Total Pageviews

Sunday, November 4, 2012

मी डोलकर डोलकर डोलकर दयार्चा राजा - mi dolkar dolkar dolkar daryacha raja - koli geet

Lyricist
- Shanta Shelke
Singer
- Lata Mangeshkar - Hemant Kumar
Music Director
- Hridayanath Mangeshkar

मी डोलकर डोलकर डोलकर दयार्चा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो नेसलय अंजिरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमाळता वार्‍यान घेतय झेपा
नथ नाकान साजिरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलीवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतय मौजा

या गो दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगर लाटा
कवा उदानवारा शिराला येतय फारु
कवा पान्यातूनी आभाला भिरतंय तारु
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
जाते पान्यान भिजून धराती
येते भेटाया तसाच भरतार माजा

भल्या सकालला आभाल झुकतंय हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी रापण टाकतो जाळी
धन दर्याचं लुटून भरातो डाली
रात पुनवेचं चांदन प्याली
कशी चांदीची मासोली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा


Dev Jari Maj Kadhi (Movie - Molkarin) Singer - Asha Bhosle

Song - Dev Jari Maj Kadhi
Movie - Molkarin (1963)
Lyrics - P. Savalaram
Music - Vasant Desai
Singer - Asha Bhosle
Actors - Sulochana

गीत - देव जरी मज कधी
चित्रपट - मोलकरीण (१९६३)
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत देसाई
स्वर - आशा भोसले
कलाकार - सुलोचना

गीत - देव जरी मज कधी भेटला, माग हवे तो माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला

कृष्णा गोदा स्नान घालु दे, रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी, मुक्ताई निजवु दे तुजला

शिवरायाच्या मागिन शौर्या, कर्णाच्या घेइन औदार्या
ध्रुव, चिलयाच्या अभंग प्रेमा, लाभु दे चिमण्या राजाला

लेक लाडकी या घरची - Lata Mangeshkar



गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - कन्यादान (१९६०)
--------------------------------------

लेक लाडकी या घरची
होणार सून मी त्या घरची

सौख्यात वाढलेली
प्रेमात नाहलेली
कळिकळि फुलून ही चढते
मंडपी वेल मायेची

संपताच भातुकली
चिमुकली ती बाहुली
आली वयात खुदुखुदू हसते
होऊनी नवरी लग्नाची

हे माहेर, सासर ते
ही काशी, रामेश्वर ते
उजळिते कळस दो घरचे
चंद्रिका पूर्ण चंद्राची

जीवनात ही घडी अशीच राहू दे - Lata Mangeshkar, Yashwant Dev

Song - Jeevanat hee ghadi
Movie - Kamapurta Mama (1965)
Lyrics - Yashwant Dev
Music - Yashwant Dev
Singer - Lata Mangeshkar

गीत - जीवनात ही घडी
चित्रपट-कामा पुरता मामा (१९६५)
गीतकार - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - लता मंगेशकर

Lyrics :- जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविणका अर्थ वेगळा
स्पशार्तून अंग अंग धूंद होऊ दे

पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे

विठ्ठला, तू वेडा कुंभार -- Sudhir Phadake, Movie Prapanch, Lyrics - Ga Di Madgulkar

गीत - ग. दि, माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - प्रपंच (१९६१)
राग - तिलककामोद, देस (नादवेध

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार !

माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !

तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडीसी
न कळे यातुन काय जोडीसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !

सागरा प्राण तळमळला --- Vir Vinayak Damodar Sawarkar

VIR SAWARKAR --- Ne Majasi Ne Parat Matrubhumila

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला
 
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला



हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा by Vir Sawarkar

Singer- Lata Mangeshkar
Music- Hridaynath Mangeshkar
Lyrics- V.D. Savarkar

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

Saturday, June 9, 2012

Jagayache Kase

* १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. * २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. * ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान * ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. * ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. * ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. * ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. * ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. * ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस ! * १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! * ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. * १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. * १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. * १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. * १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. * १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. * १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. * १८) आधी विचार करा; मग कृती करा. * १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, * २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! * २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. * २२) अतिथी देवो भव ॥ * २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. * २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. * २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
चालता चालता कधीतरी ठेच लागणारच, जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच? दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच? दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे. आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं..ह्यालाच जगणे म्हणतात …. स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो …. .दुसऱ्याच्या आनंदात आपले सुख पाहतो ….तो सुखी राहतो..!

