्न बिलोरी गुंफत राहाते
ठाउक नसते त्याला तेंव्हा ...
प्रारब्धाचे खेळ अकल्पित ...
धरु पाहता .... निसटुन जाते ||

मन हे पक्षी ... विहरत राहाते
नवी क्षितिजे शोधत राहाते
ठाउक नसते त्याला तेंव्हा ...
सप्तरंगी हे आकाश भुलवून ....
घरट्यापासून दूर नेते .... ||

पण मन आशावादी , झुंजत राहते
क्रूर नियतीला थकवत राहाते ...
ठाउक ' असते ' त्याला तेंव्हा
असला जरी अंधार कितीही ....
प्रकाशाशीच त्याचे नाते ||

ओळख : स्वाती फडणीस

ओळखलंस का मला?
ओळखलंस का गं!
अग..
मी चिनू..
तुझी लाडकी चिनू!
खूप सतावायचे तुला..
तुझा प्रसादही मला जास्त,
आणि तितकीच मायाही!
आठवतंय तुला..
लपून बसलेले एकदा,
तू शोध शोध शोधलंस..
आणि सापडले तेव्हा!
तेव्हा खरं तर..
तूच सापडलीस मला
आणि आता..
माझ्या समोर आहेस,
तरी..
तुला सापडत नाहीये ना!
नको गं लपूस अशी..
त्या अलझ्मेरीया आड!
ओळख.. आठव..
सांग ना!!
ओळखलंस का मला!



====================
स्वाती फडणीस........... १०-०७-२००८

दूर दूर जाताना....................................

एक जवळची व्यक्ती करिअर साठी दूर जात असताना लिहिलेले काव्य.....


अंतर जरीही अनंत असले, अंतरी परी नसावे अंतर,
अभंग असतील अपुली नाती, मणि असावे प्रेम निरंतर.

जा झेपावूनी निळ्या आभाळी, कवळूनी घे तारांगण अवघे,
परी ये परतूनी या धरती वरती, साद घालता धावत वेगे.

खुणावती उत्तुंग शिखरे, विराट सागर अथांग क्षितीजे,
उरात असता अभेद्य आशा, अजिंक्य गगन भासेल खुजे.

बंधपाश जरी खेचतील तुजला, फ़िरून पाहू नकोस मागे,
खचशील परी पतंगापरी, तोडशील जर मागील धागे.

अखंड यत्ने जिंकून घे, आकाश अवघे असीम अवनी,
झेपेल इतकीच घे झेप, नको, घास मोठा छोट्या वदनी.

विसावयाचे विसरु नको, परी विश्रान्तीसी विराम हवा,
जिंकशील तीही लोक जरी, मनी अविरत श्रीराम हवा.

हां उपदेश नको मानूस बंधू, प्रेमाचे हे आलिंगन आहे,
शब्दात कितीही गुंफले तरी, अजून खासे अबोलच आहे.

तुला ठाऊक नसेल

-------------- तुला ठाऊक नसेल ...! ------------------

तुझ्यासमवेत घालवलेल्या प्रत्येक क्षणांची आठवण आहे मला ,
त्या सर्व आठवणीना कधीही न विसरलेला मी तुला ठाऊक नसेल ...!

मला आणि तुला आवडणारे गाणे सारखेच ,
तुला आवडणारे गाणे एकुनच झोपणारा मी तुला ठाऊक नसेल ...!

गर्लफ्रेंड आहे का तुला कोणी ? विचारतात असे मला मित्र,
उत्तर असलेल्या प्रश्नालाही "नाही" म्हणंणरा मी तुला ठाऊक नसेल ...!

तू भेटणार म्हणून उमळलेल्या ,
माझ्या मनातील मोगराचा सुवासही तुला ठाऊक नसेल ...!

एरवी रिकामे असलेले पाकीट ही मी भरून ठेवले होते पैशाने,
तुझा आनंदासाठी खर्च करणारा मी तुला ठाऊक नसेल ...!

तुझी आठवण आली नाही असा दिवस अजुन आला नाही,
माझीही आठवण व्हावी म्हणून "Orkut" वर टाकलेल्या फोटोचे कारणही तुला ठाऊक नसेल ...!

बोलावेसे वाटते मला खूप तुझ्याशी,
पण बोललोच कधी तर गोंधळलेला मी तुला ठाऊक नसेल ...!

पण तू "नाही" म्हटल्यावर तुझ्या विरहात प्राण देणारा
मी तुला नक्कीच ठाऊक असेल ... असेल ना ?

