वाल्मीकि- रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे
हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर
`उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात
उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या
दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे
झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर
वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव
पडले. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला
सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर
हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
`हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १०००
पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त
केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा
आपल्याला लाभ मिळतो. जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले
अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति
हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप,
तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त
सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तीमान आहे. मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची
आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे
आश्वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान
शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते.
शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना
आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते.
आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते.
झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते
नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद
ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र
पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो
No comments:
Post a Comment