जमेल का पून्हा लहान व्हायला..? जमेल का पून्हा लहान व्हायला..? "क्षणात घेतात कट्टी अन क्षणात घेतात बट्टी आवडते त्यांना शाळा जर असेल तर सूट्टी ... कोणाच काही न ऐकनारा स्वभाव त्यांचा हट्टी धाक दाखवायला घ्यावी लागते हातामध्ये पट्टी .. अभ्यासाचा वेळी यांना खेळ भारी सुचतो क्लासमध्ये बसल्या बसल्या बाजुवाल्याला पेन्सीलच टोचतो .. छडीसारखे प्रसाद तर यांना रोजचेच भेटतात दप्तर फ़ेकून घरात खेळायला पळतच सुटतात .. अभ्यासात नेमके यांचे पाढेच कसे चुकतात गणित सोडवायला घेतल की हातचे एकच हुकतात .. चित्र काढतांना मात्र चित्रामध्येच घुसतात ओरडा खाऊन मोठ्यांचा कोपर्‍यात जाऊन बसतात .. अस हे लहाणपन पून्हा कधीच वाट्याला कुणाच्या येत नाही लहान मुलांबरोबर खेळतांना ठरवूनही मन लहान होत नाही.....!!!!!.

Monday, June 4, 2012

जीवनाच्या प्रवाहात

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही.....

Sunday, June 3, 2012

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?

पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले

फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…

माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार

फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का.?

Some of the good marathi blogs

Some of the good marathi blogs

http://www.marathimati.com/balmitra/marathi_stories/chaturya_katha/chaturya_katha_34.asp

www.maayboli.com/

www.amolmayekar.com
www.khapre.in/content/marathi/index.aspx
mr.upakram.org/
http://sanvaad.blogspot.com/
http://lopamudraa.blogspot.com/2007_12_02_archive.html

येत नाही.....

कपडे स्वच्छ ठेवून कधी,
चिखलात पडता येत नाही
आरसा पुढे ठेवून
स्वतः पासून दडता येत नाही

प्रेम आणि स्वात्यंत्र
हे विरूध्दार्थी शब्द आहेत

पंखात पंख घालून कधी,
गगनात उडता येत नाही

मनात जिद्द असेल तर
"एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो
मेलेल्या मनाला साधा,
जिना चढता येत नाही

आयुष्य धरायला गेलात तर, चावतं
एखाद्या कुत्र्यासारखं
पण पळून जाईल ह्या भितीने,
त्याला सोडता येत नाही

पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा
उपयोग नाही
जेव्हा तुम्हाला
माणसाला, माणूस जोडता येत नाही