आज असं का घडतयं

आज असं का घडतयं मन सारखं माझ्याशी बोलतयं

जरी तू दिसत नाहीस तरी तुझाच भास होतोय
झाडाची पानं हलली तरी तुझ्या बांगडयांचा आवाज वाटतोय

नदीचं पाणी जरा जास्तच खळाळुन वाहतयं
जसं तुझं हसणचं ऐकल्यासारखं वाटतयं

ढगाआडुन दिसणारा चन्द्र आज तुझी आठवण करुन् देतोय
ओंजळीत लपवलेला तुझा चेहरा आज मला स्मरतोय

हा वाहणारा वाराही माझ्या कानात काहीतरी सांगतोय
एक मात्र खरं कि तो तुझाच सुगंध पसरवतोय

आकाशातुन् सारखं कुणीतरी मला बघतयं
ए.... तू तर नाहीस ना ..?

तू गेलीस तेव्हापासून कधीही घडलं नाही
पण मग आज ..... आज हे असं का घडतयं
मन सारखं माझ्याशी बोलतयं
मन सारखं माझ्याशी बोलतयं

जयंत

प्रेम आं ध ल असत

प्रेम आं ध ल असत पण आन्धल्या व्यक्ति वर ते कधीच नसत
प्रेमात डोलस पना हा असतोच ,रूपावर भाल ले ल्या मनाला मे न्दू जागा करतो
आपल मन का कधीच अपंग व्य क्ति कड़े आकर्षित होत नाही
कारन आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याची त्यात ताकत नसते
मग का म्हनाव प्रेम आन्द्हल असत कारन आन्धल्या व्यक्तीवर ते कधीच नसत

तुम्ही आस्तिक की नास्तिक

तुम्ही आस्तिक की नास्तिक हा प्रश्न नेहमी विचारला जातो
पण आस्तिक या शब्दाचा नेमका काय अर्थ असतो
आस्तिक म्हणजे मुर्तीची पुजा करणे नाही
आस्तिक म्हणजे चांगल्या गोष्टींचा आदर करणे
आस्तिक म्हणजे दान नाही, जीवन दान करणे
आस्तिक म्हणजे मुर्तीवर नसून, श्रद्धेवर श्रद्धा असायला हवी
श्रद्धा मुर्तीवर न ठेवता सत्कृत्यावर असायला हवी
देव आहे विश्वास मनास शक्ती देनारा
देव आहे झरा, वाळवंटात तहान भागवणारा
दुसर्‍याच्या भावनांचा आदर करणे
वा आपले कर्तव्य व्यवस्थित रित्या पुर्ण करणे
यातच आस्तिकता आहे
असाच माणुस खरा अस्तिक म्हणायच्या लायकीचा आहे
तुमचं एक सत्कृत्य हाच देवाला प्रसाद, हाच देवाला हार,
पाप करून नंतर पुजा करणारा खरा नास्तिक आहे
अहो देव म्हणजे काय तुम्हाला समजलंच नाहिये.

Wednesday, July 2, 2008

"एकाकी........."

"एकाकी........."

रतीब इथे आनंदाचा...
सडा पडे प्राजक्ताचा...
प्रज्वलित दिव्यांच्या वाती...
स्नेह धारेच्या बरसाती...

काळाची चक्रे फिरली...
ना कुणी कुणाची उरली...
झाहले विनाश परस्परांचे...
मनही शहारे आरशांचे....

डोईवर 'माये'चेच खूळ...
घराणेही उखडे समूळ....
चहूकडे काळाचे तांडव...
उधळे काडीकाडीचा मांडव....

मम देहीही थरकाप...
निर्जीवास जडे या शाप...
गातो आर्त वेदनेचा पोवाडा...
मी भग्न एक वाडा.....
मी भग्न 'एकाकी' वाडा.....



सौ. रेणुका खटावकर(रेपाळ).....

माझ्यासाठी तू काय आहेस.....

कधी न पाहिले स्वप्नी,
कधी न होते ध्यानी मनी,
असे प्रेम तुझे मला लाभले,
अबोल सारे शब्द मग गीत होऊ लागले..

माझ्या जिवनात आलीस तू अशी,
की सारं काही बहरून गेलं,
लोंखडाचं कणखर जगणं माझं,
तुझ्या परिसस्पर्शाने सोनं होऊन गेलं..

तुझ्या मिठीचा आधाराने मला,
नव्या उमेदिची नव्या आशेची ग्वाही दिली,
म्हणून मी ही प्रत्येक यशाच्या पुर्तीसाठी,
मी परीश्रमाची अन सत्याची वाट धरली..

तुझा तो होकार माझ्यासाठी,
आजही अविस्मरणीय असा आहे,
तुझ्या हातात मी दिलेलं फुल,
अन त्याचा सुगंध अजूनही आपल्या आसपास आहे..

तेव्हा कधी नजर ना लागो,
आपल्या नात्याच्या या नाजूक कळीला,
म्हणून मी नेहमी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो,
तुझ्या गालावरच्या त्या होकाराच्या गुलाबी खळीला..

आयुष्य माझे सुंदर आहे फक्त,
तुझ माझ्या जिवनात असण्यावर,
नाहीतर काय अर्थ उरतो श्वासांना,
जेव्हा ह्रिदयच छातीत नसल्यावर...

-- अनामिक...

email- anamiksahil@gmail.com

अविभाज्य ...

अविभाज्य ...

जेव्हा सगळं मनाप्रमाणे घडत असतं ,
मन प्रसन्न असतं ,
सगळं छान , निरभ्र असतं,
तेव्हा तू कुठे असतेस ???
का असतेस अवती भवतीच ....
पण तुझं अस्तित्त्व मलाच जाणवत नाही ?

आज काल मी मला स्वार्थी वाटू लागलोय .... कारण ...
कारण जेव्हा बेचैनी असते, दुःख असतं, सगळं दाटून येतं ....
तेव्हाच तू आठवतेस ....
असंच झालंय बरेचदा .....

पण खरंच सांगतो ,
तू माझ्या अस्तित्वाचाच भाग आहेस ...
कदाचित ज्याला मी सुख किंवा आनंद म्हणतो ,
तेच एखाद्या मृगजळासारखं आहे
ज्याची इतकी भूल पड़ते की ....
स्वतःचं अस्तित्त्व सुद्धा विसरलं जावं .......

Yogesh Tapasvi

प्रयत्न करतोय पण जमत नाही...

प्रयत्न करतोय पण जमत नाही...
तुला विसरायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

मला परत जगायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

मन मोकळे रडायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

पुन्हा एकदा हसायचे आहे...
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

नवीन कविता लिहायची आह...े
प्रयत्न करतोय पण जमत नाही...

मनापासून

मनापासून
मला कळेना कसे घडे हे
कळे तुला गं माझ्या मनीचे
जसे कळे गं सहजपणाने
जीवा घ्यावया श्वास,
गंध तुझा गं मोहवे मला
श्वास तुझा गं जाणवे मला
काही न सुचते काही न रुचते
फक्त तुझा मज ध्यास ....

अगदी माझ्या जवळ असूनही
हाक मारलीस नाही कधी
मी ही करंटा, अबोल प्रीती
तुझी मज कळली नाही कधी
आणि गर्द अंधारी एकदा चुम्बिलेस नयनास
हातात घेउन हात म्हणालीस
किती रे तू थकलास ......

ज्या ज्या वेळी भेटलीस
भारून टाकले तू मजला
शब्दावाचून माझी भावना
मूकपणे कळली तुजला
आज जाणले सखी तुला
संपले सर्व आभास
व्यर्थ वाटती सर्व सूखे
अन लौकिकाची आरास ......

दुःख वाटते एवढेच ...
मी देऊ न शकतो काही तुला
व्यवहारिकतेच्या जगात या गं
कोण विचारी तुला मला
खंत न वाटे याची मला
ये श्वासात मिसळू दे श्वास
पूर्णत्व काय असणार दूजे
माझ्या गं जीवनास .......

योगेश तपस्वी

स्वप्न ...

मला स्वप्न खूप आवडतात
वास्तवाशी संबंध नाही कशाचेच बंध नाहीत ....
खोटी असली तरी धीर देतात
थकल्या भागल्या जीवाला बळ देतात ....
मला स्वप्न खूप आवडतात

मला धुकही खूप आवडत ....
खूप खूप सुरक्षित वाटत त्याच्या आवरणात
फार लांबच दिसत ही नाही ...
आणि धुक्याच्या ओलेपणात
डोळ्यात आलेल पाणी कोणाला कळतही नाही ...
मला धुकही खूप आवडत ....

मला तू ही खूप आवडतेस
मला माहित आहे मी तुला अजिबात आवडत नाही ....
तरीही मी स्वतःला रोखु शकत नाही ....
तू नसलीस तर स्वप्नही पडणार नाहीत ...
आणि मग धुक्यात विरून जायला कितीसा वेळ लागेल???