सॅंडविच

सॅंडविच
Saturday, February 07th, 2009 AT 1:02 PM

खरं म्हणजे माझं आणि बायकोचं पटत नाही, असं अजिबात नाही. कुठल्याच विषयात आमचे टोकाचे मतभेद नाहीत; पण तिचं माझ्या आई-वडिलांशी जमत नाही. मग ती मला सारखं त्यांच्यावरून टोकत असते. मुलं त्यांच्याकडे गेली तरी मोठा वाद होतो. एखादा निर्णय मी आई-वडिलांना विचारून घेतलाय, असं नुसतं वाटलं तरी तो तिनं फिरवलाच म्हणून समजा. आता आता तर तिनं सांगायलाच सुरवात केली आहे, "एक तर मी नाही तर ते'. हे एक सोडलं तर ती चांगली शिकलेली आहे, नोकरी करते. घर, मुलंसुद्धा नीट बघते. माझ्याविषयी तिला आकस आहे, असं नाही; पण सतत आई-वडिलांशी वाद आणि त्यांच्याशी संबंध सोडायची भाषा.
"दुसरीकडे म्हणाल, तर मी एकुलता एक मुलगा. आई-वडील म्हणतात, की तुझं लग्न केलं आणि तू पार बदललास. त्यांचं आणि माझ्या बायकोचं अजिबातच जमत नाही. आईचा आणि तिचा तर छत्तीसचा आकडा. आईच्या मते तिला शिस्त नाही, पद्धत नाही, आमच्या घरात ती एकरूपच झालेली नाही. तर हिच्या मते माझी आई संसारात फारच ढवळाढवळ करते. थोडक्‍यात काय, तर मी दोन्ही बाजूंनी फटके खातो.'"तसं पाहिलं तर आई-वडिलांनी खस्ता खाऊन माझं शिक्षण पूर्ण केलंय. माझ्या कॉलेजच्या मोठाल्या फी भरल्यात. आता लग्न झालंय म्हणून आई-वडिलांना तोडून टाकावं, हे मला मान्य नाही. तसंच बायकोलाही आई-वडिलांशी जमत नाही एवढ्या कारणानं मी दूर करू शकत नाही.'
""म्हणजे चांगलाच समजूतदार आहेस की तू.'' मी म्हणालो. ""अहो, पण उपयोग काय त्याचा? थोडक्‍यात सांगायचं तर माझं "सॅंडविच' झालंय. सगळ्यात वाईट म्हणजे माझ्यावर दोघंही नाखूष. बायको म्हणते, की एवढं आई-वडिलांचं ऐकायचं होतं तर लग्नच करायचं नव्हतं. आई वडील म्हणतात, की तू इतका बावळट आणि बायकोच्या आहारी जाणारा निघशील असं वाटलं नव्हतं. आता मी तरी काय करू? मला तर वाटतं, की सगळ्यांनाच सोडून द्यावं किंवा आपणच कुठंतरी पळून जावं, कारण कोणीच माघार घ्यायला तयार नाही.'
""अरे, पण हा काही त्यावरचा उपाय नाही.'' मी त्याला कसंबसं समजावलं; पण त्याची स्थिती दया येण्याजोगी होती, हे मानायलाच पाहिजे. काही ठिकाणी मुलगा "खमक्‍या' असल्याने तो आई-वडील आणि बायको दोघांनाही आपापल्या ठिकाणी ठेवतो. मात्र काही मुलं या वादात प्रचंड चिंतेत पडतात. त्यांना दोघांचंही पटतं आणि मग नक्की काय करावं, हे कळत नाही. तिसरा प्रकार फारच वेगळा असतो. ते लोक आई-वडील आणि बायको यांच्या वादाचा आणि आपला काहीही संबंध नाही, असं जाहीर करून स्वतः सुखी होतात; पण सरहद्दीवरच्या चकमकी मात्र जोरात चालूच राहतात.
अर्थात हा काही सर्वसामान्य नियम नाही किंवा वादाचं एकमेव कारण नाही. अनेक ठिकाणी सुनेला मुलीप्रमाणे आणि सासू-सासऱ्यांना आपल्या आई-वडिलांप्रमाणे वागवलं जातं. पण जिथं असं घडत नाही तिथं मात्र मुलगा हवालदिल होतो. दोन्ही बाजूंकडून मुलावर हक्क प्रस्थापित करण्याच्या नादात वाद वाढत जातात. अशा स्थितीत मार्ग कसा काढावा, या चिंतेत मुलगा पडतो.हा विषय वर्षानुवर्षं चर्चिला जात आहे. याला अनेक पैलूही आहेत. फक्त व्यवसायात दिसणारा हा एक वादाचा मुद्दा. मात्र कुटुंबं छोटी झाल्याने तो गंभीर बनला आहे. या अशा वादात खरा तोटा, ज्याच्याशी कोणाचाच वाद नाही, अशा मुलांचाच होतो. दोघांचाही हेतू त्या मुलाचं हित व्हावं, हाच असतो. पण मग दोन्ही बाजूंनीही समजूतदारपणा दाखवला आणि आपल्या वादात विनाकारण मुलाचा तोटा होतो आहे, याचा विचार केला, तर या "सॅंडविच'चा खप थोडा कमी होईल.
ऍड. अभय आपटे